भाग 5
सगळीकडे नुसता धुमाकूळ माजला होता. पुरोहित बंगल्यातील बर्थडे पार्टीची वर्दळ क्षणात नाहीशी झाली होती. बंगल्यात ठिकठिकाणी क्राईम अलर्ट जारी केला होता... साऱ्या शहरात एकच खळबळ उडाली होती... टिव्ही वर एकच न्यूज चालु होती.... प्रख्यात बिझनेसमन राज पुरोहित यांची हत्या... हत्या की आत्महत्या?.... पुरोहित बंगल्याच्या बाहेर पोलिस गाड्या उभ्या होत्या. आतापर्यंत जो जो पार्टीला आला होता त्याची चौकशी, छाननी करूनच बाहेर सोडले होते... पुरोहित परिवाराचा माहोल तर वेगळाच होता. मिसेस पुरोहितची हालत बिघडली होती तर श्रेया कमालीची घाबरली होती. व्हील चेअर वर बसलेल्या राज च्या वडिलांच्या चेहऱ्यावरील एकही रेष हलली नव्हती... चेहरा अगदीच निर्विकार दिसत होता तर देव पुरोहित मात्र पुरता गोंधळून गेला होता... के. के ची अन् बाकी लोकांची पण काही वेगळी अवस्था नव्हती... पण या सगळ्यांत रिया मात्र कूठे दिसत नव्हती. अन् तिच चर्चा देखिल तिथे भलतीच रंगली होती.
इन्स्पेक्टर राघव सगळ्यांची चौकशी करुन पुरोहित फॅमिली कडे वळले. पण आधी डेड बॉडी पाहण महत्वाचं होत. हॉल मधे जिन्याच्या पहिल्या पायरी जवळचं राज ची बॉडी पडली होती. त्यांनी हातात ग्लोव्हज चढवले आणि बारकाईने निरीक्षण करु लागले... पण काहीच आढळून आलं नाही. ना हत्यार वापरल होत ना कसली खून होती... कुठेही रक्ताचा थेंब देखील साठला नव्हता. गुन्हेगार इतका सराईतपणे मर्डर कसा करू शकतो याचच आश्चर्य राघवला वाटतं होत. पण कदाचित हार्ट अटॅक देखिल असू शकतो. बॉडी पोस्टमार्टम झाल्याशिवाय कळणार नव्हत. म्हणून बॉडी लगेच हलवण्यात आली तेव्हां राजचा फोन मात्र राघवच्या नजरेस पडला अन् तो त्याने पट्कन काढून घेतला...
पुरोहित कुटुंबाची चौकशी करण्यात आली तेव्हां राघवला रिया पुरोहित गायब असल्याचं कळालं. खून असेलच तर तिनेच केल्याची दाट शक्यता होती. पण हाती काही पुरावा लागतो का यासाठी सगळ्यांच्या रूम ची झडती घेण्यात आली तेव्हां एका हवालदाराला देवच्या रूम मध्ये बेडवर पडलेलं ते सिम कार्ड सापडलं... त्याने लगेच आणून राघवच्या हवाली केलं. तेवढ्यात दुसरा हवालदार आला ज्याने एक मोबाईल हातात आणला होता जो कॉरिडॉर मधे पडलेला दिसून आला.
तिन्ही वस्तू घेऊन राघव तिथून बाहेर पडला...
***
***
"मिस्टर देव पुरोहित... यू आर अंडर अरेस्ट... आणि के. के. यू टू..." राघव पुरोहित बंगल्यात येतं म्हणाला. हवालदाराने लगेच पूढे होऊन दोघांनाही बेड्या घातल्या.
"इन्स्पेक्टर... यात आमची काय चुकी? मीच माझ्या भावाचा खून का करेन?" देव घाबरुन बोलला
"तू धमकी देऊ शकतोस तर तू खून देखिल करू शकतोस... नाही का?" आता मात्र देव खरचं बावरला...
"पण मी ब्रो ला नाही मारलं... काय पुरावा आहे..." देव
"हे सिम कार्ड... याचं नंबर वरून तू राज ला कॉल केला होता ना? धमकी दिली होती ना? बोल.... रिया कूठे आहे.?... की तिलाही संपवलं तू? " राघव जवळजवळ ओरडलाच.
"व्हॉट? ... मला काय माहित ती कूठे आहे... हे बघा मी नुसती धमकी दिली होती... रिया कूठे आहे मला खरचं माहीत नाही." देव बोलतच होता की खाडकन् एक कानाखाली त्याच्या गालावर बसली... ती होती श्रेया... तिला ठाऊक होत देव रिया वर डोळा ठेवून आहे...
"पण यात माझा काय दोष?..." मधेच के. के. बोलला...
"तुझ्याकरवे केला हा खून... तु घेतली सुपारी... तूच राजच्या ड्रिंक मधे पॉइजन घातलं... राईट? पोस्ट मार्टम मद्ये बॉडीत विष असल्याचं आढळून आलं आहे...की ऐकवू तुझ्या मोबाईल मधली रेकॉर्डिंग? ...." राघव ने मोर्चा के. के कडे वळवला... रेकॉर्डिंगच नावं ऐकताच के के चे धाबे दणाणले... दोघांना घेवून इन्स्पेक्टर राघव स्टेशन कडे रवाना झाला....
***
***
अंधारलेला कच्चा रस्ता पार करत ती एका चाळीत शिरली... जवळजवळ रात्रीचे बारा वाजत आलेले.... आजूबाजूला कोणी चिटपाखरू देखिल दिसतं नव्हत तिच्याशिवाय... तशीच एक गल्ली सोडुन ती पुढे आली. रस्त्याच्या बाजूलाच एक टुमदार कौलारू घर होत. उजवीकडे वळण घेवून ती, त्या घराच्या फाटकातून आत शिरली... दरवाजा बंद होता... तिने दरवाजावर टकटक केली... दार उघडलं... एक वयस्कर स्त्री डोक्यावर पदर खांद्यावर शाल पांघरलेली डोळ्यावर चश्मा चढवलेला....
"आलीस?.... " तिने विचारलं...
तशी ती थेट आत गेली.... बाजूलाच जाळीदार मेटलच डस्ट बिन होत त्यात तिने हेअर विग... सेंडल... काढून टाकले. डोळयात बोटे घालून लेन्स बाहेर काढल्या अन् त्याही त्यात टाकल्या.... आतमध्ये जाऊन कपडे बदलले... अन् त्या कपड्यांना डस्ट बिन मधे टाकून खसकन काडी ओढली.... ते सगळं काही जळून खाक झालं....
"माझा बदला पुरा झाला आई... आता मी सुखाने जगेन... तूझ्या हिमतीची दाद देईन मी... त्या दिवशी तू मला वाचवलं... थँक्यू आई... थँक्यू सो मच..." ती धाय मोकलून रडू लागली...
"रडू नको लावण्या... ईश्वर सगळ्यांना सजा देतो... तुझं पुण्यकर्म समज हे.... झालं गेलं विसरुन जा.... नव्याने आयुष्य जग.... योगायोग... देवही आपल्या पाठी होता.... जे तेव्हाच राजला धमकीचे कॉल आले..." तीची आई तिला बिलगून राहिली...
हो.... ती लावण्याच होती... त्यादिवशी सुदैवाने वाचली पण सूडाची आग घेवून ती निघाली.... बारटेंडर ते रिया अन् रिया ते रिया पुरोहित.... तिचा बदला पुर्ण झाला होता.... तिच्या प्रेमाला न्याय मिळवून दिला होता तिने.... राज च्या ड्रिंक मधे पॉइजन टाकून तिनेच टाकलं होत... सगळे पुरावे देखिल तिनेच गोळा केले होते.... ऍनीवर्सरी ते आजपर्यंत तिचं त्याच्या ड्रिंक मधे कुठली पावडर मिक्स करुन देतं होती... जेणेकरून तो शुद्धीवर राहू नये... तर असा हुशारीने झाला... लावण्याचा बदला पुर्ण.... पण रिया मात्र शेवटी सर्वांसाठी एक रहस्यच राहिली होती...
समाप्त!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा