बाबांनी आवाज दिल्यावर सगळे जण गाडीमध्ये जाऊन बसले. बाबांनी मस्त गाणी लावली होती.
"साथीया साथीया पगले से दिलने ये क्या किया, चून लिया चून लिया तुझको दिवानेने चून लिया."
" काय मग बाबा एका मुलाची मज्जा आहे. बघा हा बाबा लग्नानंतर तुम्हांला आणि आईला विसरून जायचा."
चिंगींच रामला चिडवण चालूच होतं. तिला बाबांची साथ होती.
"ऐ आई सांग ना हिला किती चिडवणार? ही मला किती त्रास देते?"
"किती त्रास देणार गं माझ्या लेकाला." आई चिंगीला ओरडण्याचा भावनेने बोलत होती. पण तिलाही हसू कंट्रोल होत नव्हते. आईच्या हसण्याने सगळेच रामकडे बघून हसायला लागले.
"काय गं आई? तु पण यांच्यात सामील आहे."
"नाही रे माझ्या चिडका बिब्बा." असं आईने बोलताच पुन्हा एकदा हास्याचा फुगा फुटला.
"बसं बसं आता त्याला कोणीही चिडवायचं नाही." हेच दिवस असतात रे चिडवायचे." बाबा रामला बोलत होते.
मनोमनी रामलाही तिचं चिडवण आवडत होतं. मनात गुदगुल्या होत होत्या.जर का तिला दाखवल्या ना? ही काय चिडवायचं सोडायची नाही. रामला असं झालं होतं कधी एकदा मीराला पाहतो. तिच्या विचारात राम पुन्हा एकदा नव्याने तिच्या प्रेमात पडला होता.
मी बघावं
तिने दिसावं
पाहताच क्षणी
मी प्रेमात पडावं
तिने दिसावं
पाहताच क्षणी
मी प्रेमात पडावं
तिच्याबरोबर राहून रामही छोटी मोठी कविता करायला शिकला होता. तो मीरा आणि तिच्या कवितेच्या प्रेमात पडला होता.
दरवेळीस तयार झाल्यावर पहिला फोटो काढून पाठवणारी मीरा. आज तिने एकही फोटो रामला पाठवला नव्हता. याच विचारात राम होता. आज ती कशी दिसत असेल? नेहमीचं भेटणं वेगळं असायचं. पण आज आपण तिला लग्नाची मागणी घालायला जात आहोत. याचा त्याला खूप आनंद वाटतं होता. सर्व सुख त्याला मिळत होते. त्याच्या डोळ्यांसमोर मीरा कशी भेटली, कशी ओळख झाली आणि कसे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले हे चित्र उभे राहिले?
***
इकडे मीरा तयार होऊन रामची आतुरतेने वाट पाहत होती. तिच्या मनाची घालमेल, त्याला भेटण्याची ओढ तिला काही स्वस्थ्य बसू देत नव्हती. तिचं सारखं लक्ष गाडीच्या आवाजाकडे होते.
"अगं रमा कधी येणार हे?"
"अगं बाई, आतापासूनच आमचे हे. असं कधीपासून बोलायला लागली?"
"गप्प गं रमा, आता तु चिडवायला सुरुवात नको करु ह!" असं मीरा बोलायला लागली, लगेच रमाने तिला चिडवायला सुरुवात केली, "तुमचे हे आता येतीलच इतक्यात."
मीरा लाजेने लाल झाली. "गप्प गं रमा, मला अशी सवय नाहीये."
"सासरी गेल्यावर डायरेक्ट नावाने कसं आवाज देणार?"
"अय्यो सासरच्यांची आतापासूनच काळजी वाटायला लागली. मग इशारे इशारे." रमा एकही संधी चिडवायची सोडवत नव्हती.
"गप्प गं रमा तुला फक्त चिडवायला चान्स हवा असतो. "
राम मीराच्या आठवणीत कधी तिच्या घरापर्यंत येऊन पोहोचला कळलेच नाही. मीराच्या बाबांनी आवाज दिला. "अगं सुनंदा ऐकलसं का? पाहुणे आलेत." बाबांचा आवाज ऐकताच मीराच्या हृदयाची धडधड वाढत होती. मला असं का होतयं. असं वाटतं मी पुन्हा नव्याने त्याला भेटते.
भेटलास सख्या माझा
या अवचित वळणावर
बहरेल ही प्रीत
प्रेमाच्या या वाटेवर.
या अवचित वळणावर
बहरेल ही प्रीत
प्रेमाच्या या वाटेवर.
पुन्हा पुन्हा नव्यानेच त्याच्या प्रेमात पडते होती. प्रीतीचे हे फूल तिच्या चेहऱ्यावर दिसत होते.
****
मीराच्या बाबांनी, यशवंतराव पाठक या कुटुंबांचे स्वागत केले. रामच्या घरून रामचे आई - वडील, छोटी बहीण एवढेच जण येणार होते. मीराच्या घरीही जास्त कोणी पाहुणे नव्हते. कारण दोघांनीही घरी आधीच सांगून ठेवले होते जास्त पाहुणे नको. जरी लव्हमेरेज असेल तरी रितसर मागणी घालताना अडचणी नको.
सदाशिव साठे हे मीराचे बाबा. मीराच्या बाबांनी आपल्या पत्नीची ओळख करून दिली. यशवंतरावांनी आपल्या कुटुंबाची ओळख करून दिली.
रामची नजर तर मीराला शोधत होती. चटकन चिंगीने रामला हात मारला. "काय मग दादा वहिनीला शोधतोयस का?"
रामची नजर तर मीराला शोधत होती. चटकन चिंगीने रामला हात मारला. "काय मग दादा वहिनीला शोधतोयस का?"
"चिंगे कुठे काय? मी कुठे शोधतोय तिला."
"ती येईलच कि बाहेर. नजर सांगते तुझी. काय रे दादा. जरा धीर धर. घरच्यांच्या आधी गप्पा होऊ दे."
मीरा किचनमध्ये होती.
मीराच्या बाबांनी सुनंदाला इशारेनेच खुणावलं. "मीराला घेऊन या."
सुनंदाताई लगेच किचनमध्ये गेल्या. रमाने हा चहाचा ट्रे आणि छोट्या प्लेटमध्ये पोहे व्यवस्थित भरून ठेवले. "मीरा हे चहाचा ट्रे घे आणि रमा तु पोह्यांची डिश् घे. "
मीराला येताना बघताचं राम बघतचं राहिला. त्याला असं वाटतं होतं, की तो आज मीराला पहिल्यांदाच बघत आहे. ती किती सुंदर दिसत आहे. तिच्या नजरेनेच तो घायाळ झाला.
"नजरेचे इशारे न कळे तुला अन् मला. "
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा