लावण्या भाग 1

रात्रीचे एक वाजत आले होते...
भाग १

रात्रीचे एक वाजत आले होते. पावसाच्या सरी झपाटल्यागत त्या सुनसान डांबरी रस्त्यावर धो धो कोसळत होत्या. मधेच मेघ गर्जनेसह थिरकणारी दामिनी, पावसाला आणखीच भयानक रुप देतं होती. रस्त्याच्या कडेला पांढऱ्या सिमेंटच्या खांबावर मर्यादित उजेड घेऊन उभे असणारे दिवे देखील चुरचुरत होते....
अरुंद होत गेलेल्या रस्त्याच्या शेवटी दोन पिवळे डोळे लुकलुकले. हळुहळु ते जवळ येतं त्यांचा आकार मोठा झाला. एक पॉश ब्लॅक मर्सिडीज वेग मंदावत त्या दिव्याच्या प्रकाशात येऊन थांबली. मागून एक व्यक्ती गडबडीत हातात छत्री घेऊन धावत पूढे आली आणि मान खाली घालून त्या व्यक्तीने फ्रंट डोअर ओपन केला तोच एक हात डोअर वर आला... धाडकन त्याने डोअर बाजूला केला तशी ती व्यक्ती धक्का लागून जराशी कोलमडली... पण तोंडातून ब्र शब्द देखील न काढता ती निमूटपणे खाली मान घालून उभी होती.
फॉर्मल सूट बुट अन् ड्रेसप... केस मागे चोपून बसवलेले... खुरटी दाढी...धारदार नाक... डोळयात जणू पेटलेला अंगार... कदाचित भरपूर ड्रिंक केलं असावं... उजव्या हातात पेटलेला सिगारेट अन् ओठांचा चंबू करून धूर ओकणारा तो... कुणी बडी हस्ती किंवा बिझनेसमन असावा... जवळजवळ तिशीच्या आसपास...

"बाहेर घ्या तीला" तो गरजला तसा त्याच्या डोक्यावर छत्री घेऊन उभा तो माणूस देखील थरथर कापू लागला. त्या आवाजात हुकूम, जरब, दरार सगळचं होत... मागच्या डोअर मधून दोन व्यक्ती बाहेर आल्या. त्यांनी एका तरुणीला दोन्हीं बाजूंनी धरून ठेवले होते. त्या तरुणीच्या तोंडाला सेलोटेप चिटकवला होता. तिचे डोळे रडून रडून सुकले होते. केस विस्कटले होते. अंगातला चुडीदार अस्ताव्यस्त झाला होता. कदाचित सुटकेची तीने बरीच धडपड केली असावी. ती अजुनही हुंदके देत होती. तिच्या काळ्याभोर डोळयात द्वेष दिसत होता. ती रागाने धुस्मुसत नाकपुड्या फुगवून त्याला बघत होती. अन् तो मात्र तिच्याकडे पाहून कुत्सित हसत होता.

      "बोल... आहेस तयार माझ्याशी लग्न करायला?" तिच्या जवळ येत तो हळुवार उद्गारला. तिच्या तोंडाला चिटकवलेला सेलोटेप त्यानं चरकन ओढून काढला तशी ती वेदनेने व्हिवळली.


       "नाही... कधिच नाही... जीव देईन पण तुझ्याशी लग्न करणार नाही. अरे समजतोस काय स्वतःला. तुझ्या पैशाचा माज माझ्या पूढे चालणार. तुझ्या या बाह्य रुपाची भुरळ मला कधिच पडणार नाही. बऱ्या बोलान सांगतेय माझा पिच्छा सोड..." ती अगदीच त्वेषाने बोलत होती. लाल चुटूक ओठ, काळेभोर डोळे, दाट पापण्या, नाक तर जणू चाफ्याची कळीच...रेखीव भुवया, गोरा वर्ण, लांबसडक केशसंभार, सुडौल बांधा... ह्याच तिच्या देखण्या रुपावर तर तो फिदा झाला होता... पावसात चिंब भिजून तीचं रुप आणखीच खुलल होत...

       "का नाही करणार माझ्याशी लग्न? काय कमी आहे माझ्यात... पैसा आहे... पॉवर आहे... गाडी बंगला नोकर चाकर, ऐशो आराम... सगळ आहे... राणी बनवून ठेवीन तुला राणी..."त्याचा आवाज आता चढत होता. वेड्यासारखा तो तिच्यापाठी लागला होता.

       "तुझं काहिच नकोय मला... कारण मी सागरवर प्रेम करतेय... अन्...." पूढे काही बोलायच्या आधीच सट्टकन एक कानशिलात बसली. तीने घाबरून मान वर केली तर त्याचा रौद्र अवतार एखाद्या यमदुता पेक्षा कमी नव्हता....

       "राका..." त्यानं समोरच्या माणसाला आवाज दिला.
   
      "बॉस" ती व्यक्ती पळतच आली...

   "आताच्या आता तो सागर अन् हीचे आईबाप मला इथे हवे आहेत. नाहीतर तुमचा मुडदा पडला म्हणुन समजा."

      "येस बॉस" ... तो माणूस घाबरतच तिथून गेला.

   "काय आहे हे,?... हे बघ माझ्या वाकड्यात जाऊ नकोस. माझ्या फॅमिलीला अन् सागरला जर काही झालं तर.."

       "तर? ... तर काय करशील? अरे जगाची उलाढाल करतो मी या नोटांच्या जोरावर... हा ss... हा ss... हा ss"

पुढच्या पंधराच मिनिटात त्याच्या माणसांनी सागर अन् तिच्या आई बाबांना तोंड, हात पाय बांधून, त्याच्या समोर आणून उभ केलं.

    "पोरी...." तिच्या आई बाबांनी तिला अश्या अवस्थेत पाहून हंबरडाच फोडला. तिचीही काही वेगळी अवस्था नव्हती.

       "आई बाबा... सागर..." ती

"हाच ना तो हाच ना.... बघ आता याला कसा वर पाठवतो... नडलास काय रे मला... हा... " मागे कंबरेला खोचलेली पिस्तूल त्यानं बाहेर काढली...

    "नाही... नो... काय करतोय तू... तू असं नाही करु शकत... सागरss " हेल्प ... हेल्प...ती जिवाच्या आकांताने ओरडत होती. सागर मात्र गर्भगळीत होऊन हा प्रकार पाहत होता. त्याच्या डोळ्यात करुण भाव....यातना दिसत होत्या.. तो हतबल होता... त्याला ठाऊक होत समोर कोण आहे...चक्क तो.... काळ्या जगाचा बादशाह.... सत्ता, पॉवर, पैसा सरकार, कायदा खिशात ठेवणारा तो..त्याच्यासमोर उभा.... त्याच्यावरच पिस्तूल रोखून होता.

       "कीतीही ओरड.... कीतीही हेल्प माग... इथं कोणीही नाही तूझी मदत करायला.... अन् कोणी आलच तर गाठ माझ्याशी आहे..."

     खटकन आवाज झाला.... ट्रिगर मागे ओढला गेला... अन् पावसाच्या सरींना चिरत बुलेट थेट घुसली सागरच्या मस्तकात.... धाडकन त्याचं निर्जीव शरीर जमिनीवर कोसळलं....

"सागर......ssss" तीने हंबरडा फोडला....

आता पिस्टलची नळी तीच्या आई बाबांवर रोखली गेली...

    "नाही... नाही... प्लिज त्यांना नको मारू प्लिज" ती गयावया करु लागली. लेकीची अशी अवस्था पाहून ते माय बाप देखील हतबल झाले होते. पूढे काय घडतं बघण्याशिवाय ते काहिच करु शकत नव्हते.

      "मग बोल... बोल करशील माझ्याशी लग्न"

"न.. नाही" ती त्वेषाने ओरडली तोच ट्रिगर मागे ओढला गेला.

      "करेन... करेन मी तुझ्याशी लग्न... त्यांना सोडुन दे... सोड आई बाबांना..."ती अखेर ओरडली... त्याच्या चेहऱ्यावर एक आसुरी आनंद उमटला.... तिचे आई बाबा नाही नाही म्हणून मान हलवत होते.

       "ये हूई ना बात... मेरी राणी... राका सोड तिला आणि आमच्या सासू सासाऱ्याना पण सोडुन दे"

     तिचे हात मोकळे झाले तशी तीने निपचित पडलेल्या सागराकडे धाव घेतली...

      "सागर ss.... "

तिला पाहून पुन्हा एकदा त्याचा पारा चढत होता. झपझप पावले टाकत तो तिच्याजवळ आला...
दोन्हीं घुडग्यावर टेकत तो खाली बसला....
 
     "मेलाय तो आता"....

    "गो टू हेल".... ती आक्रंदली... तशी खाडकन चपराक तिच्या गालावर पडली... तशी ती जागीच कोसळली....

तिच्या नाका तोंडातून रक्त वाहू लागलं..... श्वास रोखला गेला....ती निपचित पडली होती... ती गतप्राण झाली होती.....


"लावण्या ss ss"..... तिच्या आईची किंकाळी दूरवर हवेत विरली....

क्रमशः......

 

       

     

     



     


🎭 Series Post

View all