Login

लग्नानंतर होईल का प्रेम ?

Its a bad side story of love
काही दिवसांपूर्वी...

सोनल : शी राव कसला जमाना आलाय.. लव्ह मॅरेज केलं तरी प्रॉब्लेम आणि अरेंज मॅरेज केलं तरी प्रॉब्लेम...

पार्थ : काय झालंय राणी का मूड खराब आहे आज तुझा?

सोनल : अहो तुम्ही ती बातमी पाहिली का वैष्णवी हगवनेची? बिचारीला मारून टाकली रे सासरच्यांनी..

पार्थ : हो राव खूप वाईट झालं... एखाद्या गरिबाला दिली असती तर सुखात नांदली असती पोरगी


सोनल : होना.. अहो तिचं माहेरचं आडनाव वाचून मला जाम हसायला आलेलं.. काय तर म्हणे हगवणे.. असलं आडनाव बघून मी केव्हाच राम राम ठोकला असता नवऱ्याला..

पार्थ : होना.. काहीपण आडनाव आहे.. आपलं बरं आहे.. जाधव पाटील..

सोनल : ओ.. आपलं नाही.. मी अजून होयची आहे तुमची...

पार्थ : होका? लग्नाला दोन दिवस राहिलेत तरी अजून शिंदे पाटलांचा रुबाब काय जात नाहीये...

सोनल : आम्ही रुबाबदार होतो, आहोत आणि कायम राहणार...

पार्थ : होका.. बरं लग्न झाल्यावर तुमचा रुबाब पद्धतीशीर बघतो आम्ही..

सोनल : अयो... खाणार की काय मला ?

पार्थ : खाणार नाही गं, अशी गोड बायको भेटणार आहे तर मला रोजच तुझ्यावर प्रेम होत राहील आणि दिवसेंदिवस अजूनच वाढेल..

सोनल : राहूद्या राहूद्या... लग्नाआधी सगळेच मुलं असे म्हणतात आणि लग्न झालं की नवऱ्याच्या ताटाखालचं बनून रहावं लागतं मुलींना...

पार्थ : नाय ये.. मी तसला पोरगा नाही..


तेवढ्यात पार्थची आई आवाज देते.. "अरे राजा पार्थ दोन दिवसांनी हवं तेवढं बोला रे.. आता फोन ठेवून दे रात्रीचे एक वाजलेत.."

पार्थ : हो आई.. ठेवतोच फोन आता..

सोनल : बघा बघा.. लग्नाआधीच आईची बाजू घेतोय आणि बायकोचा फोन चक्क कट करतोय नवरा आणि म्हणे मी बाकीच्या पोरांसारखा नाही..

पार्थ : असं? बरं तू आता व्हिडिओ कॉल वर ये.. आज रात्रभर गप्पाच मारू आपण.. आईच नको टेन्शन घेऊ.. उद्या हळदीला तूलाच झोप येईल..

सोनल : अहो नका राव आता व्हिडिओ कॉल... मला झोपायला हवं आता.. चेष्टा करत होते मी तुमची

पार्थ : अंग अशी.. आली का नाही आता जागेवर..

सोनल : बरं बरं.. ठेवते आता फोन मी.. बाय..

पार्थ : बाय.. लव्ह यु.. मिस यु..

सोनल : हो लव्ह यु..


पार्थ फोन ठेवून देतो आणि रूमची लाईट बंद करून झोपी जातो..

सोनलने पार्थचा फोन ठेवून दिल्यावर पुन्हा दुसरीकडे कॉल केला.

सोनल : हैलो.. सब हमारे प्लॅनिंग के मुताबिक होना चाहिये.. तुम कल सुबह फ्लाईटसे काश्मीर को पोहोचकर मुझको एक मेसेज करना..

इरफान : हा बेबी, तुम टेन्शन काय को ले रही.. मै हू ना.. सब हमने जैसा सोचा है वैसा ही होना चाहिये...