लावण्या भाग 4

गिरीश राठोड...
भाग 4


          गिरीश राठोड.... शहरातल्या बऱ्याच नामांकित हॉटेल्स आणि बारचा मालक... अमली पदार्थ शहराच्या बाहेर सप्लाय करायचा त्याचा गुपित धंदा होता. काळ्या जगाचा सम्राट व्हावं हीच त्याची लालसा... पण ते शक्य नव्हत... कारण जोपर्यंत राज पुरोहित अस्तित्वात आहे तोपर्यंत तरी सिंहासन सहजासहजी मिळणं शक्य नव्हत... ना ही त्याच्या पूढे जाऊन तो काही करू शकत होता.. पण आता वेळ आली होती... त्याच्याच माणसांना फितूर करण्याची... अन् ते कामही त्यानें केव्हाच उरकल होत.... राजच्या बर्थडेला पाच सहा दिवस राहिले होते... तेव्हाच काय तो त्याचा काटा काढायचा होता...

         त्यानं फोन उचलला अन् नंबर डायल केला... दोनच मिनिटात रिंग होऊन कॉल उचलला गेला.....

       "पुढच्या आठवड्यात...  त्याचा बर्थडे आहे.... त्याच दिवशी त्याचा गेम व्हायला पाहिजे... हवे तेवढे पैसे देईन पण तो संपला पाहिजे... अन् हो याची कानोकान खबर कोणाचा होता कामा नये नाहीतर गाठ माझ्याशी आहे... हवं तर ही सुपारीच समज" फोनवर बोलन झालं....

    "काम सोप्प नाही पण होऊन जाईल.... मोबदला पण तसाच मिळायला पाहिजे"... पलीकडून आवाज आला. तो होता राज पुरोहितचा पी. ए. .... बॉडीगार्ड केके....
***

        आठवडाच झाला होता 'लावण्या'च्या त्या घटनेला.... त्याचाच शोक करत राज पेगवर पेग मारत होता. अवेळी तिथे पोलिस नसते आले तर तो तिचा अंतिम संस्कार तरी करु शकत होता... पण नाही... सायरनचा आवाज ऐकून ही तिथे थांबण्याचा मूर्खपणा तो करु शकत नव्हता... खोट्या प्रतिभेची, सन्मानाची पांघरलेली शाल त्याला ढासळू द्यायची नव्हती म्हणूनचं त्यानें तिथून पळ काढला होता... तोच विचार त्याला अजूनही भेडसावत होता. तोच एक शॉर्ट ब्लॅक स्कर्ट... त्यावर व्हाईट टी शर्ट घातलेली बारटेंडर त्याला सर्व्ह करायला आली... नजर उचलून त्याने एक क्षण पाहिलं अन् तो पाहतच राहिला... शॉर्ट हेअर कट.... घारे डोळे.... तिचा हेवी मेकअप.... अन् तिच्या अदा... इथेच भेट झाली ती रिया आणि राज पुरोहित या दोघांची.... तिच्यासारखी सुंदर... शोधूनही सापडली नसती... तिला पाहताच घायाळ झाला होता तो... तिने मात्र डायरेक्ट लग्नाचीच अट घातली होती अन् ती अट ही राजने मान्य केली होती... घरच्यांना म्हणजे मिसेस पुरोहित यांना हे लग्न मुळीच मान्य नव्हत. त्यांच्या मते पुरोहित घराण्याची सून घरंदाज हवी... पण राजच्या पुढे कोणाचं काहिच चालणार नव्हत. देव पुरोहित मात्र रियाला पाहून पुरता वेडा झाला होता. पुरोहित घराण्याचा तो छोटा वारस होता पण त्याला कोणीच किंमत देत नव्हते. हा त्याचा गैरसमज...सगळी सत्ता राजच्याच हाती... त्यामुळें याला कोणी विचारणारे ही नव्हते. हाच डुख मनात धरून त्यानें राजलाच संपवण्याचा निर्णय घेतला होता.... एकदा का राज संपला की पॉवर सत्ता अन् रिया देखिल त्याचीच होणार होती हा त्याचा गोड गैरसमज होता... म्हणूनचं त्यानें चक्क राजला कॉल वर धमकी दिली... सिम काढून कचऱ्यात फेकून दिले.... पण ते सिम त्या डस्टबिन मधून कोणीतरी उचलले  अन् व्यवस्थित ठेवले...
***

          एका अंधारलेल्या खोलीत खुर्चीत कोणालातरी हात पाय बांधून बसवले होतें. तोंडाला काळा सेलोटेप चिकटवला होता. मान खाली पडली होती. कदाचित तो बेशुद्ध होता. तोच अस्पष्ट अस्पष्ट बुटांचा आवाज त्याच्या जवळ जवळ येतं राहिला... तोंडावर नाका पर्यंत ओढलेली हुडी कॅप... एखाद्या भुतासारखा केलेला काळा पेहराव खुर्चीवर बांधलेल्याला अंधुक अंधुक दिसत होता.  तसें त्याने खाडकन डोळे उघडले... ते जे काही आहे ते आता फुटभर अंतरावर आले होते. ते खाली वाकले अन् त्याने खुर्चीवर बांधलेल्या त्याचा मोबाईल काढून घेतला. अंधारात काहीच दिसणे अशक्य होते... मोबाईल घेताच त्याचे हातपाय सुटले... अन् तो घाबरुन ओरडू लागला.... भूत भूत... तोच कल्ला करत तो बाहेर पळाला.... ती एक अर्धवट बांधकाम झालेली इमारत होती. मोबाईल साठी त्यानें खिशात हात घातला पण त्याचा फोन त्याच्याकडे नव्हता... आता त्याला कळून चुकले की मोबाईल गायब आहे म्हणाल्यावर तो नक्कीचं कोणी चोर असणारं...

     "च्यायला.... फोनच हवा होता ना.... घ्यायचा खिसा कापून... न्यायचा पळवून इतका खटाटोप कशाला,?.... तो होता के. के.... पण त्याला कुठं माहित होत की तो मोबाईल ज्याने घेतलाय त्याला काय गवसलय....
***

      "रिया.... रात्री तू मला विश केलंस पण सकाळ सकाळ कूठे गेली होतीस...?" राजने जरा संशयी नजरेने विचारलं...

       "ओफ्फो... राज ...कम ऑन.... सिक्रेट आहे ते... सरप्राइज आहे तुझ्यासाठी.... रात्री कळेल... सो प्लिज स्पॉइल नको करु" एवलस तोंड करत रिया बोलली.

       "ओके... पार्टी झाली की आपणं लंडनला जातोय... इट्स आवर हनिमून... आणि हे त्याचे तिकीटस्".... दोन तिकीट त्यानें रियाच्या हातात टेकवले.... अन् बाहेर निघून गेला... थोड्याच वेळात ती तिकिटे डस्टबिन मद्ये तुकडे होऊन पसरले होते....
***

क्रमशः....



            

           


🎭 Series Post

View all