लाल भोपळ्याचे सुप
साहित्य : लाल भोपळा शंभर ग्रॅम, दोन चमचे अमूल बटर, एक लहान कांदा बारीक चिरलेला, काळीमिरी पावडर अर्धा चमचा किंवा मग पाच ते सहा काळे मिरे बारीक कुटून घेणे, आल लसून पेस्ट, लाल मिरची पुड अगदी थोडीशीच, मीठ चवीनुसार.
कृती : १) कुकरमध्ये बटर घालून त्यात बारीक चिरलेला कांदा परतवणे.
२) आता आल लसूण पेस्ट घालून परतवणे.
३) नंतर त्यात काळीमिरी पुड घालणे.
४) आपल्या आवडीनुसार लाल मिरची पुड घालून एकत्र करुन घेणे.
५) भोपळ्याचे साल काढून बारीक फोडी करुन त्या घालून एकत्र करणे.
६) चवीनुसार मिठ घालणे.
७) आवडत असल्यास पुदिना किंवा कोथिंबीर घालावी.
८) आता त्यात दोन कप पाणी घाला.
९) कुकरचे झाकण लावून दोन शिट्ट्या कराव्यात. भोपळा लवकर शिजतो.
१०) आता कुकर थंड झाल्यावर मिश्रण ब्लेंडरने एकजीव करणे किंवा मिक्सरमध्ये जरासेच फिरवून घेणे.
गरमागरम भोपळ्याचे सुप तयार आहे. वरतून पुन्हा काळीमिरी पावडर, लाल मिरची पावडर आवडत असेल तर घालावी. तुम्हांला आवडत असेल तर त्यात फ्रेश क्रिम घालू शकता.
किचन तुमचे आणि रेसिपी माझी. रेसिपी आवडल्यास नक्की करून बघा.
अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला वाचत रहा आणि कमेंट करायला विसरू नका.
धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा