लैला भाग एक
ती कॉलेजची ब्युटीक्वीन! गोरी गोरी पान, सुंदर, नाजूक. सर्व कॉलेज तिच्यावर फिदा होते. ती हसली कि तिच्या गालावर दोन खळ्या पडायच्या.
हाय!... तिच्या एका हास्यात जवळ उभ्या असणाऱ्या पंचवीस -तीस मुलांची हृदये क्षणार्धात घायाळ व्हायची. तिच्या मजनूंच्या यादीमध्ये माझेही नाव होते कुठेतरी.
पण... पण.. ती माझी लैला नव्हती!.... माझी लैला माझ्या अगदी जवळ होती... पण मला ती त्यावेळी कधी दिसलीच नाही....
आजपासून साधारण पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट...97-98 च्या काळातली... मोबाइलचा 'मो ' पण आमच्या जवळ भटकत नव्हता.... ऑनलाईन स्टॉकिंग पेक्षा ऑफलाईनवरच सर्व भागायचे.... सुंदर ललनांचे थेट प्रक्षेपण रोज रोज बघायला कंटाळा पण यायचा नाही आणि त्यासाठी कॉलेजला जायची ओढही कायम राहायची..
त्यावेळी 'रोझ डे' ला कॉलेज स्टेशनरी शॉप मधून
'रोझ डे ' ची कार्ड विकत घ्यावी लागायची.... लाल, पिवळ्या , पांढऱ्या रंगांची.... आणि आपण ज्याला द्यायचे आहे त्या व्यक्तीचे नाव लिहून स्टेशनरी शॉप मध्ये ठेवलेल्या पेटीत जमा करायचे. मग नाव लिहिलेल्या व्यक्तीला ते कार्ड त्याच्या वर्गात वर्ग प्रतिनिधिमार्फत दिले जायचे.....
'रोझ डे ' ची कार्ड विकत घ्यावी लागायची.... लाल, पिवळ्या , पांढऱ्या रंगांची.... आणि आपण ज्याला द्यायचे आहे त्या व्यक्तीचे नाव लिहून स्टेशनरी शॉप मध्ये ठेवलेल्या पेटीत जमा करायचे. मग नाव लिहिलेल्या व्यक्तीला ते कार्ड त्याच्या वर्गात वर्ग प्रतिनिधिमार्फत दिले जायचे.....
मी ही ऐपतीप्रमाणे आमच्या ब्युटीक्वीनसाठी एक
'रेड रोझकार्ड ' खरेदी करून त्यावर एक सुंदर शायरी लिहून पेटीत जमा केले. तिला कळावे म्हणून खाली स्वतःचे नावही लिहिले..... न जाणो मदनेश्वरीची कृपा होईल व तिची नजर मज बापड्याकडे जाईल हीच अपेक्षा होती.
'रेड रोझकार्ड ' खरेदी करून त्यावर एक सुंदर शायरी लिहून पेटीत जमा केले. तिला कळावे म्हणून खाली स्वतःचे नावही लिहिले..... न जाणो मदनेश्वरीची कृपा होईल व तिची नजर मज बापड्याकडे जाईल हीच अपेक्षा होती.
काहीवेळाने आम्हा सर्वाना आपापल्या वर्गात बसण्यासाठी सांगण्यात आले कारण तिथे ज्याच्या नावाचे कार्ड जमा झाले आहे त्याला ते दिले जाणार होते. मी ही उत्सुकता म्हणून बसलो माझ्या वर्गात. म्हटलं, बघूया तरी आमच्या वर्गात किती जणींना व कितीजणांना रोझकार्ड मिळतायत?.. तसे मुलांना रोझकार्ड क्वचितच मिळायची... कारण बहुतेक मुली अभ्यासू... नाकासमोर चालणाऱ्या.... आमच्यासारख्या टवाळ मुलांवर निरर्थक पैसे खर्च करण्यात त्यांना अजिबात इंटरेस्ट नसायचा. पण कॉलेजसमोरच्या स्टेशनरी शॉपमधून चंद्रशेखर गोखल्यांचा चारोळी संग्रह पटापट खरेदी करण्यात त्यांना कोण आनंद मिळायचा.....
आम्ही सर्व टवाळ मुले शेवटच्या बाकावर बसून प्रत्येक रोझकार्ड होल्डरवर कंमेंट करत हसत बसलो होतो.
तेवढ्यात माझ्या नावाची घोषणा झाली.
तेवढ्यात माझ्या नावाची घोषणा झाली.
'श्रेयस कदम '
मी आश्चर्यचकीत झालो...
'हेsssई..' करत सर्व मुले किंचाळली व बाकांवर हात बडवू लागली.
मी ओशाळत काहीसा लाजत आणि शाहरुख सारखे स्वतःच्या केसांवर हात फिरवत पुढे झालो आणि कार्ड हातात घेतले.
सर्वांनी आग्रह करून कार्डमधला मेसेज वाचायला सांगितला....... मी पण एक कार्ड मिळाल्यामुळे शेफारून गेलो होतो. आयुष्यात मला पहिल्यांदाच कोणीतरी कार्ड दिले होते..... मी वाचू लागलो... कोर्टात असते तशी टाचणी पडेल इतकी शांतता वर्गात निर्माण झाली...... इतकी शांतता आमच्या इकॉनॉमिक्स च्या सर्वात कडक शिस्तीच्या भावे सरांच्या लेक्चरला पण नसायची..... माझ्या इतके सगळेच उत्सुक होते....मी वाचू लागलो.
"प्रिय श्रेयस ",
"हे s s इ "
किंचाळून सर्व शिट्या वाजवू लागले.
"तुझ्यासाठी..." मी पुढे वाचू लागलो.
"जिसपे हम मर मिटे
उसको पता भी नही
क्या गिला हम करे
वो बेवफा भी नही
हमने जो सुनलिया
उसने कहा भी नही
ए दिल जरा सोचकर.... प्यार कर."
उसको पता भी नही
क्या गिला हम करे
वो बेवफा भी नही
हमने जो सुनलिया
उसने कहा भी नही
ए दिल जरा सोचकर.... प्यार कर."
मी कमालीचा लाजलो... सगळ्या चष्मीश, स्कॉलर मुली मलाच बघत होत्या.... का बघत होत्या ते त्यांनाच ठाऊक!
परत शिट्या किंचाळ्या बाक बडवून माझ्या मित्रानी त्यांच्याकडे येत असलेल्या माझे स्वागत केले.
"अरे, श्रेयस कदम मध्ये 'दम 'आहे यार!" त्यातला एक म्हणाला.
"श्रेयस कोण आहे रे तुझी gf ?".दुसऱ्याने विचारणा केली.
"ए gf वैगरे नाही....आणि मलाच माहीत नाही तर तुम्हाला काय सांगू?"
आणि खरंच मला माहीत नव्हते कोण होती ती.... मी माझ्या वर्गात इकडे तिकडे बऱ्याच मुलींना संशयाने पाहू लागलो.
माझ्या वर्गातल्या बहुतेक मुली स्कॉलर वर्गात मोडणाऱ्या होत्या..... आणि काकूबाईना सुद्धा लाजवेल असा अंदाज होता एकेकीचा... कोणी मध्ये भांग पाडून एक वेणी घालून, कुणी घरात असेल नसेल इतके तेल थापून, तर कोणी जाड भिंगाचा चष्मा लावून महाविद्यालय नामक शाळेतील माझ्या वर्गात शिकत होते.
त्यांच्याकडे बघताना यांच्या आईवडिलांनी मुलींना महाविद्यालयात पाठवताना "अगं बाई तू आता शाळेत नाही तर कॉलेजमध्ये जात आहेस...." असे का नाही सांगितले या गोष्टीची मला चीड येत होती.
'छे! यातली कोणी असेल तर नाव न कळलेलं बरं. '
असे मी मनात म्हटले खरे पण तिला बघण्याची उत्सुकता माझ्या मनात कठोकाठ भरली होती.
कॉलेज सुटल्यावर आम्ही म्हणजे मी श्रेयस कदम उर्फ कदया , सुनील जाधव उर्फ शन्या, आदित्य शानबाग उर्फ अदया, प्रांजल सुर्वे उर्फ प्राज्या, विशाखा वैद्य उर्फ विशा आणि संदीप नेमाडे उर्फ सद्या आमच्या कॉलेज कट्ट्यावर एकत्र जमलो. आम्ही सर्व एकाच चाळीत राहायचो.... आणि कॉलेजही एकच होते.. त्यामुळे येणजाणही एकत्रच असायचे.
कॉलेज सुटल्यावर आम्ही म्हणजे मी श्रेयस कदम उर्फ कदया , सुनील जाधव उर्फ शन्या, आदित्य शानबाग उर्फ अदया, प्रांजल सुर्वे उर्फ प्राज्या, विशाखा वैद्य उर्फ विशा आणि संदीप नेमाडे उर्फ सद्या आमच्या कॉलेज कट्ट्यावर एकत्र जमलो. आम्ही सर्व एकाच चाळीत राहायचो.... आणि कॉलेजही एकच होते.. त्यामुळे येणजाणही एकत्रच असायचे.
ही सर्व मंडळी आजही माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत... आजही आम्ही काम धंदयातून वेळ काढून जेंव्हा एकत्र भेटतो तोच आमचा फ्रेंडशिप डे असतो..... आणि हो आजही आम्ही एकमेकांना याच नावाने हाक मारतो.
एकत्र जमल्यावर ग्रुपमधल्या मुलींनी त्यांना मिळालेल्या 'रोझकार्डची ' दाखवणी केली (म्हणजेच शो ऑफ केला). मुलांपैकी 'रोझकार्ड ' मिळालेला मी एकटाच होतो.... मला 'रोझकार्ड ' मिळालेले पाहून ग्रुपमधील सर्वाना आश्चर्य वाटले... त्यांनी माझ्या हातातले कार्ड ओढून घेत वाचावयास घेतले.... मी मात्र त्यांना सांगत होतो...
"खराब करू नका ... जरा हळू... जपून... माझ्यासाठी बहुमूल्य आहे हे."
"हे कदया... तुझी ड्रीमगर्ल शोधत बस आता कॉलेज मध्ये.!" कार्ड वाचून झाल्यावर सद्या ने कार्ड माझ्या हातात दिले.
"निदान तुझ्या लैलाने नाव तरी टाकायचे खाली." अदयाची उत्सुकता बळावली होती.
अदया आमच्या ग्रुपमधला सलमान खान! त्याकाळी जिम जॉईन करून बॉडी बनविली होती त्याने... साहजिकच आहे... माझ्या सारख्या किरकोळ शरीरयष्टीच्या मुलाला कार्ड मिळाले आणि त्याला नाही... असुया तर होणारच.
" कार्डचे पैसे फुकट घालविण्याचा भारी शौक दिसतोय हिला.......हे बघ... माझ्या सर्व फॅन्स नीं स्वतःचे नाव टाकले आहे कार्डखाली. " हातातील कार्ड दाखवत विशा म्हणाली.
"हो तर... माझ्यापण ......" प्राजाने दुजोरा दिला.
"असू दे.... असू दे.... सांगेल कधीतरी.... नाहीतर मीच शोधून काढेन."
मी माझ्या पहिल्या-वहिल्या चाहतीची बाजू घेत जरा आवाज चढवूनच म्हटले....
"ए कदया ...शोधशील आणि माहीत पडेल कोणी काकूबाई आहे." अदया जरा जास्तच बोलत होता.
यावर शन्या,सद्या एकमेकांना टाळी देऊन फिदिफिदी हसले. विशा आणि प्राजाने त्यांच्या हसण्याला विरोध दर्शवत त्यांच्याकडे रागाने पाहिले....
"असू दे.. काकूबाई असली तरी तिचे डोळे नक्कीच तेजस्वी असतील... माझ्यासारख्या हिऱ्याची पारख केली ना तिने." मी माझी कॉलर उडवत अभिमानाने म्हणालो.
क्रमशः
याचा पुढील भाग लगेचच पोस्ट केला आहे . कथा वाचून. कशी वाटली ते नक्की सांगा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा