फायद्याचा आळशीपणा (भाग-२)
© प्रतिक्षा माजगावकर
(मागील भागात आपण गुगल लेन्स वापरून टाइप न करता कसं लिहिलेल्या पानांचं टेक्स्ट मध्ये रूपांतर करू शकतो ते पाहिलं, आता पुढे)
***************************
गुगल लेन्स मधेच टेक्स्ट च्या बाजूलाच तुम्हाला एक option दिसेल तो आहे ट्रान्सलेट चा.... यातून तुम्ही कोणतीही भाषा असली तरी तुम्हाला हव्या असणाऱ्या भाषेत ट्रान्सलेट करून घेऊ शकता.... समजा, तुम्ही इंग्लिश लेख वाचला.... त्यातले काही मुद्दे तुम्हाला समजायला अवघड जात असतील, किंवा काही वाक्यांचा अर्थ समजला नाही... तर, तेवढ्या भागाचा स्क्रीन शॉर्ट काढून तुम्ही ट्रान्सलेट करून वाचू शकता.... ते ट्रान्सलेट केलेलं जर तुम्हाला पुन्हा हवं असेल तर ते सेव्ह सुद्धा करू शकता.... टेक्स्ट option मध्ये जसं आपण गॅलरी चा पर्याय निवडून हवा असलेला फोटो घेऊन टेक्स्ट मध्ये कॉन्व्हर्ट केलं अगदी तसंच यात सुद्धा आहे.... सेम स्टेप्स नी तुम्ही काढलेला स्क्रीनशॉर्ट यात आणू शकता...
याचा अजून एक उपयोग म्हणजे, जेव्हा तुम्ही दुसऱ्या राज्यात किंवा देशात जाता तेव्हा रस्त्यात दिसणाऱ्या signboard किंवा दुकानाच्या पाट्या लेन्स च्या मदतीने स्कॅन केल्या तर कोणाच्या मदती शिवाय तिथे काय लिहिलं आहे हे तुम्हाला समजू शकते....
आता काही जणांना वाटेल आपण हे गुगल च्या साईट वर जाऊन सुद्धा करू शकतो! मग यात केलं काय आणि तिकडे केलं काय... पण, जेव्हा आपल्याला व्हाट्सअप वर काही सरकारच्या आदेशाच्या नोटीस येतात किंवा काही नवीन कायदा लागू झाला की त्याच्या बद्दलची माहिती येते तेव्हा हे खूप कामी येतं! समजा, जर आलेली माहिती हि इंग्लिश मध्ये असेल तर त्यातले काही मुद्दे समजत नाहीत तेव्हा तुम्ही फक्त तो फोटो स्कॅन करून तुमच्या मातृभाषेत ती माहिती वाचू शकता! काय मग वाचला की नाही इथे पण बराचसा वेळ!
आता आपण वळूया पुढच्या मुद्याकडे... त्याच अँप मध्ये उजव्या हाताला शॉपिंग कार्ट च चिन्ह तुम्हाला दिसेल... तो आहे शॉपिंग चा option! या मध्ये समजा तुम्ही कोणाकडे एखादी वस्तू बघितली आणि तशीच्या तशी तुम्हाला हवी असेल तर यामधून फोटो काढल्यामुळे त्या वस्तूची वेगवेगळ्या साईट वरची किंमत, विकत घेण्यासाठी लिंक सगळं मिळेल.... अगदी olx पासून सगळ्या साईट चे result हे आपल्या समोर घेऊन येतं... मग झालं की नाही शॉपिंग एकदम सोपं!
शॉपिंग च्या option च्या बाजूला जे काटेरी चमचा आणि प्लेट च सिमबॉल आहे ते आहे restaurant च! कोणत्याही पदार्थाचे डिटेल्स या मध्ये त्या पदार्थाचा फोटो काढल्यामुळे मिळतात.... अगदी विकिपीडिया मध्ये असलेली माहिती, पदार्थ कसा बनवायचा याची युट्युब लिंक सुद्धा! एवढंच नाही तर तुम्ही ज्या restaurant मध्ये जेवायला गेला असाल ते restaurant सिलेक्ट करून तुम्ही गुगल मॅप वरून माहिती मिळवू शकता तिथे कोणता पदार्थ स्पेशल आहे म्हणजे कोणता पदार्थ हा त्या restaurant ची खासियत आहे....
या अँप च्या सेंटर ला जे भिंगाचं सिमबॉल आहे त्यातून तुम्ही कोणत्याही गोष्टीची माहिती मिळवू शकता.... समजा, तुम्हाला एखाद्या थोर व्यक्ती ची माहिती हवी असेल तर त्यांचा फोटो इथे स्कॅन करून किंवा तुमच्या फोन मध्ये आधी पासून असेल तर गॅलरी मधून टाकून सगळी माहिती काही सेकंदात तुमच्या समोर असेल..... एवढंच नाही तर अगदी आजू बाजूला दिसणारे पक्षी, झाडं, फुलपाखरं, फुलं सगळ्यांची माहिती तुम्हाला या मधून मिळू शकते..... काहीवेळा घरात फुलझाडं असतील तर फुलपाखरं येऊन त्यावर बसतात... त्या सगळ्या फुलपाखरांबद्दल आपल्याला माहित असेल असं नाही... मग त्या बद्दल ची माहिती मिळवण्यासाठी हा पर्याय सगळ्यात उत्तम!
एवढंच नाही, जेव्हा तुम्ही ऐतिहासिक स्थळांना भेट देता तेव्हा जर गाईड मिळाला नाही किंवा तुम्हाला नको असेल तर लेन्स आहेच आपला गाईड! ज्या गोष्टीची माहिती हवी असेल तिथे फक्त तुमचा कॅमेरा पॉईंट करायचा आणि आली सगळी माहिती समोर! यात तुम्ही क्यु.आर. कोड सुद्धा स्कॅन करू शकता...
आहेत की नाही मग हे पर्याय एकदम सोपे आणि खूप वेळ वाचवणारे.... ना काही टाइप करायची गरज, ना वेगवेगळ्या साईट वर जाऊन डिल्स बघण्याची गरज आणि फक्त काही सेकंदात सगळं च्या सगळं पान ट्रान्सलेट सुद्धा! अँप एक आणि फायदे अनेक!
अजून एक महत्वाचा मुद्दा! जर तुमच्या मोबाईल मध्ये हे अँप सपोर्ट करत नसेल तर आधी गुगल अँप अपडेट करून घ्या.... ते अपडेट केल्यावर मग गुगल लेन्स सुद्धा सपोर्ट करेल....
क्रमशः....
***************************
आजचा हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा... आपण, एक एक मुद्दा पाहतोय त्यामुळे भाग लहान मोठा होऊ शकतो.... पुढच्या भागात आपण गुगल आणि youtube वर सर्च करण्याच्या काही टिप्स पाहणार आहोत.... त्यामुळे तुमचा बराच वेळ वाचेल.... जी माहिती तुम्हाला हवी आहे बरोबर त्याच माहिती पर्यंत तुम्ही पोहोचाल... तोपर्यंत तुम्ही सुद्धा गुगल लेन्स वापरून बघितलं का? आणि तुम्हाला हे आळशी पणाचे पर्याय कसे वाटले हे नक्की सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा