लक्ष्मी आली दारा अंतिम भाग

लक्ष्मी
मागील भागात आपण पाहिलं की रियाला तिच्या चुकीची जाणीव झाली आहे, आणि ती सासु चा पदर पकडून रडत होती....... आता पाहूया पुढे.....,


आपल्या सासू च्या मनाचा मोठे पणा पाहून तिला खूप रडायला आलं....ह्या देवमाणसांशी आपण आपल्या आई च्या सांगण्या वरून असं वागलो ह्या गोष्टीचा तिला प्रचंड पश्चाताप झाला आणि तिला अजून रडायला आलं ...


"अरे बाळा.. शांत हो.......रडू नकोस.....अग ओली बाळंतीण आहेस तू.....अजून टाके देखील निघाले नाहीत रडू नकोस बाळा रडू नको........."


तिचे डोळे पुसत विद्या रिया ला म्हणाली, आणि तिचं लक्ष समोर गेलं तर रिया चे आई वडील तिथून कधी निघून गेले होते कुणाच्या लक्षात आलं नव्हतं..... रिया आणि तिच्या सासू च्या गोंधळात ते दोघेही न सांगता निघून गेले..... कारण एक तर कुणाची सेवा करायला रिया च्या आई ला जमलच नसत, तिच्या कडे तेवढा वेळ पण नव्हता म्हणा आणि दुसरे म्हणजे रिया वर आता तिच्या सासू चा असर झाला आहे आणि त्यामुळे आपली डाळ काही इथे आता शिजणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी चालता पाय काढला होता.....


ते पाहून विद्या रिया ला म्हणाली..,

" रिया बाळा तुझे आई बाबा "

"गेले ते पण चांगल झालं माझ्या चुकीची जाणीव मला झाली आहे.... आई च्या बोलण्यात येऊन मी तुमच्या बद्दल चुकीचा विचार केला आणि तशी वागली सुद्धा.... आजपासून तुम्हीच माझे आई बाबा "


असं म्हणून रिया विद्याला बिलगली.....


********************************

यथावकाश योग्य वेळी रिया चे टाके काढण्यात आली आणि बाळाची तब्येत अगदी उत्तम होती हॉस्पिटल मधून डीचार्ज देण्यात आला....तोपर्यंत श्रीधर रावांनी सगळ्या औपचारिक गोष्टींची पूर्तता केली होती.....


श्रीधर रावांनी कॉल करून आदित्य ला सुद्धा ही बातमी दिली होती.... पण वेळेवर तिकीट न मिळाल्या मुळे त्याच येण लांबल होत......


आदित्य दौऱ्यावर परत आला, घरी जाऊन परत हॉस्पिटल ला जायला निघाला तेव्हा त्याला त्याचे घरमालक भेटले..... त्यांनी त्याच्या आई वडिलांनी काय काय केल हे सांगितलं...... आदित्य सुद्धा त्यांच्या पासून दूर राहून खुश नव्हता..... फक्त रिया ची कटकट थांबल्याच समाधान होत त्याला.....त्याची इच्छा असून देखील रिया च्या धमकी मुळे त्याने ती गरोदर असल्याच त्यांना सांगितलं नव्हत... पण आज घरमालकांकडून सगळं ऐकून आता रियाच काहीही ऐकायचं नाही हे त्ताने ठरवलं...... आणि आपल्या लेकीला पाहायला हॉस्पिटल मध्ये गेला...


त्यावेळेस त्याची आई रियाला भरवत होती..... त्याला कोणत्या तोंडाने आई जवळ जाऊ समजत नव्हतं..... पण आईच्या चेहऱ्यावरची प्रेमळ आणि रियाची त्यांच्या प्रति असणारी वागणूक बघून तो पटकन पुढे गेला आणि लगेच आपल्या आईच्या पाया पडला त्याबरोबर विद्याने त्याला आपल्या जवळ घेतलं आणि त्याची माया मोडली......त्याला सुद्धा भरून आलं होत.....रियाला सुद्धा ते पाहून बर वाटल.... एका चुकी तर भरपाई झाली.... हळू हळू सगळ्या चुका सुधारु..... असं तिने मनाशी ठरवलं......



थोड्या वेळाने तो शांत झाल्यावर विद्या ताई म्हणाल्या.....,


" आदित्य..., आता डिस्चार्ज मिळाला आहे.... सगळ्या फॉर्मॅलिटी सुद्धा झाल्या आहेत.... तेव्हा तू रिया आणि छकुलीला घरी घेऊन जा.... काळजी घे दोघींची...... "


ह्यावर आदित्य काही बोलणारच की रिया म्हणाली.....,..


" पण आई बाळाला आता स्वतःच्या घरी राहायचं आहे, आपल्या आजी आजोबा सोबत, तिला भाड्याच्या घरात राहायचं नाही आहे.... "


हे ऐकून आदित्य, विद्या आणि श्रीधर राव तिघांनाही खूप आनंद झाला... त्यांनी हसतच माना डोळावल्या...


त्यानंतर सगळेच बाळासोबत आपल्या घरी आले आता तर त्या घरात आनंद होता......

घरी आल्यानंतर विद्याने छकुली आणि रियाला त्यांच्या खोलीत पाठवून आराम करायला सांगितला आणि स्वतः ने किचन चा ताबा घेतला.... श्रीधर रावांना बाजारात पाठवून तिने काही सामान मागवून घेतले...

किचन मधून मस्त खमंग वास यायला सुरुवात झाली होती.... रिया ने विचारलं सुद्धा पण संध्याकाळी तुला समजेल आणि तू आता फक्त आराम कर असं सांगून त्यांनी तिला पाठवून दिल..... त्यानंतर दुपारचं जेवून विद्या ताईंनी परत रियाला छकुली सोबत आराम करायला सांगून स्वतः बाजारात गेली आणि जाताना तिने दरवाजाला कुलूप लावल.... जेणेकरून रियाला कुणी त्रास देऊ नये.....


इकडे रीयाची झोप झाली तेव्हा संध्याकाळ झाली होती.....ती उठूनबघते तर तिच्या खोलीत काही पणत्या लावल्या होत्या..... ती तशीच बाहेर आली तर तिला जाणवलं की आज नेहमीपेक्षा अधिक प्रकाश होता आहे..... पणत्या च्या उजेडात सगळं घर उजळून निघालं आहे.......पूर्ण घरात दिवाळी सारखा आनंद होता..... ती बाहेर आली तर विद्या ताई अंगणात रांगोळी काढत होत्या.... ती त्यांना कुतूहलाने म्हणाली.....,

" आई हे काय....? दिवाळी तर झाली ना? "


तस उठून तिच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवत विद्या ताई म्हणाल्या,,,,,,

"पण माझी मुलं एका वर्षाने माझ्या घरी आली आणि सोनपावलानी माझी सोनुली लक्ष्मी माझ्या दारात, घरात आली आहे..... मग माझी दिवाळी आताच असणार ना.........."


ते ऐकून रियाला भरून आलं....त्यावर परत त्या म्हणाल्या......


"ऐक ना रिया थोड्या वेळासाठी  मी तुमच्यासाठी ठेवले नवीन कपडे तु आणि छकुली घालून या...... मी आणि बाबा सुद्धा रेडी होतो... आदित्य ला ही सांग...."


एवढं बोलून त्या आत मध्ये गेल्या...  काही वेळाने सगळे च तयार होऊन बाहेर आले..... तस विद्या ने रिया व छकुलीला ओवाळले...... आज सगळं काही उजळून आलं होत... रिया च्या मनातलं किल्मीश दूर झालं होत...... आणि विद्या च्या दारात लक्ष्मी आली होती.........यापुढे सगळंच छान होणार होत......
समाप्त

🎭 Series Post

View all