Login

लावण्या भाग 2

पुरोहित बंगला आज लाईट्सने...
भाग 2

       पुरोहित बंगला आज लाइट्सने उजळून निघाला होता. ब्लॅक आणि व्हाईट थीम असावी कारण सगळीकडे तोच रंग दिसत होता. गालिचे, पडदे, टेबल खुर्च्या अन् तिथे वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरचे कपडे देखील तश्याच रंगाचे इतकंच नव्हे तर तिथे ठेवलेला तो भला मोठा लेअर केक देखील ब्लॅक आणि व्हाईटच होता... जो तो हातात ड्रिंक घेऊन गप्पा मारण्यात मग्न होता... त्यात बरीचशी कपल, लेडीज, जेंट्स सगळेच होते आणि विशेष म्हणजे सगळेच कसे हायफाय दिसत होते... एकंदरीत त्यांचे कपडे, स्टाईल, मेकअप, बोलण्याची लकब तरी तशीच होती. म्युझिक सिस्टिमवर मंद संगीत चालु होत... कोणततरी फंक्शन असावं... अरेंजमेंट तशीच तर होती. असा हा राजेशाही थाट; म्हणायला हरकत नाही कारण घराणं पुरोहितांच होत. व वाडवडिलांपासूनच मिळालेला हा थाट... असो.

          "लेडीज अँड जेंटलमन... अटेंशन हियर"... स्टेजवर अनाउन्समेंट झाली तसे सर्वजण सावरून बसले.

       "वेलकम टू आवर न्यूली मॅरिड कपल... मिस्टर राज पुरोहित अँड मिसेस रिया राज पुरोहित..." तश्या सर्व लाइट्स ऑफ झाल्या. खट खट खट.. बुटाचा आवाज जवळ आला अन् फोकस लाईट दोघांवर पडली.... केस मागे चोपून बसवलेले... धारदार नाक... नशेत रंगून लाल झालेले डोळे.... उजव्या हातात जळती सिगारेट....पिळदार शरीर...खुरटी दाढी... ब्लॅक अँड व्हाईट फॉर्मल सूट... डाव्या मनगटावर ब्रँडेड वॉच... त्याच्या चालण्याची स्टाईल जणू त्याला कशाचीच फिकीर नाही.... भल्याभल्यांना गारद करणारी नजर.... पण आज समोरचे त्याला पाहत नव्हते तर त्याच्या हातात हात गुंफलेल्या तिलाच पाहत होते....

        काळ्या रंगाचा स्लिव्हलेस वनपिस घातलेली ती... तिचे घारे डोळे.... हाय हिल्स...शॉर्ट हेअर कट... गर्द लाल रंगाची न्यूड लिपस्टिक.... गळ्यात लक्ष वेधून घेणारा नाजूक रत्नजडित हार...गौर वर्ण... आखीव रेखीव चेहरा...ओठांच्या वर उठून दिसणारा तीळ.... काय कमालीची सुंदर दिसत होती ती... अगदीं त्याला साजेशी.... एखादी मॉडेल देखील तिच्यापुढे फिकी पडावी अशीच... जो तो तिलाच पाहण्यात दंग होता... पण ती कोण? कुठून? आहे हे कोणालाच ठाऊक नव्हत...

दोघांनी केक कट केला..... केकचा छोटा पिस राज ने रिया ला भरवला अन् तिनेही....

       "शी इज माय वाइफ... रिया..." त्याने तिला जवळ ओढून इंट्रो दिला तशी ती मादक हसली...
         "लेट्स एन्जॉय धिस रिसेप्शन पार्टी" .... चिअर अप करून पार्टी रंगात आली.....
        
        राज पुरोहित.... एक कुख्यात डॉन.... काळ्या जगाचा तरुण बादशाह.... स्मगलिंग, सट्टा, रमी, हॉटेल्स, बिझनेस, व्यापार अश्या बऱ्याच ठिकाणी त्याच नाव, त्याचा वचक होता.... या काळ्या करतुदिंचा मालकच म्हणा ना... न जाणो किती मुलींची आयुष्ये त्याने उद्ध्वस्त केली असावीत....नामी गुंड म्हणून सगळेच त्याला घाबरायचे तर कोणी कोणी दात खाऊन देखील होते... बऱ्याचदा त्याला मारण्याचा प्रयत्न देखील झाला पण तोही ध्वस्त झाला... सगळ्यांनाच खिशात टाकून चालणारा राज पुरोहित विरोधकांच्या निशाण्यावर होता...


          "ओहो... कम ऑन राज.... किती ती झोप? लिव्ह मी... यू नो यस्टरडेज आवर फर्स्ट नाईट? पण तू आहेस... जरा कमी ढोसत जा... गेले चार पाच दिवस तुझ्या घरचे रितरिवाजच करतोय" रिया वैतागून बडबड करत होती. ...

         "शट युवर माउथ... काय बडबड आहे... गो टू हेल.... मी कूठे अडवल आहे तुला? माझ्यापुढे आवाज कमी आणि हे पुरोहित घराणं आहे रीतिरिवाज तर होणारच.... आह... माझं डोकं का गरगरतय... आणि मला रात्रीच काहीच का आठवत नाहीये..." कपाळावर दोन्हीं हात दाबत त्याने डोळे मिटून घेतले.

        "अजुन ढोसायच्या चार बाटल्या " ती हळूच बोलली.

     "काय?  काय बोलली... माझी नेहमीची ती सवय आहे.... चार काय अन् हजार काय पण मी शुद्धीत असतो... पण रात्री..." डोक्यावर दाब देऊन त्यानं आठवायचा प्रयत्न केला पण त्याला काहिच आठवत नव्हत... उलट आणखीच डोकं दुखायला लागलं

        ती मात्र वैतागुन उठली अन् फ्रेश व्हायला निघून गेली. मागे तो काही आठवत का हाच प्रयत्न करत होता पण पार्टी संपेपर्यंत तरी तो ठीकठाक होता.... त्यानंतर काय झालं ठाऊकच नव्हत... जवळजवळ एक प्रकारचा अम्मलच चढला होता त्याच्या मेंदूवर... आता त्याला संशय येऊ लागला....

जवळचं पडलेला मोबाईल त्याने उचलला अन् नंबर डायल केला....

"हॅलो.. रात्रीचे सीसीटीव्ही रेकॉर्डस आताच्या आता रेडी ठेव"....

"येस बॉस..."...




***

"पुढच्या आठवड्यात...  राज पुरोहितचा बर्थडे आहे.... त्याच दिवशी त्याचा गेम व्हायला पाहिजे... हवे तेवढे पैसे देईन पण तो संपला पाहिजे... अन् हो याची कानोकान खबर कोणाचा होता कामा नये नाहीतर गाठ माझ्याशी आहे... हवं तर ही सुपारीच समज" फोनवर बोलन झालं....

    "काम सोप्प नाही पण होऊन जाईल.... मोबदला पण तसाच मिळायला पाहिजे"... पलीकडून आवाज आला.
***
क्रमशः.....