विद्या व विनयचा लग्न समारंभ छान व्यवस्थित पार पडला. सर्वजण आनंदीत होते. विद्या व विनय या विवाहित जोडीला, सर्व पाहुणे मंडळींनी खूप साऱ्या शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
आपल्या आई-बाबांचा, भावाचा व सर्व नातलगांचा अश्रू भरल्या डोळ्यांनी निरोप घेत,विद्या आपल्या सासरी गेली.
सासरी दोघांचे औक्षण केले आणि छान स्वागतही झाले.
लक्ष्मीच्या पावलांनी विद्याने सासरच्या घरात प्रवेश केला.
लक्ष्मीच्या पावलांनी विद्याने सासरच्या घरात प्रवेश केला.
सासुबाई व नणंदबाई कशा असतात? याविषयी विद्याने ऐकलेले होते. त्यामुळे सासूबाई व नणंदबाईबद्दल तिला थोडी भीती वाटत होती. ती त्यांच्याशी विचार करूनच बोलत होती.
माहेरच्या वातावरणाचा व सासरच्या वातावरणाचा आपल्या वागण्यावर लगेच बदल होतो. हे विद्याला जाणवले.
माहेरी असताना वागणे, बोलणे याचे काही बंधन नसते. आपण हवे तसे करू शकतो. पण सासरी आल्यावर, बोलायचं कसं? वागायचं कसं? राहायचं कसं? याच लगेच बंधन येतं आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचं टेन्शनही येतं.
सासरच्या लोकांनी सुनेला समजून घेतलं, तिला सर्व छान समजावून सांगितलं तर तिलाही संकोचल्यासारख वाटत नाही आणि सुनेने पण सासरच्या लोकांना आपल समजून सर्व व्यवस्थित ऐकून घेतलं तर घरातल्यांनाही बर वाटतं.
सासुबाईंच्या प्रेमळ बोलण्याने विद्याला बरे वाटले. सासूबाईंविषयी वाटणारी भीती थोडी कमी झाली. नणंदबाईंच्या बोलण्यातून त्या थोड्या कडक स्वभावाच्या असाव्यात असे तिला वाटले. त्यामुळे त्यांच्याशी थोडं जपूनच वागायचं. असे विद्याने ठरवलं.
लग्न खूप घाईत झाले. त्यामुळे लग्नाअगोदर विद्याचा विनयशी कधी बोलण्याचा प्रसंगच आला नाही. त्याचा स्वभाव, त्याचे विचार कसे असतील? हे विद्याला जाणून घ्यायचे होते.
घरात पाहुणे मंडळी होती. लग्नानंतरचे विधी, देवदर्शन व सत्यनारायणाची पूजा या गडबडीत विद्या विनयशी काही बोलू शकत नव्हती. व विनयही कामाच्या गडबडीत होता. विद्या तरी अधूनमधून त्याच्याकडे बघत होती. त्याच्या चेहऱ्यावरील भाव जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती. पण तो तिच्याकडे बघतही नव्हता. जाणून-बुजून तिच्याकडे दुर्लक्ष करत होता. असे विद्याला जाणवत होते.
घरात पाहुणे मंडळी असल्याने किंवा कामाची गडबड वगैरे आहे, म्हणून विनय असा वागत असेल. या विचाराने विद्याने आपल्या उत्सुक मनाला समजावले.शांत केले.
विनयला स्मिता आवडली होती. तिच्याशी लग्न न होता अपघाताने म्हणा की परिस्थितीने त्याचे आपल्याशी लग्न झाले. म्हणून तो आपल्यावर नाराज आहे का? की काही वेगळे कारण आहे?अशी संशयाची पाल विद्याच्या मनात चुकचुकली.
क्रमश:
नलिनी बहाळकर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा