'विनयबरोबर लग्न होणे. हा आपल्यासाठीच एक मोठा आश्चर्याचा धक्का होता.
अभ्यासासाठी सुट्ट्या होत्या म्हणून मी हॉस्टेलवरून घरी आली होती. विनयबरोबर माझे लग्न व्हावे. असा घरात विषय सुरू होता. सर्व बाजूंनी विचार करून मी पण लग्नाला तयार झाली. सर्व काही एवढ्या घाईत झाले की, लग्नासाठी माझ्या मैत्रिणींनाही मी बोलवू शकले नाही. आणि माझे लग्न झाले हे आता जेव्हा त्यांना कळेल, तेव्हा त्यांना नक्की माझा राग येईल. त्या खूप सारे प्रश्न विचारून मला त्रास देतील. त्यांना लग्नाचे खरे कारण सांगितले तर स्मिताची बदनामी होईल. काही झाले तरी स्मिता आपली बहीण व एक चांगली मैत्रीण आहे. त्यामुळे मी खरे कारण नाही सांगू शकणार.
मंगळसूत्र व जोडवी कोणाला दिसणार नाही. याची मी काळजी घेईन म्हणजे माझे लग्न झाले आहे. हे कोणाला कळणारच नाही. आता परीक्षेचा काळ आहे, त्यामुळे सर्वजण अभ्यासात व्यस्त आहेत. परीक्षा संपली की सुट्टी लागेल. त्यामुळे काही प्रश्नच राहणार नाही.
पण तोपर्यंत तरी काळजी घ्यायला हवी.'
पण तोपर्यंत तरी काळजी घ्यायला हवी.'
हॉस्टेलला आल्यावर विद्या असा विचार करत होती.
"अगं विद्या, तुला काही कळलं का?"
विद्याची मैत्रीण मीनल विद्याला म्हणाली.
"कशाबद्दल गं?"
विद्या प्रश्न विचारत म्हणाली.
"अगं, ती आपली मैत्रीण सविता पाटील आहे ना, तिचे लग्न झाले."
मीनल म्हणाली.
"झाले असेल मग त्यात काय वेगळं?"
विद्या शांतपणे मीनलला म्हणाली.
"तुला ही बातमी ऐकून आश्चर्य किंवा काही वेगळे नाही वाटले? तू एवढी शांत कशी?"
मीनलने विद्याला विचारले.
"काही नाही वेगळे वाटले."
विद्या म्हणाली.
"मग पुढे ऐक आता. सविताने आपल्या घरातल्यांना न सांगता आपल्या प्रियकरासोबत रजिस्टर लग्न केले. तो शाळेत होता तिच्यारोबर. तेव्हापासून त्यांची मैत्री व प्रेम आहे. हॉस्टेलला आता तिचे हे शेवटचे वर्ष होते. कदाचित घरी गेल्यावर तिच्या आई-बाबांनी तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली असती, म्हणून तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. परीक्षा संपली की ते दोघे आपापल्या घरी सांगणारच आहेत.
घरात जर त्यांच्या लग्नाला विरोध झाला तर पुढची सोय त्यांनी केली आहे.
सविता आपल्याशी किती छान गप्पा मारते? ती आपली खूप चांगली मैत्रीण आहे. पण तिने आपल्याला तिच्या प्रेमप्रकरणाबद्दल कधी सांगितले नाही. आणि तिचे असे काही असेल? असे आपल्याला जाणवू पण दिले नाही. लग्नाचे पण तिने स्वतः नाही सांगितले. तिच्या गळ्यात मी मंगळसूत्र पाहिले, तेव्हा मी तिला विचारले.
तिला सर्व सांगण्यासाठी आग्रह केला, तेव्हा तिने सर्व सांगितले.
कशा असतात ना मैत्रिणी? एकीकडे खूप मैत्री आहे. असे दाखवतात आणि दुसरीकडे मनातले काही कळू सुद्धा देत नाही. प्रेम, लग्न या गोष्टी लपवून ठेवतात. मला अशा मुलीही आवडत नाही आणि अशी मैत्रीही आवडत नाही."
मीनल थोड्या नाराजीच्या स्वरात म्हणाली.
क्रमश:
नलिनी बहाळकर
नलिनी बहाळकर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा