आज ती खूप खूश होती. मनात थोडी धाकधूकही होतं होती. मन बेचैन होतं. सगळं काही व्यवस्थित होईल ना? याची तिला काळजी लागून राहिली होती. व्यवस्थित झालं तर बरं, नाही तर? डोक्यात नुसते चांगले आणि वाईट विचार घोळत होते. तिच्या मनातल्या विचारांनी डोक्याचा पार भुगा केला होता.
इतक्यात आईने आवाज दिला..,
"ए मीरा, आवरुन घे पटकन. पाहुणे कधीही येतील?" आईच्या वाक्याने मीराच्या विचारांची तंद्री भंग झाली, आई काय म्हणाली? पाहुणे कधीही येतील हे वाक्य ऐकताच तिने तयारी करायला घेतली.
रमाने मीराला शोभेल असा मेकअप केला, आज ती त्याच्यासाठी तयार होत होती. त्याच्या आवडीच्या कलरची साडी तिने नेसली, गुलाबी कलर त्याला खूप आवडायचा. हातात बांगड्या, गळ्यात माळ, कानात मस्त मॅचिंग झुमके, ओठी लाली, कपाळी चंद्रकोर, पायात पैंजण या शृंगाराने ती आज त्याच्यासाठी नटली होती.
रमाने मीराला सुट होईल असा मीराचा मेकअप केला.
"अगं, मीरा. किती! सुंदर दिसतेस? नक्कीच राम तुझ्या पुन्हा प्रेमात पडेल." रमाने असं बोलताचं, लाजेनेच तिचे गाल लाल झाले. चटकन तिने रामसाठी लिहिलेली कविता तिला आठवली,
"अगं, मीरा. किती! सुंदर दिसतेस? नक्कीच राम तुझ्या पुन्हा प्रेमात पडेल." रमाने असं बोलताचं, लाजेनेच तिचे गाल लाल झाले. चटकन तिने रामसाठी लिहिलेली कविता तिला आठवली,
"मला तुझ्याच प्रेमात पडायचं
पुन्हा पुन्हा
तू मागे वळून बघताना
तुला पाहून हसताना
पुन्हा पुन्हा
तू मागे वळून बघताना
तुला पाहून हसताना
मला तुझ्याच प्रेमात पडायचं
तू चोरून बघत असताना
नजरेला नजर देत
तुझी नजर चोरताना
तू चोरून बघत असताना
नजरेला नजर देत
तुझी नजर चोरताना
मला तुझ्याचं प्रेमात पडायचं
नव्या वळणावरती चालताना
तुटलेला हात तु पुन्हा
नव्याने जोडताना."
नव्या वळणावरती चालताना
तुटलेला हात तु पुन्हा
नव्याने जोडताना."
तशी मीराला कविता लिहायची खूप आवडं होती. मीराला खूप छंद होते. लिहायची आवड खूप होती. प्रेमात पडल्यापासून तिने त्याच्यासाठी कितीतरी कविता लिहिल्या होत्या.
रमाचं तिला चिडवणं चालूचं होतं. रमा ही मीराची सर्वात जवळची जीवलग मैत्रीण. कुठेही जायचं ठरलं तर दोघींशिवाय कुठेच निघत नाही. एकमेकींसाठी जीव कि प्राण होत्या.
"अगं, मीरे झालं का लाजून तुझं?" रमाचं तिला चिडवणं चालूचं होतं, तेवढ्यात आईने आवाज दिला
"अगं रमा मीराचं आवरलं का? आवरलं असेल तर तू खाली ये बघ, थोडी मदत करायला. पाहुणे येतील इतक्यात." आईचा आवाज ऐकून रमा खाली गेली
रमाही मीराच्या आईला आई म्हणून हाक मारायची. ती लहान असताना तिची आई जग सोडून गेली. रमा तिचे बाबा आणि छोटा भाऊ असे त्यांच छोटसं कुटूंब होतं.
इकडे रमा खाली जाताचं. मीरा स्वत:ला आरशात पाहू लागली, स्वत:लाच पाहून ती खूप लाजत होती. मनातला आनंद मावत नव्हता. स्वप्न तर नाही ना? तिच्या जवळ रामचं उभा आहे असा भास होतं होता. आरशातल्या प्रतिमेला हात लावताच, ती प्रतिमा नाहीशी झाली, मीराने डोक्यात टपली मारली, त्याच्या प्रेमात पुन्हा पडून, गाणं गुणूगुणू लागली.
"एक हिरवं हिरवं स्वप्न डोळ्यात रुजलं
स्वप्न सात पावलांच दारी येऊन बसलं
एक हिरवं हिरवं स्वप्न डोळ्यात रुजलं
स्वप्न सातं पावलांच दारी येऊन बसलं
आला गुलाब केवडा, जाई जुईचा हा वास
जाई जुईचा हा वास"
स्वप्न सात पावलांच दारी येऊन बसलं
एक हिरवं हिरवं स्वप्न डोळ्यात रुजलं
स्वप्न सातं पावलांच दारी येऊन बसलं
आला गुलाब केवडा, जाई जुईचा हा वास
जाई जुईचा हा वास"
रमाच्या आवाजाने मीराची विचारांची तंद्री उडाली.
"अगं बाई, आमचा पण विचार करत जा, थोडा तरी" रमाच्या या थट्टेने मीराचे गाल लाजेने लाल झाले.
"हो गं! रमा तुला विसरून कस चालेल, तुला विसरले तर तू जीव घेशील माझा. रमा सगळं ठिक होईल ना गं?बाबाला राम पसंत पडेल ना ग? अगं बाबांनी रामला सहकुटुंब यायला सांगितल तर आहे. पण त्यांना तो आवडेल ना? मला तर खूप टेंशन आलं आहे." मिराच्या चेहऱ्यावर टेंशन स्पष्ट दिसत होतं.
"हो गं! मीरा तू काळजी नको करू. काकांना राम नक्की आवडेल." रमा तिला धीर देत म्हणाली.
********
इकडे राम आपल्या रूममध्ये फेऱ्या मारत होता. त्याचीही ही स्थिती मीरासारखी झाली होती. मीराचे वडील तयार होतील ना? आमच्या लग्नाला याचं त्याला खूप टेंशन आलं होतं.
"ओय्य दादू, तू अजून तयार नाही झालास. वहिनीला बघायला जायचं आहे कि नाही? नसेल जायचं तर आई -बाबांना सांगते. दादूला वहिनी नाही आवडतं?"
"ओय्य चिंगी, मी इकडे टेंशनमध्ये आहे आणि तुला माझी मस्करी सुचतेय. अय्या माझा दादूड्या एवढा चिडतोस कशाला? अरे आपली वहिनी तीच होणार. तू जरा टेंशन कमी आणि आनंदी रहा. सगळं कसं ना, व्यवस्थित होणार. आनंदी आनंद सगळीकडे होणार. चल पटकन आवरून खाली ये आई - बाबा वाट पाहत आहे." चिंगी आपल्या दादुला सांगून खाली गेली.
ही मोठी की मी नक्की? छोटी असून पण किती समजूतदार आहे. असं मनाशी बोलून तयारीला लागला.
विचारांच्या तंद्रीतून राम बाहेर येत आवरू लागला. त्याने मस्त फॉर्मल ब्लॅंक पॅन्ट घातली आणि पिंक कलरचा शर्ट. मस्त ड्रेसिंग करून तो खाली गेला. त्याला पाहताच, "अय्या दादू किती स्मार्ट आणि हँडसम दिसतो यार! चिंगी त्याची खेचायची, एकही संधी सोडत नव्हती. गप्प गं चिंगी किती त्रास देणार आहेस. आईने रामला नजर नको लागायला म्हणून कानाच्या मागे काळा टिक्का लावला. तेवढ्यात बाबांनी आवाज दिला, चला लवकर जायला उशीर होत आहे.
विचारांच्या तंद्रीतून राम बाहेर येत आवरू लागला. त्याने मस्त फॉर्मल ब्लॅंक पॅन्ट घातली आणि पिंक कलरचा शर्ट. मस्त ड्रेसिंग करून तो खाली गेला. त्याला पाहताच, "अय्या दादू किती स्मार्ट आणि हँडसम दिसतो यार! चिंगी त्याची खेचायची, एकही संधी सोडत नव्हती. गप्प गं चिंगी किती त्रास देणार आहेस. आईने रामला नजर नको लागायला म्हणून कानाच्या मागे काळा टिक्का लावला. तेवढ्यात बाबांनी आवाज दिला, चला लवकर जायला उशीर होत आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा