भाग 3
संगमरवरी चकचकीत फरशी.... सोफा सेट, भिंतीवर टांगलेल्या तऱ्हेतऱ्हेच्या महागड्या पेंटिंग्ज... वरती भले मोठे झुंबर जणू सगळीकडे नजर ठेवतेय... मधोमध ठेवलेला भला मोठा डायनिंग टेबल... हळुहळु एकेक पुरोहित टेबलवर येऊन नाश्त्यासाठी ठान मांडत होता. आशिष पुरोहित म्हणजे राजचे वडील उजव्या बाजूने लकवा मारल्यामुळे नेहमी व्हील चेअर मधे असायचे मिसेस पुरोहित त्यांना घेऊन येतं होत्या. टेबलवर आधीच देव पुरोहित आणि श्रेया पुरोहित म्हणजे राज चे भाऊ बहिण उपस्थित होते. एवढीच ती काय पुरोहित फॅमिली... अरे हो... अजुन दोघे बाकी होतें फॅमिली पुर्ण व्हायला ... नाही का,? न्यू कपल... राज पुरोहित... रिया पुरोहित.
दोघीही एकसाथ जिना उतरून खाली आले. रियाकडे बघुन सगळ्यांचे तोंड उघडे ते उघडेच राहिले. कारणही तसंच होतं... तीने गुडघ्याच्या खाली शॉर्ट डेनिम अन् वर हाफ बाहीचा गुलाबी टी शर्ट घातला होता. नुकतीच आंघोळ केल्याने ती फ्रेश आणि तितकीच सुंदर दिसत होती.
"सॉलिड..." देव तिच्याकडे पाहत बोलला. तेचं श्रेया ला ऐकू गेलं अन् तिने एक रागीट लूक दिला.
"हेचं भाईने ऐकल ना याचं चाकूने तूझी जीभ कापतील." श्रेया
"राज.. काय आहे हे? ... अरे पुरोहित घराण्याची सून आहे ही... असे कपडे शोभतात का?" मिसेस पुरोहितांच्या कपाळावर आठ्या पसरल्या होत्या. आधीच कोण कुठली मुलगी... जिची साधी ओळखही नाही तीच आज या घराण्याची सून म्हणून मिरवते आहे.... हेचं सगळ्यांच्या डोक्यात गेलं होत पण कोणीही ब्र शब्द काढला नव्हता.
"मॉम... नेक्स्ट टाईम शी विल बी केअरफुल. नाश्ता करा आता थंड होत आहे. तसे सगळे नाश्ता करु लागले. ब्रेड, बटर, जाम, थालीपीठ, चटणी, टोपलीत बाजूला ठेवलेली फळे असे बरेच पदार्थ दिसत होते. सगळेजण खाण्यात मग्न होते. पण देव मात्र राहून राहून रियालाच पाहत होता.... अन् श्रेयाच लक्ष त्याच्याकडे... तीने हळुच देवला कोपराने डिवचले.
"मीट मी ऑन द टेरिस" देव तिला न पाहताच म्हणाला. श्रेया प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडेच पाहत राहिली.
***
***
"बॉस.... रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज गायब आहेत." तो माणूस थरथर कापत बोलला.
"व्हॉट? .... कस शक्य आहे?" राज जवळजवळ ओरडलाच. धाडकन त्यानं फोन सोफ्यावर आपटून दिला. बाजूला टी पॉई वर ठेवलेला फ्लॉवर पॉट क्षणात चक्काचूर झाला. न जाणो अजून किती वस्तू विस्कळीत झाल्या.
"कोण नडतोय मला? कोणाची हिम्मत झाली या राज पुरोहितच्या वाटेला जायची?"... रागाने बेभान होऊन तो स्वतःशीच बरळत होता.
कॉरिडॉर मधे मोबाईल हातात घेऊन फेऱ्या मारणाऱ्या रियाच्या कानावर त्या तोड फोडीचा आवाज पडला तशी ती धावतच रूम मध्ये आली. समोर अस्ताव्यस्त पडलेला पसारा अन् सोफ्यावर दोन बोटाच्या चिमटीत भुवया पकडुन बसलेला राज पाहून ती पुरती घाबरुन गेली.
"कोण नडतोय मला? कोणाची हिम्मत झाली या राज पुरोहितच्या वाटेला जायची?"... रागाने बेभान होऊन तो स्वतःशीच बरळत होता.
कॉरिडॉर मधे मोबाईल हातात घेऊन फेऱ्या मारणाऱ्या रियाच्या कानावर त्या तोड फोडीचा आवाज पडला तशी ती धावतच रूम मध्ये आली. समोर अस्ताव्यस्त पडलेला पसारा अन् सोफ्यावर दोन बोटाच्या चिमटीत भुवया पकडुन बसलेला राज पाहून ती पुरती घाबरुन गेली.
"राज?... राज... व्हॉट हॅपनड?...." तिने काळजीने विचारलं.
"प्लिज लिव्ह मी अलोन.... रिया प्लिज... हा राग तुझ्यावर नको निघायला. प्लिज" ... तिच्याकडे न पाहताच तो बोलला. आल्या पावली ती माघारी वळली.... ती जाताच राजने फोन उचलला आणि त्याच्या बॉडीगार्ड कम पी ए ला कॉल केला.
"हॅलो... घरातल्या प्रत्येकावर नजर ठेव. कोण कुठे जातो काय करतो.... वेळोवेळी मला खबर दे" अन् फोन कट झाला ....
***
***
"आह! राज... राज ... उठ ना...माझं डोकं जड का झालं आहे समजत नाही. असं वाटतंय गहिरा परिणाम झालाय ब्रेन वर" सकाळ उठल्या उठल्या रिया डोके गच्च पकडुन बसली होती.
"म्हणजे तुला पण? ...." राजचे डोळे विस्फारले होते.
"म्हणजे? काय मला पण... काय राज?"
"नथिंग.... जास्त झोप झाली असेल म्हणून कदाचित." पुढं बोलण त्यानें शिताफीनं टाळलं.
"हम्मम... मे बी..." रिया उठून बाथरूमला गेली.
तोच राजचा फोन खणाणला.... अननोन नंबर
तोच राजचा फोन खणाणला.... अननोन नंबर
"हॅल्लो... मिस्टर राज पुरोहित... काय सॉलिड वाइफ आहे रे तुझी.... आह दिल आ गया..." ....
"कोण रे साल्या.... तीला नडलास ना तर याद राख गाठ माझ्याशी आहे... मी असेपर्यंत तिच्या केसाला देखिल धक्का लागणार नाही." राज
"अरे.. घाबरलो की.... हा ss हा ss हा ss... अरे किती पोरींना त्यांच्या आयुष्यातून उठवणारा तू... हिच्यावर काय प्रेम् करणार.... असच असेल तर मग तुला आधी बाजूला करावं लागेल." एवढं बोलून फोन कट झाला.
"हॅलो.... ए भिकरचोट..." राज ओरडला पण फोन केव्हाच कट झाला होता...
***
***
इकडे देवने रुमालात गुंडाळलेला मोबाईल बाहेर काढला अन् त्यातल सिम काढून डस्टबिन मद्ये टाकलं.
"तुझा खेळ खल्लास म्हणून समज प्रिय ब्रो.... आता तुझी संपत्ती आणि तुझी बायको देखिल माझं गोल आहे...." .......
क्रमशः....