Login

लैला भाग २

Lovestory
दुसऱ्या दिवसापासून मी शोधमोहिमेला लागलो. मला पारखणारी नजर कोणाची आहे ते पाहण्यासाठी... त्यादिवसापासून खूप फरक पडला होता.  वर्गातील बऱ्याचशा मुली स्वतःहून बोलू लागल्या.... मला नोट्स देऊ लागल्या..... माझे काम अजूनच कठीण झाले...प्रत्येक मुलीकडे मी संशयाने पाहू लागलो.... नोट्स देणाऱ्या मुलींना वगळू लागलो. कारण त्यांचे अक्षर जुळत नव्हते कार्डमधल्या अक्षराशी... मग ज्यांनी नोट्स दिल्या नाहीत त्यांच्या वह्या त्यांच्या नकळत पाहू लागलो.... काही मुली मी वही पाहायच्या आतच ओढून घेऊ लागल्या.... मग त्यांना हॉटलीस्टमध्ये ठेवले..... त्यातल्या दोघींवर माझा संशय बळावला.. ... कारण त्यातली एकतर मला टक लावून बघत बसायची.......... तिचे नाव होते 'अश्विनी साने'.  हुशार होती.. पण थोडी काकूबाईच होती.. आणि दुसरी होती 'स्मृती ठाकूर '... ती सिंगर होती. हिंदी गाण्यांचा शौक होता तिला. रोझकार्डमध्ये दिल तो पागल है चित्रपटातील गाण्याचे कडवे लिहिले होते... ते गाणे तिने कॉलेजच्या गाण्याच्या स्पर्धेत गायले होते.... आणि तिला प्रथम पारितोषिक मिळाले होते..... तिचे अभिनंदन करणाऱ्यांत मी सर्वात पुढे होतो... तिने हसून धन्यवाद बोलत ते स्वीकारले होते.

आता मी या दोघींच्या वह्या मिळविण्याच्या प्रयत्नांत होतो.... त्यांची अक्षरे मला तपासायची होती.

रि्सेस मध्ये जेंव्हा त्या लेडीजरूम मध्ये गेल्या तेंव्हा मी त्यांच्या पर्समधून गुपचूप वह्या चोरल्या व माझ्या बॅगेत ठेवल्या..... त्यावेळी शीताफिने केलेल्या चोरीचा आजच्या माझ्या पोलीस खात्यातील नोकरीत फार फायदा झाला.

मी वह्या घेऊन बाजूच्याच वर्गात असणाऱ्या प्राजूच्या बॅगेत ठेवायला दिल्या.... कारण मला माहीत होते.... वह्या हरवल्या आहेत हे समजल्यावर त्या दोघी माझ्यावरच संशय घेतील.... कारण याआधी माझी चोरी त्यांनी रंगेहात पकडली होती...... आणि झालेही तसेच... दोघीनीही माझी बॅग तपासली पण वह्या प्राजाकडे दिल्यामुळे मी बचावलो.

माझ्या या कृतीचा फायदा झाला आणि माझी ' लैला '. मला भेटली...... काय वाटते तुम्हाला या दोघींपैकी कोण होती माझी लैला?... अश्विनी साने कि स्मृती ठाकूर?.......... सापडेपर्यंत माझा दाट संशय स्मृतीवरच होता.

कॉलेज सुटल्यावर मी घाईघाईत प्राजाच्या वर्गात गेलो. आणि तिच्याकडून दोन्हीही वह्या घेतल्या. स्वतःच्या खिशातून 'रोझ कार्ड ' काढून मी अक्षर तपासणी करू लागलो.....

माझा अंदाज खरा होता....'अश्विनी साने ' नव्हती ती!.... का कोणास ठाऊक मला हायसे वाटले..... मी स्मृती ठाकूरची वही हातात घेतली व माझ्या हृदयातील धडधड वाढली.

"प्राजा, मला धडधडतंय.... उघडू का वही?"

तिने मान हलवून हो सांगितले..

मी धडधडत्या अंत:करणाने  वही खोलली.... आणि आणि....

"माझी लैला सापडली!..... स्मृती ठाकूर...." अक्षर तंतोतंत जुळत होते..... माझ्या डोळ्यात आनंद होता.... इतक्या दिवसांचे श्रम कामी आले होते.... माझ्या ड्रीमगर्लला चेहरा मिळाला होता.

"Yes! Yes! Yes!"

हातातली वही उंचावत मी उडीच मारली.. आणि वही माझ्या हातातून खाली पडली. मी वही उचलायला खाली वाकलो आणि.... आणि स्तब्ध झालो.... मी वही उचलली..... वहीवरचे नाव वाचले आणि प्राजाकडे पाहत राहिलो.... तिच्या डोळ्यात अश्रू होते.... आनंदाश्रू... कारण इतके दिवस..... नाही... इतकी वर्षे तिने जे मनात ठेवले होते... ते मला समजले होते..

माझी लैला, स्मृती नव्हती.... ती प्राजा होती.  माझी प्राजा.... सकाळी सकाळी मला बोलावणारी.. माझी तासनतास वाट बघायला तयार असणारी.... मी कितीही चिडलो तरी कधीच न रागावणारी... माझा शब्द झेलणारी...

माझ्या डोळ्यांसमोर तिच्या आठवणींच्या चित्रफिती एकामागून एक येऊ लागल्या.... काय बोलावे...समजत नव्हते... वही बाजूला ठेवून तिचे हात मी हातात घेतले कधीही न सोडण्यासाठी... आणि तिचे अश्रू माझ्या डोळ्यांतून वाहू लागले.

आजही तशीच आहे... माझी प्राजा... माझी सहधर्मचरिणी.... माझ्या मुलांची आई.... माझी लैला.

समाप्त

कथा आवडली असल्यास मला फॉलो नक्की करा. अशाच छान छान कथा वाचण्यासाठी सबस्क्राईब करा.
0

🎭 Series Post

View all