"विनय, तुझा जो निर्णय ठरला होता तोच आहे का?त्यात काही बदल झाला का?"
विनयची आई त्याला म्हणाली.
"हो आई, जर्मनीला जाण्याचा माझा निर्णय नक्की आहे. त्यात काही बदल नाही."
विनय आईला म्हणाला.
"तूचं जायला हवे का? तुझ्याऐवजी कोणी दुसरे गेले तर नाही चालणार का?"
-- आई
"अगं, त्या प्रोजेक्टचे अगोदरपासून सर्व मीच पाहतो आहे. मला त्यातले सर्व माहित आहे, त्यामुळे मलाच जावे लागणार आहे."
-- विनय
"जाण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही; पण तुझे आताच लग्न झाले आहे. विद्या परीक्षा संपल्यावर आपल्या घरी येणार आहे आणि तू परदेशात जातोय. म्हणून तुला जाण्याविषयी एवढे विचारते आहे. बाकी काही नाही."
-- आई
"फक्त तीन महिन्यांसाठी जातो आहे. तीन महिन्यानंतर इथेच राहणार आहे ना?"
--विनय
"अरे, पण तेव्हा विद्याचे कॉलेज सुरू होईल आणि ती हॉस्टेलला जाईल ना? आता ती येते आहे आणि तू जातोय आणि तू येशील तेव्हा ती हॉस्टेलला असेल."
-- आई
"कंपनीचे महत्त्वाचे काम आहे म्हणून मी जातोय आणि विद्या शिक्षणासाठी हॉस्टेलला जाणार आहे. आता परिस्थितीच अशी आहे की, आम्हांला दोघांनाही ॲडजस्ट करावे लागणार आहे."
-- विनय
"विद्यालाही घेऊन जा ना तुझ्या बरोबर."
-- आई
"आई, कसं शक्य आहे गं? तिचा पासपोर्ट लागेल ना? अजून मॅरेज सर्टिफिकेट आले नाही आमचे. आणि तिचे कॉलेज पण सुरू होईल ना?"
-- विनय
"तुला काय योग्य वाटते ते करं. माझ्या मनाला जे वाटले ते मी सांगितले."
विनयची आई निराश चेहऱ्याने म्हणाली.
"आई, अशी नाराज नको होऊ, मलाही कळते सर्व. मी येतो आहे ना तीन महिन्यात? आणि फोनवर बोलणे होत राहील ना? तू जास्त काळजी नको करू."
विनयने आईला समजावले.
"अगं रेखा, विद्याच्या सासर्यांचा फोन आला होता. विनय कंपनीच्या कामासाठी तीन महिन्यांकरिता जर्मनीला जाणार आहे. विद्याबरोबर आपल्यालाही भेटायला बोलावले आहे त्यांनी."
अरुणराव आपल्या पत्नीला म्हणाले.
"आताच तर लग्न झाले आहे. जर्मनीला जाणे गरजेचे आहे का जावईंचे?"
रेखाताई म्हणाल्या.
"असेल महत्त्वाचे काही काम म्हणून तर जात असतील ना. आपण प्रत्यक्ष भेटू तेव्हा समजेल सर्व. चला तयारी करा जाण्याची."
अरूणराव म्हणाले.
विनय जर्मनीला जात आहे. हे आई-बाबांच्या बोलण्यातून विद्याला कळतात तिचे मन दुःखी झाले.
क्रमश:
नलिनी बहाळकर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा