विद्या चहा घेऊन बेडरूममध्ये गेली, तेव्हा विनय त्याचे काम करत होता. विद्या रूममध्ये आली, हे ही त्याला कळले नाही. विद्या काही आवाज न करता त्याच्याजवळ गेली आणि "चहा" एवढंच म्हणाली.
कामात गुंग असलेल्या विनयने विद्याचा गोड आवाज ऐकला आणि तिच्या हातातील ट्रेमधला एक कप उचलला.
"तो तुमचा नाही, माझा आहे. माझ्या चहात आल आहे."
विद्याने असे सांगितल्यावर विनयने उचललेला कप ट्रेमध्ये ठेवला आणि दुसरा खूप उचलला.
आणि
विद्याला म्हणाला,
आणि
विद्याला म्हणाला,
"सांगितल्याबद्दल धन्यवाद."
विनय चहा पीत असताना आपले काम पण करत होता. विद्या शांतपणे चहा पीत बसली होती.
नणंदबाईंनी सांगितलेल्या 'सोबतीने चहाचा आनंद घ्या.' या वाक्याचे तिला हसू आले.
विद्याला विनयशी खूप काही बोलायचे होते पण तो काही बोलत नव्हता. तो त्याच्या कामात व्यस्त होता. हे पाहून तीही काही बोलली नाही. फक्त त्याच्याकडे पाहत होती आणि चहा पीत होती.
विनयने आपला रिकामा कप ट्रेमध्ये ठेवल्याच्या आवाजाने विद्या भानावर आली. तिने पाहिले तर तिच्या कपातील चहा संपलेला होता. विनयकडे पाहण्यात ती इतकी गुंग झाली होती की, चहा संपला आहे. हे ही तिच्या लक्षात आले नाही. ती रिकामा कप हातात घेऊन बसली होती.
विद्या आपल्याकडे बघते आहे. हे विनयच्या लक्षात आल्याने त्याने कप ट्रेमध्ये थोडा जोरात ठेवला आणि त्याचा हेतू सफल झाला होता. आपण काय करत होतो. हे विद्याच्या लक्षात आले आणि ती घाईतच ट्रे घेऊन उठली.
"चहा छान होता. आवडला मला."
विनयचे हे शब्द ऐकून स्मितहास्याने "धन्यवाद." म्हणत विद्या बेडरूममधून बाहेर आली आणि किचनमध्ये गेली. तिथे नणंदबाई काहीतरी काम करत होत्या.
विद्याचा आनंदी चेहरा पाहताच बोलल्या,
"तोंड गोड झाले का... चहाने?"
या प्रश्नाला काहीच उत्तर न देता विद्या आपले काम करू लागली.
विद्या काही बोलली नाही पण तिचा आनंदी चेहरा पाहत, आपला विनय मागचे सर्व विसरून संसारात रूळत आहे.
हे समजल्यावर विनयच्या ताईला सीमाला खूप बरे वाटले.
हे समजल्यावर विनयच्या ताईला सीमाला खूप बरे वाटले.
स्मिताच्या वागण्याने विनयला लग्न करण्याची इच्छाच राहिली नव्हती. तिच्यामुळे आपण दुःखी का व्हायचे? ती तिच्या आवडत्या मुलाबरोबर लग्न करून आनंदी जीवन जगत आहे आणि आपण दुःखात जीवन जगायचे. हे विनयच्या घरातील लोकांना पटत नव्हते. त्या सर्वांनी विनयला खूप समजावले आणि लग्नासाठी तयार केले. विद्याबरोबर त्याचा संसार सुखाचा होवो. अशीच घरातील सर्वांची इच्छा होती आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते.
क्रमश:
नलिनी बहाळकर
नलिनी बहाळकर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा