Login

शेवटची भेट.

अर्जुन अवनीच्या प्रेमाची गोष्ट
चॅम्पियन ट्रॉफी 2025
शेवटची भेट..


अर्जुनचे रिपोर्ट अवनीच्या हाती लागले होते, आणि ते पाहुन तिला मोठा धक्काच बसला होता, "कदाचित ह्याचसाठी अर्जुन माझ्यापासून लांब जातोय..? " ती स्वतःशीच पुटपुटली.

आजपर्यंत तिला कळत नव्हतं लांब जाण्याचं कारण, पण आता ती त्याला जाब विचारणार होती पण ती हे कसं सांगणार होती कि तिला त्याच्या आजारबद्दल कळलं आहे.

अर्जुन वशी वाद झाल्यामुळे ती तिच्या माहेरी गेली होती, तिचे आई वडील अर्जुनच्या ह्या वागण्याने त्याला अनेक शिव्याश्राप देत होते. पण ते नकळत..

" कायं गं सकाळी सकाळी कुठे निघालीस..? " अवनीची आई तिला मध्येच टोकते.

" अगं काही नाही आई, ते जरा महत्वाचं काम आहे त्यासाठी जातेय.. " अवनीचा मुड फारच खराब दिसत होता.

" इतकं महत्वाचं कायं काम..? अगं आपल्याला आज वकिलाच्या ऑफिसला जायचं आहे माहित आहे ना..? " बाबा अवनीच बोलणं ऐकतात आणि तिला विचारतात.

" बाबा अहो माझं काम महत्वाचं आहे, वकिलाकडे जाण नाही.. " ती तडकाफडकी उत्तर देते.

हे ऐकताच अवनीची आई अधिकच भडकते, "कायं बोलतेस अवनी तु, आणि कस उत्तर देतेस..? आम्ही तुझ्या भल्यासाठी बोलतोय आणि तु...?"

" मंदा.... मंदा... अगं शांत हो पाहू आधी... " बाबा मंदा ( आईला ) शांत व्हायला सांगतात.

"बरं... अवनी तु तुझं काम कर आधी मग ठरवू कधी जायचं ते... काम आधी महत्वाचं.." बाबा कसंबसं आईला शांत करतात.

अवनी लगेचच खांद्याला बॅग लावून घरातुन तडक निघते..
जाता जाता ती अर्जुनला कॉल लावण्याचा प्रयत्न करत असते पण समोरून अर्जुन सारखे तिचे कॉल कट करत होता, " कॉल का कट करतोय..? " अवनी वैतागून स्वतःशीच पुटपुटते.

ती पुन्हा पुन्हा त्याचा कॉल लावत असते, शेवटी अर्जुन तिचा कॉल उचलतोच, " अरे कायं किती कॉल करशील..? नाही उचलत तर समजत नाही का..? " अर्जुन कॉल घेताच तिच्यावर भडकतो.

" चिडतोयस किती..? आणि का कशाला..? कॉल केले म्हणुन..? कि अजुन काही..? " अवनी त्याला जाबच विचारते..

पण ती शांत होते, आणि त्याला ही शांत करते

" अरे अर्जुन हा सगळा आटापिटा कशासाठी..? " अवनी विचारते.

" हे बघ आपला डिवोर्स होणार आहे, त्यामुळे तु मला कॉल करू नकोस.. " अर्जुन बोलतो.

ती हे ऐकताच लांब श्वास घेते, " डिवोर्स कोणाचा आपला...? तो अजून झाला नाहीये. " ति शांतपणे बोलते.

" मला भेटायचं आहे, प्लीज तु मला आपल्या रोजच्या ठिकाण्यावर भेट.. " अवनी त्याला भेटण्यासाठी बोलते.

" मला नाही भेटायचं, आणि तु मला ह्यापुढे भेटण्यासाठी कॉल करू नकोस.. " असं बोलुन अर्जुन फोन कट करतो.

कट केलेला फोन पाहुन अवनी मनोमनी चिडते, पण ती काहीच करू शकत नव्हती कारण पुढ्यात येऊन ठेपलेली परिस्थिती आता हाताच्या बाहेर गेली होती.
पण ती मोठा आवंढा गिळते, जणु ती स्वतःलाच दोष देत होती. रडत होती, स्वतःवर चिडत होती, ती एका क्षणाचा ही विचार न करता त्याला तडका फडकी एकटं सोडुन आली होती.

ती पुन्हा कॉल लावते, पण तो पुन्हा कॉल कट करतो. ती नाईलाज म्हणून त्याच्या ऑफिसमध्ये जाण्याचा निर्णय घेते, " ऑफिसमध्ये गेली तर तो भेटायला टाळाटाळ नाही करणार.. " ती स्वतःशीच पुटपुटते..

संध्याकाळ होते, ती बरोबर सातच्या ठोक्याला त्याच्या ऑफिसच्या खाली जाऊन थांबते. तो आता येईल, ह्या आशेच्या नजरेने त्याच्या ऑफिसच्या गेटकडे पाहत असते.

" अजून आला कसा नाही..? त्याला कॉल लावुन पाहते." ती चलबिचल होते आणि बॅगमधला फोन काढून कॉल लावते.

बराच वेळ अर्जुनच्या फोनची रिंग जाते, ती अस्वस्थ होते.
कायं करू कायं नाही हे तिला सुचत नव्हतं.
" एक काम करते, त्याच्या ऑफिसला वर जाते. कदाचित कामामुळे उशिरा सुटत असेल, त्याची सवयच आहे ती. " एक लांब श्वास घेते आणि ती स्वतःशीच पुटपुटते..

भरा भर पाऊले उचलते, जिने चढून ती शेवटी त्याच्या ऑफिसला पोहचते. तेवढ्यात ऑफिसचा वॉचमन तिला अडवतो," ऑफिस बंद झालंय, कोणाला भेटायचं आहे तुम्हाला..? " वॉचमन विचारतो.

" ऑफिस बंद झालं..? अहो अजून पूर्ण स्टाफ बाहेर थोडी आला आहे..?" वॉचमनच बोलणं ऐकुन तिला फारच राग येतो.

" अहो मॅडम कोणाबद्दल विचारत आहात तुम्ही..? " वॉचमनकाका तिचा राग पाहुन शांतपणे तिला विचारतात.

" अर्जुनबद्दल, मी त्याची बायको.. तो कॉल उचलत नाही म्हणुन म्हटलं इथे यावं.. पण तुम्ही म्हणतायतं सगळा स्टाफ निघाला मग..? " अवनी स्वतःहून शांत होते.

" अच्छा अर्जुन.. अहो मॅडम त्यांनी ऑफिस सोडलं काही महिन्या पूर्वी.. " वॉचमन काका तिला बोलतात.

त्यांच हे बोलणं ऐकुन तिला धक्काच बसतो," काही महिन्यापूर्वी... म्हणजे... सोडलं म्हणजे..? कुठे दुसरी कडे जॉब लागला का..? " अवनी पुन्हा त्यांना विचारते.

" अहो तस नाही, सोडल म्हणजे त्यांच्या तब्बेतीमुळे ते येऊ शकत नाही असं ऐकलं मी.. कॅन्सर आहे म्हणे त्यांना.. " काका बोलतात.

काका बोलत असताना तिच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी येतं, ती पुसत असते.

"बरं बरं.." काका बोलतात.

" तो आता कुठे असेल, कायं झालं असेल काहीच माहित नाही.. घरी सुद्धा जाऊ शकत नाही..कायं कराव सुचत नाही.. " अवनी स्वतःशीच पुटपुटते..

ती ऑफिसच्या खाली येते, तेवढ्यात तिला अनोळखी नंबर वरून कॉल येतो. ती फोन उचलते आणि कानाला लावते, समोरून येणार बोलणं ऐकुन तिचं भान हरपतं
पण काही क्षणात ती भानावर येते, " रिक्षा... रिक्षा.." हाकेने रिक्षा येऊन समोर थांबते.

तिच्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहत होत्या, ती पुसत होती.

काही वेळाने रिक्षा हॉस्पिटल समोर येऊन थांबते, ती घाई घाईत पैसे देते.. आणि धावत हॉस्पिटलच्या आत येते..

समोर रिसेपशन काउंटर असतं, ती धावत जाऊन चौकशी करते.तिला काउंटर वरून तिसऱ्या मजल्यावर जायला सांगतात, ति कशी बशी घाबरत घाबरत मजल्यावर पोहचते..

समोरच तिची सासु उभी असते, " तु...? तु इथे कशी...? तुला कोणी बोलावलं...? तुझी इथे काहीच गरज नाही, सोडून गेलीस तिथेच मेलीस.. " अर्जुनची आई तिला घालुन पाडून बोलते.

" मी बोलावलं तिला, तु शांत रहा.. " मध्येच अर्जुनच्या बाबांचा आवाज आला.

अर्जुनची आई म्हणते, " अहो तुम्हाला कळतं का , ती आपल्या मुलाला सोडून गेली आणि आता त्याच्या शेवटच्या क्षणाला इथे आली.. कायं तर काळजी दाखवायला..? " अर्जुनची आई फारच चिडलेली असते.

" अहो आई... तुम्ही गैरसमज करत आहात .. मी नाही..इथे..." आणि अवनी रडायला लागते..

" तु काहीच बोलु नकोस अर्जुन तुझी आत वाट पाहतोय.. " आणि अर्जुनचे बाबा त्याच्या रूमकडे बोट दाखवतात..

ती तशीच आत जाते, अर्जुनच्या अंगावर खुप सारे मेडिकल वायर लावलेले असतात..
चेहऱ्यावर ऑक्सिजन मास्क असत, व्हेंटिलेटर चालु असत.

ती त्याच्या बेडजवळ ठेवलेल्या टेबल
वर बसते, त्याचा हात हाती घेते, " अर्जुन.. अर्जुन... " दाटून आलेल्या कंठातुन ती त्याला आवाज देते.

अर्जुन डोळे खोलतो, धूसकट असलेला अवनीचा चेहरा त्याला अस्पष्ट दिसतो.
" मी चुकले तुला सोडुन जायला नको पाहिजे मी, पण म्हणालास म्हणुन.. आणि का म्हणालास ह्याचं उत्तर आज मिळतंय... पण त्याचा उपयोग काय तु जातोयस पण माझ्यातली मी खऱ्या अर्थाने संपणार... " अवनी रडत रडत सारं काही बोलत होती..

त्याने तिचा हात घट्ट पकडला होता, ती आजूबाजूची शांतता भकास, भयाण वाटत होती.

बराच वेळ अर्जुनच्या खोलीतुन काहीच चाहूल नाही म्हणुन अर्जुनचे बाबा आत येतात, अवनीला त्याच्या जवळ डोकं टेकलेलं पाहुन ते तिला हाक मारतात, " अवनी... बाळा अवनी.. " पण ती काहीच हालचाल करत नाही म्हटल्यावर ते घाबरतात..

तब्बल एक वर्षानंतर, त्याच बेडवर त्याच रूम मध्ये अर्जुन वच्या जागी अवनी असते..

अर्जुनच्या जाण्याने तिला मोठा धक्का बसला होता, पण नितांत प्रेम, जीव.
त्यात मात्र अवनी अर्जुनला सोडुन तेव्हाच निघून गेली.. शरीराने मात्र शेवटची भेट घेतली होती..
जाताना तो मात्र तिला सोबत घेऊन गेला होता.