प्रथम सत्र परीक्षा संपत आली आणि दिवाळीचे वेध लागले. जाधव मॅडम दरवर्षी शाळेत मोठ्या उत्साहाने वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करत असत. मोठ्या गावात असलेली त्यांची जिल्हा परिषद शाळा पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. इयत्ता चौथीच्या वर्गशिक्षिका सुनंदा जाधव म्हणजे मुलांच्या लाडक्या जाधव बाई.
"मुलांनो,उद्या शेवटचा पेपर आहे. त्यानंतर आपण तीन दिवस वेगवेगळे उपक्रम घेणार. पण त्याची सुरुवात म्हणून आज तुम्ही माझी दिवाळी ह्या विषयावर लिहून आणायचे आहे."
दुसऱ्या दिवशी सकाळी शाळा भरली आणि बाईंनी सगळ्यांना पेपर लिहायला दिला. शेवटचा पेपर लिहून झाला.
"चला आता सगळ्यांनी काळ सांगितलेला अभ्यास दाखवा." सगळ्यांनी वह्या बाहेर काढल्या.
"आपण एक काम करूया,तुम्ही स्वतःच लिहिलेले वाचून दाखवा."
बाईंनी मुलांना असे सांगितल्यावर समर्थ थोडासा बिचकला.
"बाई मी दाखवू का वाचून?"
नक्षने विचारले.
नक्षने विचारले.
बाईंनी संमती देताच नक्ष वाचायला उभा राहिला. त्याने भरपूर काय काय लिहिले होते. एकामागोमाग एक मुले वाचत होती. दिवाळीतील फराळ,किल्ला, नावे कपडे फटाके अशी नुसती आनंदाची उधळण मुलांच्या लिखाणातून जाणवत होती.
इतक्यात बाईंचे लक्ष एकदम गुपचूप बसलेल्या समर्थकडे गेले.
"समर्थ आता तू वाचून दाखव बरं."
बाईंनी त्याला उठवले.
बाईंनी त्याला उठवले.
"बाई,मी लिहायला विसरलो."
त्याने अपराधी आवाजात उत्तर दिले.
त्याने अपराधी आवाजात उत्तर दिले.
" नाही बाई, लिहिल आहे त्याने."
शेजारी बसणारी काव्या मोठ्याने म्हणाली.
शेजारी बसणारी काव्या मोठ्याने म्हणाली.
"अरे मग वाचत का नाहीस?"
बाई त्याच्याजवळ गेल्या.
बाई त्याच्याजवळ गेल्या.
"समर्थ तू लिहिले आहेस ना?"
त्याने होकारार्थी मान डोलावली.
"बाई, नको ना?"
त्याचे डोळे पाण्याने भरले.
त्याने होकारार्थी मान डोलावली.
"बाई, नको ना?"
त्याचे डोळे पाण्याने भरले.
बाईंनी वही घेतली आणि वाचायला सुरुवात केली.
"काल बाईंनी माझी दिवाळी असा अभ्यास दिला. काय लिहू? दिवाळी म्हणजे किल्ला, फराळ, पणत्या, छान छान कपडे. सगळे असच लिहितील.
माझी दिवाळी पण अशीच तर असायची. बाबा होते तोपर्यंत. पण बाबा गेले आणि सोबत दिवाळीदेखील गेली.
माझी आई घरूनच फराळ विकायचा छोटा उद्योग करते.पण ह्या गावात तो खपणार तरी किती?
म्हणून मी ठरवलं आहे. मी आईजवळ अजिबात हट्ट करणार नाही. मागच्या वर्षी बाबांनी आणलेला कंदील कालच पुसून ठेवला आहे मी.
आई आणि बाबांनी घेतलेला ड्रेस थोडा छोटा झालाय पण तोच घालणार मी."
बाईंना पुढे वाचावे वाटेना. लहानग्या समर्थला पोटाशी धरून बाईंनी अश्रू मुक्तपणे वाहू दिले.
त्यांना तेव्हा डोळ्यावर दिसत होती दिवाळीच्या दिवशी भाजीची पाटी डोक्यावर घेऊन दारोदार फिरणारी आई आणि तिच्या मागे फिरणारी छोटी सुनंदा.
अस्वस्थ मनाने जाधव बाई बाहेर पडल्या. आज आपण नोकरी करत सुरक्षित जीवन जगतो. समर्थसाठी काय करायचे? त्यांना सुचतच नव्हते. बाईंनी त्यांची गाडी काढली आणि घरी जायला निघाल्या. शहरात प्रवेश करत असतानाच लांबून फलक दिसला दिवाळी प्रदर्शन आणि बाईंचे डोळे चमकले.
दुसऱ्या दिवशी जाधव मॅडम मुख्याध्यापक सरांशी बोलल्या.
"मॅडम कल्पना छान आहे.पण त्यासाठी व्यवस्था?"
"सर मी दुपारपर्यंत सांगते."
बाईंनी समर्थाच्या वहीचा फोटो आणि त्यांची कल्पना पालकांच्या ग्रुपवर टाकली.
बाईंनी समर्थाच्या वहीचा फोटो आणि त्यांची कल्पना पालकांच्या ग्रुपवर टाकली.
दुपारपर्यंत सगळी व्यवस्था झाली देखील. कोणी मंडप,कोणी लाईट अशी पटापट जबाबदारी उचलली.
आता प्रश्न उरला जाहिरातीचा. बाईंनी एक छानसा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला.
दुसऱ्या दिवशी शाळेच्या प्रांगणात छोटे व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या वस्तू विकण्याचे प्रदर्शन भरले होते. शहरातून गावातून दोन दिवस प्रचंड प्रतिसाद लाभला होता.
चौथीच्या मुलांनी बाईंनी शिकवलेले आकाशकंदील विकायला ठेवले होते.
दोन दिवसांनी प्रदर्शन संपले. प्रत्येक व्यावसायिक शाळेचे आभार मानत होता. सगळ्यात शेवटी समर्थची आई आली.
"बाई, खऱ्या अर्थाने दिवाळी गोड व्हईल. लेकराला चार घास खायला घालीन. मी अशी दहावी नापास कसं होणार काळजी वाटायची पण तुम्ही देवाच्या रूपाने धावून आला. भरपूर ऑर्डर पण मिळाल्या आजुन."
सगळे बाईंचे कौतुक करत होते. तितक्यात चौथीच्या मुलांनी एक पाकीट हातात दिले.
"बाई, ह्यात आम्ही विकलेल्या आकाश कंदिलांचे पैसे आहेत. आपण त्यातून गरीब मुलांना मदत करूया."
मुलांचे ऐकले आणि मुख्याध्यापक सर म्हणाले,"शाब्बास, म्हणतात ना, पेराल तसे उगवते."
जाधव बाईंचे प्रचंड कौतुक होताना त्यांना मात्र दिसत होती भाजीची पाटी खाली ठेवून हसणारी आई आणि नवा फ्रॉक घालून आनंदाने नाचणारी छोटी नंदा.
दिवाळीच्या आधीच कितीतरी प्रकाशाचे दीप अनेक मनात उजळून एक नवा प्रवास सुरू झाला होता.
एका शाळेने राबवलेला उपक्रम पाहूनच वरील कथा सुचली.
कथा आवडली असल्यास लेखकाचे इतर लेखनही आवडेल.
माझी प्रकाशित कादंबरी शापित अप्सरा हवी असल्या खालील क्रमांकावर संपर्क करा.
प्रशांत कुंजीर 9271440112
माझी प्रकाशित कादंबरी शापित अप्सरा हवी असल्या खालील क्रमांकावर संपर्क करा.
प्रशांत कुंजीर 9271440112
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा