Login

लग्नाची बेडी भाग 3 अंतिम

जे कधीच संपत नाही. ते प्रेम. नकळतही मनात फुलते ते प्रेम. हृदयाची एक संवेदना. एकमेकांची लागते ओढ.... ते प्रेम.
मीराने सर्वांना चहा दिला. रामला चहा देताना पुन्हा एकदा त्यांची नजरानजर झाली.

"प्रेमाची कळी
डोळ्यात दिसते
स्वप्न पाहून
तुझ्यात गुंतते"

ते दोघे कॉलेज पासून जरी सोबत असले तरी तिला वाटत होत कि आज पहिल्यांदाच भेटतो आहोत. पुन्हा एकदा नव्याने भेट होत आहे. तिच्या नजरेनेच राम पुन्हा पुन्हा तिच्या प्रेमात पडला होता.

"पाहता तुला
मनी मन हसली
गालावर सख्या
कळी ही खुलली."

" नजरेनेच बोल तु जरा, कळू दे प्रेम हे जरा. "

" चोरून चोरून पाहत, फूल हसून लाजतं, गाणं आमच्या वरातीत माझ्या मनात वाजतं."

मीराची आणि रामची ओळख खरं तर काॅलेजच्या लास्ट इअरला झाली होती. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडायला त्यांचा फक्त प्रोजेक्ट होता. प्रोजेक्टच्या निमित्ताने एका ग्रुप मध्ये एकत्र आले होते. अनोळखी दिशेवर झालेली मैत्री. तेव्हापासून झालेली ओळख एका मैत्रीमध्ये झालेले नात. नंतर प्रेम आणि आता लग्नापर्यंत झालेला त्यांचा प्रवास. या त्यांच्या प्रवासाच्या टप्पावर त्यांना रमाची साथ होती. आज दोघे एका नामांकित कंपनीत दोघे सेटल होते. आयुष्याच्या एका टप्यावर दोघेही होते.

मीराचे बाबा यशवंतरावांशी गप्पा मारत होते. तर ईकडे सुनंदाताई रामच्या आईशी बोलत होते. रमा आणि चिंगी राम आणि मीराच्या नजरेचे खेळ बघून हसत होते. नजरेनेच दोघे एकमेकांशी बोलत होते. अधुरी राहिलेली भेट आज खूप दिवसांनी झाली.

मीराच्या बाबांनी रामला काही प्रश्न विचारले. रामच्या आईवडिलांनी मीरालाही काही प्रश्न विचारले. लग्नाची बोलणी केली. लग्न कसे आणि कोणत्या पद्धतीने करायचे. देण्याघेण्याचं ठरलं.

यशवंतरावांनी सांगितले, "आम्हांला फक्त मुलगी द्या. बाकी आम्हांला काहीच नको."

दोन्ही कुटूंबाच्या सहमतींने सगळे ठरले. लग्नाची सनई लवकरच वाजणार होती. दोन्ही कुटुंबामध्ये आनंदी आनंद होता. हा आनंद राम आणि मीराच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. दोघांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा कुटुंबाचा आनंद दाखवत होता.

" सनईच्या सुरात, लग्नाची वरात" लवकरच वाजणार होती.

इकडे रमा आणि चिंगी दोघांना एकमेकांशी कसा संवाद साधायला येईल याचे प्लान करत होते. या दोघींचे होणारे चाळे बघून सुगंधाताई बोलल्या, "मीरा रामला आपले घर दाखव."

"हो चला ना जिजू ,तुम्हाला आमचे घर दाखवते."

" हो ना गं चिंगी. हो चला चला." तेवढ्यात हास्याचा कल्लोळ झाला. सगळेच दोघांना बघून जोरजोरात हसायला लागले. लगेच रामने चिंगीकडे आणि रमाकडे बघत रागाचा एक कटाक्ष दिला. दोघांनाही एकदम आक्कवड्र फिल सारख्यासारखं वाटले. मीराने रामला पूर्ण घर दाखवलं. जरी एकमेकांना ओळखत असले तरी नव्याने होणारी प्रेमाची चाहूल एक वेगळीच असते.

"कळे न मला
कळे न त्याला
वेड लागले
प्रेमाचे मला."

दोघांनाही हवा असणारा वेळ घरच्यांनी दिला होता.

दोघेही एकमेकांना अनुरुप होते. मेड फार इच अदर. मुलीचे वडील या नात्याने वाटणारी काळजी. लहानपणापासून जपलेलं फूल अचानक दुसऱ्याच्या हातात देताना वाटणारी काळजी जरा वेगळीच होती. मुलगी आणि वडिल यांंच नातं एक जगावेगळं असतं. काळजाचा तुकडा देताना होणाऱ्या वेदना फक्त बापच सांगू शकतो. मीराच्या आई वडिलांनाचे डोळे जरा भरून आले होते.

इकडे सगळ्या कुटूंब एकमेकांशी गप्पा मारत होते. साखरपुडा आणि लग्नाची तारीख निश्चित झाली. लग्नाची रेशीमगाठ जुळली होती कधीच न सुटण्यासाठी. जोडलेली गाठ कधीच सुटणार नाही.

दोन पाऊल तु चाल
दोन पाऊल मी चालते
मनातले बोल
हळूच कानात सांगते

प्रेमाची ओढ ही अशीच लागते. कधीच न सुटण्यासाठी.

तुळशीचं लग्न झाल्यानंतर साखरपुडा करायचा ठरवला.

यशवंतरावांनी फक्त सांगितले होते. "आम्हांला मुलगी द्या. बाकी आमच्या अपेक्षा नाहीत. "

साखरपुडा आणि लग्नाचा खर्च रामच्या घरचे करणार होते.

साखरपुडा झाला आणि आता लग्न होणार होते. दोन्ही कुटुंबाची धावपळ चालू होती. सदाशिव साठे यांच्या लाडक्या लेकीचं लग्न होत. बाबांना काय करू आणि काय नको करू असं त्यांना झालं होते. मनातून थोडं दु:खही होत. बापाला कधीच लेकीसमोर दु:ख दाखवता येत नाही.

राम आणि मीराने मस्त लग्नाची मॅचिंग कपडे आणि ज्वेलरी घेतली होती. रामने मीरासाठी मस्त डिझाईनच मंगळसूत्र घेतलं होतं. पण तिला ते सरप्राईज होत. तो तिला लग्नातचं सरप्राईज देणार होता. रामला आधीपासून मीराला सरप्राईज द्यायला आवडायचे.

बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला. सुंदर नटून मीरा तयार होती राम ही तितकाच उत्सुक होता. फायनली दोघे आज खऱ्या अर्थाने नवरा -बायको झाले. आईवडीलांच्या आर्शिवादाने विवाहसोहळा संपन्न झाला होता.

पाठवणीच्या वेळी मिराच्या डोळ्यातले आसू कमी होत नव्हते. राम तिच्या घरच्यांना समजावत होता. सगळे निघाले. घरी आले. घरी धुमधडाक्यात स्वागत झाल.
दुसर्‍या दिवशी पूजा होती. लगेच दोघ फिरायला निघाले.

सुंदर अशा हिल स्टेशनवर दोघ हातात हात घालून फिरत होते. त्यांनी आजवर बघितलेलं स्वप्न पूर्ण होत होतं. राम मीराला खूप जपत होता. ती त्याच्या प्रेमात चिंब भिजत होती.
प्रेमाची कळी
मनी खेळली
प्रीत आपुली
ही बहरली

0

🎭 Series Post

View all