दीर्घकथा जलद लेखन
रंगीबेरंगी व आकर्षक फुलांनी सजलेला लग्न मंडप, छान अशा वेशभूषेतील सर्व वऱ्हाडी मंडळी, भटजींच्या मंगलाष्टकांचा स्वर आणि हातात वरमाला घेऊन उभे असलेले वधू आणि वर. वातावरण अगदी मंगलमय होते. ज्याच्यावर आपले प्रेम जडले, त्याच्याबरोबर आपले लग्न होते आहे. याचा आनंद आणि हृदयाची वाढलेली धडधड... हे सर्व सांभाळत नवरी मंगलाष्टक संपताच नवरदेवाच्या गळ्यात वरमाला टाकणारच होती आणि तेवढ्यात कशाचा तरी जोरात आवाज आला आणि त्या आवाजासरशी तिने आपले डोळे उघडले व सभोवताली पाहिले.
'अच्छा आपण पाहिले ते एक सुंदर स्वप्न होते तर!'
असे मनाशी बोलत ती अंथरुणातून उठली आणि किचनमध्ये गेली.
किचनमध्ये आईची कामाची गडबड सुरू होती आणि त्या गडबडीत आईकडून भांडे खाली पडले होते. त्याचाच तो आवाज होता.
"काय गं विद्या, आज लवकर उठलीस?"
आईने किचनमध्ये आलेल्या विद्याला विचारले.
"अगं आई,जोरात आवाज आला आणि त्यामुळे मला जाग आली."
"अगं आई,जोरात आवाज आला आणि त्यामुळे मला जाग आली."
विद्या आळस देत आईला म्हणाली.
"भांडे कसे पडले? कळालेच नाही. तुमच्या सर्वांची झोपमोड होऊ नये. म्हणून मी काळजीने काम करत होती ; पण तरीही भांडे पडलेच. तुला त्या आवाजाने जाग आली ना? जा पुन्हा झोप थोडा वेळ. रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होतीस ना?"
विद्याला आई मायेने म्हणाली.
विद्याला तिची झोपमोड झाली. यापेक्षा ती जे सुंदर स्वप्न पाहत होती, ते अपूर्ण राहिल्यामुळे ती दु:खी झाली होती. झोप तर तिची उडालीच होती; पण आईने सांगितले म्हणून ती पुन्हा अंथरुणात येऊन पडली आणि ती ते स्वप्न आठवू लागली.
' स्वप्नात किती छान दिसत होते मी! आणि तो तर एकदम राजबिंडाचं! त्याच्याकडे नुसते पाहत राहवे... असाच दिसत होता तो!
मला प्रेम वगैरे गोष्टी पटत नाही आणि माझा या गोष्टींवर विश्वासही नाही. प्रेम करणाऱ्या मुला मुलींना मी वेडे समजते.
प्रेमाच्या बाबतीत असे माझे मत आहे. आणि तरीही जेव्हापासून मी त्याला पाहिले आहे तेव्हापासून माझ्या मनात अशी एक वेगळीच भावना का निर्माण झाली? त्याला पाहिल्यापासून सारखा तोच माझ्या डोळ्यासमोर येतो आहे. दुसऱ्या गोष्टीत मन गुंतवण्याचा मी प्रयत्न करते आहे ; पण माझे मन माझे ऐकतच नाही आहे. आणि आता स्वप्नातही तोच दिसतो आहे.
प्रेमाच्या बाबतीत असे माझे मत आहे. आणि तरीही जेव्हापासून मी त्याला पाहिले आहे तेव्हापासून माझ्या मनात अशी एक वेगळीच भावना का निर्माण झाली? त्याला पाहिल्यापासून सारखा तोच माझ्या डोळ्यासमोर येतो आहे. दुसऱ्या गोष्टीत मन गुंतवण्याचा मी प्रयत्न करते आहे ; पण माझे मन माझे ऐकतच नाही आहे. आणि आता स्वप्नातही तोच दिसतो आहे.
पहाटे पडलेली स्वप्ने खरी होतात. असे म्हणतात. मला पडलेले हे स्वप्न खरे होईल का? त्याच्याबरोबर माझी लग्नगाठ बांधली जाईल का?'
विद्या तिला पडलेल्या स्वप्नावर विचार करत होती.
क्रमश:
नलिनी बहाळकर
नलिनी बहाळकर
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन fevorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा