Login

लेडीज स्पेशल... भाग - 4

आई नयना चा लग्नाचा निर्णय ऐकुन खुप खुश होते...

भाग - 4


रमा " काय गं इतकं का चिडलीस आई वर..? "

नयना " काही नाही गं.. तिचं दिवसातून एकदा तरी विचारणं असत.. कि लग्नासाठी मुलगा बघितलाय.. किंवा मग कधी मुलाचा फोटो पाहणं पाठवन असत..!"

सोनाली " अगं मग त्यात काय चुकलं तिचं..? "

रमा " उलट ति चांगलाच विचार करतेय.. कि तु लग्न कराव म्हणुन..!"

सोनाली " तु परिस्थितीला बघता.. असा विचार करतेयस ना ? " नयना ला समजावत म्हणतात...

नयना " हो ...!"

सोनाली " उलट तिला बरं वाटेल.. एक टेन्शन आईच्या डोक्यावरचा कमी होईल ना.. आणि जावई म्हणुन त्याचा ही आईला सपोर्ट होईल... "

रमा " बरोबर बोलतेस सोनाली तु...!"

नयना " ठिक आहे तुम्ही बोलतायत तर मी पाहते मुलगा..!"

रमा " तशी समजूतदार आहे आपली नयना...!" आणि तिघी हसू लागतात...

तितक्यात सोनाली च स्टेशन येत..

सोनाली " चला गर्ल्स बाय... उद्या भेटू आपण..!" आणि सोनाली ट्रेन थांबते तशी उतरते...

आणि ट्रेन चालु होते.. ट्रेन मधली गर्दी थोडी कमी होते...

रमा " अगं.. प्रीती चा काही फोन वगरे..? " नयना ला विचारते...

नयना "नाही गं.. ति मीटिंग ला निघाली असेल.. तिची ही फ्लाईट असेल... थांब कॉल करूया तिला...?" असं बोलुन नयना तिला कॉल करते... समोरून प्रीती कॉल कट करते... आणि तिला मॅसेज करते...

प्रीती " मी उतरली कि कॉल करते.. " प्रीती चा मॅसेज..

नयना " घ्या मॅडम ने मॅसेज केलाय... थोड्या वेळाने कॉल करते... "

रमा " तिचं खुप चांगल चाललंय तस.. कसलं टेन्शन नाही किंवा काय ..नाही कोणाची जबाबदारी...!"

नयना " हम्म...!"

रमा "साध घरी जायला लेट जरी झाला तरी आई मला सारखी विचारणार कुठे आहेस...., कुठे आहेस..?"

नयना " माझ्या घरी सुद्धा असंच आहे गं...!"

रमा " कितीही झालं तरी आपलीच मैत्रीण आहे ति... उद्या काही प्रॉब्लेम झाला तर आपल्याला तिच्या सोबत राहिला पाहिजे..!"

नयना " हो...!

तितक्यात दोघींचं स्टेशन येत... दोघीही ट्रेन मधुन उतरतात...तितक्यात रमा ला घरून आईचा कॉल येतो..

बघ बोलली ना... आई साहेबांचा कॉल आला...

रमा " हो आई येते.. आताच उतरली स्टेशन वर..!" असं बोलुन रमा फोन ठेवते...

नयना " चल भेटू उद्या... प्रीती चा कॉल आला तर कॉल करेन तुला... " असं बोलुन नयना आणि रमा आपापल्या घरी निघुन जातात..

नयना घरी पोहचते.. दारावरची बेल वाजवते.. आई दरवाजा खोलते..

आई " अगं किती गं उशीर...? " आई काळजीने बोलते..

नयना " आई अंग जरा रमा शी बोलत बोलत येत होती.. आणि मग रिक्षा पकडली.."

आई " अगं काळ्जी असते म्हणुन तुला असं दहा वेळा विचारात असते. "

नयना " अगं आई कळलं मला.. नको तु काळ्जी करुस... बरं चल मी फ्रेश होते मग आरामात जेवता जेवता बोलु आपण.. " असं बोलुन नयना फ्रेश व्हायला जाते...

रमा घरी पोहचते...

आई " या मॅडम.. कधी कधी ऑफिस सुटलं कि सरळ घरी यायला ही शिका..!" आई रागावून तिला बोलते..

रमा " काही गं आई घरात आल्या आल्या शिव्या द्यायला लागते... जरा धीर धर कि..."

आई " अगं वाजले बघ किति.. जेवायला थांबलोय तुझ्यासाठी... "

रमा " हो आता आली हात पाय धुवून.. बरं चहा भेटेल का प्यायला ...? "

आई " हो देते कि.. चहा देते... म्हणजे रोजच्या प्रमाणे जेवण अर्धवट जेवा तुम्ही...!"

रमा चे बाबा " काय गं किती आल्या आल्या कट कट करते तिच्या पाठी... चहा मागते तर दे कि...!" रमा चे बाबा रमा ची बाजू घेत बोलतात...

रमा ही घरात वडिलांची लाडकी.. म्हणुन बाबा तिचे सतत बाजू घायचे... आणि तिचं ही वडिलांना वरती जीव खुप जास्त...

आई " लग्नाचा पत्ता नाही...आणि जबाबदारी कसली घ्यायला नको तिला...!"

रमा " आई गं आता मध्येच कुठून आला लग्नाचा विषय... चहा द्यायचं सोडुन...! बघा ना बाबा...!"

रमा चे बाबा " हो तर अजुन लहान आहे ति... इतक्यात लग्न नको...!"

आई " बाप लेकीने मिळून काय तोह गोंधळ घाला... मी जाते...!" असं बोलुन आई चिडून किचन मध्ये जेवणाचं आवरायला जाते...

रमा " थँक्स बाबा... "" हळुच आवाजात रमा बाबा ना बोलते...

आई " नयना... नयना.. बाळा आवर लवकर जेवण थंड होईल..!" नयना ची आई नयना ला जेवण साठी आवाज देते. 

आई ने छान गरमा गरम नयना च्या आवडीचे जेवण बनवले होते...

नयना बाहेर येते फ्रेश होऊन...

नयना " आई गं काय छान सुवास येतोय जेवणाचा...?"

नयना ला जेवणाच्या वासाने खुप भूक लागलेली असते... ति पटकन जेवायला बसते... आई ने तिच्या आवडीचे छान पिठलं आणि भाकरी, आणि गरमा गरम भजी बनवलेली असते....

आई " हो.. तुझ्या आवडीचं बनवलाय.. आज.."

नयना खुश होते...

नयना " अरे वाह... चल तु मला खुश केलास आज मी तुला खुश करते...!"

आई " म्हणजे...? "

नयना " हेच कि तु जो मुलगा पाठवला आहेस मला तोह... पसंत आहे...मी भेटते त्याला... "

आई नयना च बोलणं ऐकुन खुओ खुश होते...

आई " खरंच... चल देव पावला... बरं मी उद्या त्याच्या आई शी बोलुन घेते... मग तस तु भेटून घे...!" आई खुश होऊन देवच्या पाया पडते...

... क्रमश...







0

🎭 Series Post

View all