"काय गं मीनल, काय झाले? एवढी उदास का आहेस?"
विद्याने मीनलचा उदास चेहरा पाहून तिला विचारले.
"काही नाही झाले गं. कुठे उदास आहे मी. आनंदी तर आहे मी."
चेहऱ्यावर आनंदाचा भाव आणत मीनल विद्याला म्हणाली.
"तेच तर.. मला आश्चर्य वाटले या गोष्टीचे की, नेहमी आनंदी असणारी मीनल आज अशी उदास का वाटते आहे.? तू उदास झालेली चांगली नाही वाटत. तू नेहमी आनंदी रहा. तू आनंदी चेहऱ्यात खूप छान दिसतेस."
मीनलच्या पाठीवर थोपटत विद्या तिला म्हणाली व आपल्या कामासाठी पुढे चालू लागली.
विद्याने 2,3 पावलेच टाकली असतील, तेवढ्यात मीनल तिच्याजवळ आली आणि तिला घट्ट मिठी मारत रडू लागली.
अचानक मीनलच्या अशा वागण्याने विद्या घाबरली व तिला शांत करू लागली.
"काय झाले मीनल?का रडतेस तू? शांत हो आणि काय झाले ते सांग."
विद्याने मीनलला शांत करत तिच्या रडण्याचे कारण विचारले.
मीनल रडत रडतच विद्याला सांगू लागली.
"मीनल,तू माझी होस्टेलमध्ये जशी चांगली मैत्रीण आहे, तशीच माझ्या क्लासमध्ये माझी एक खूप चांगली मैत्रीण आहे; पण तिने आज जे काही केले..त्यामुळे माझा मैत्रीवर विश्वासच राहिला नाही.
आमच्या वर्गात राहुल नावाचा मुलगा आहे. तो दिसायला खूप सुंदर आहे आणि हुशारही आहे. मला तो खूप आवडतो. आमची चांगली मैत्री आहे. मला वाटते त्यालाही मी खूप आवडते. आमच्या मैत्रीविषयी मी तुला हे सर्व सांगणारच होते. पण त्या अगोदर काही वेगळेच घडले.
माझ्या वर्गात सोनल म्हणून जी माझी मैत्रीण आहे जिला मी चांगली मैत्रीण समजत होते. आणि मैत्रीच्या नात्याने मी तिला राहुलच्या व माझ्या मैत्रीविषयी सर्व काही सांगत होते. तिनेच राहुलच्या मनात माझ्याविषयी काही चुकीचे भरवले त्यामुळे तो माझ्याशी अगोदरसारखा बोलत नाही, हसत नाही आणि मी दिसली की मला टाळण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ही सोनल त्याच्याशी छान हसते,बोलते आणि राहुलही तिच्याशी छान हसतो, बोलतो.
मला वाटते सोनललाही राहुल आवडत असावा आणि त्याचे प्रेम मिळवण्यासाठी तिनेच त्याला माझ्यापासून दूर केले असावे."
विद्या पुण्यात इंजीनियरिंगचे शिक्षण घेत होती आणि होस्टेलला राहत होती. होस्टेलला मीनलशी तिची चांगली मैत्री झाली होती. मीनल पण इंजीनियरिंगला होती पण विद्याची व तिची ब्रांच वेगळी होती.
आपली मैत्रीण उदास दिसल्यावर विद्याने तिला विचारले आणि तिला मीनलने सर्व सांगितले.
मीनलने सांगितलेले हे सर्व ऐकून विद्याला खूप वाईट वाटले.
क्रमश:
नलिनी बहाळकर
नलिनी बहाळकर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा