प्रेम या विषयापासून विद्या दूर जाण्याचा प्रयत्न करत होती आणि पुन्हा आपल्या अभ्यासात लक्ष केंद्रित करत होती. पण मीनलच्या बाबतीत झालेल्या गोष्टीमुळे तिच्या मनात प्रेमाविषयी पुन्हा विचार येऊ लागले.
'प्रेम शुद्ध असते, पवित्र असते;पण वाईट प्रवृत्तीचे व्यक्ती प्रेमाचा दुरुपयोग करून प्रेमाला वाईट ठरवतात. मीनलचे राहुलवर खरे प्रेम असूनही ती त्याच्यापासून दूर आहे आणि राहुलवर सोनलचे प्रेम खरे आहे की खोटे? हे सोनललाच माहित.
'प्रेमात आणि युद्धात सर्व काही न्याय असते.'
या वाक्याप्रमाणे सोनल वागत असावी.
राहुलचे प्रेम मिळवण्यासाठी ती मीनल बरोबरची तिची मैत्री विसरते आहे. राहुलच्या व सोनलच्या अशा वागण्याने मीनल खूप दुखावली आहे. तिचा मैत्रीवरचा विश्वास उडाला आहे. तिला यातून बाहेर पडायला खूप वेळ लागणार आहे. मी माझ्या परीने तिला समजावून सांगितले आहे. त्याचा काही चांगला उपयोग झाला तर ठीक होईल.
इतरांना समजावून सांगणे किती सोपे असते ना! पण स्वतःच्या मनाला समजावणे खूप अवघड असते.
मीनलला तर मी छान समजावून सांगितले;पण माझ्या मनाला कसे सावरू? मी माझे मन इतर गोष्टीत गुंतवण्याचा खूप प्रयत्न करत आहे. पण अधूनमधून विनयचा विचार मनात येत असतो.
'वेळ हेच सर्व गोष्टीवर चांगले औषध असते.'
असे म्हणतात.
या म्हणण्याप्रमाणे,
आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगले होईल.
या म्हणण्याप्रमाणे,
आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगले होईल.
मीनल व माझ्यासारखे असे अनेक जण असतील, ज्यांना त्यांचे प्रेम मिळत नसेल.
पण अशाने आयुष्य काही थांबून जात नाही ना? आयुष्य जगावे तर लागतेच ना?'
असा विचार करत विद्या झोपेच्या स्वाधीन झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठली ती नव्या उत्साहाने, नव्या विचारानेच!
मन प्रसन्न होते म्हणून तिची सकाळही खूप छान प्रसन्न गेली.
छान तयार होऊन, प्रसन्न मनाने ती कॉलेजला गेली.
"विद्या, लेक्चर संपले की कॅन्टीनमध्ये ये. नेहमीप्रमाणे चहा घेऊ."
विद्याची क्लासमेट दीप्ती विद्याला म्हणाली.
"हो, नक्की भेटू."
विद्यानेही तिला होकार दिला.
लेक्चर संपले आणि विद्या कॅन्टींगमध्ये दीप्तीची वाट पाहत बसली होती. दीप्तीला थोडे काम होते म्हणून ती काम संपवून कॅन्टीनमध्ये येणार होती.
विद्या आपल्या विचारात गुंग होती तेवढ्यात तिला आवाज ऐकू आला.
"हाय विद्या, कशी आहेस?"
विद्या आपल्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली व तिने मान वर करून पाहिले तर तिच्या क्लासमधील हर्षल तिच्याजवळ उभा होता आणि तिच्याशी बोलत होता.
"हाय हर्षल, मी मजेत आणि तू कसा आहेस?"
विद्याने हर्षलच्या प्रश्नाला उत्तर देत त्याचीही विचारपूस केली.
क्रमश:
नलिनी बहाळकर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा