भाग - 5
नयना " मातोश्री खुश का आता..? चला आता तरी पोट भरून जेव...!"
नयनाच्या निर्णयाने आईच्या चेहऱ्यावर ख़ुशी असते..
आई आणि नयना जेवण उरकून घेतात..
सोनाली घरी पोहचते.. ति खुप थकलेली असते...
ति तिच्या मुलाला केअर टेकर कडून घरी आणणते..
विहान " मम्मा...खुप भूक लागली आहे....चल ना.. " विहान ला खुप भूक लागलेली असते... पण सोनाली अमित च्या विचारात असते..
विहान पुन्हा आवाजात देतो.. " मम्मा... "
सोनाली " ओह्ह्ह बेटा... चल आज आपण काही तरी बाहेरून मागवूया...? तु काय खाणार आहेस चायनीज..? " विहान च मन वळवत सोनाली आईच्या मायेने बोलते....
विहान " चालेल युप्पी... आज चायनीज... चायनीज... "
विहान खुश होऊन नाचू लागतो.. सोनाली ऑनलाईन चायनीज ची ऑर्डर देते...
काही वेळात सोनाली फ्रेश होऊन येते.. तितक्यात ऑनलाईन ऑर्डर येते..
सोनाली " विहान चल बेटा ऑर्डर आली आहे... गेम ठेऊन चल लवकर बाहेर ये... "
विहान " येस मम्मा आलो...!" विहान पळत पळत चायनीज चायनीज बोंबलत बाहेर येतो... पटकन जाऊन डायनिंग टेबल वर बसतो... तोह आनंदाने चायनीज चा वास घेतो... सोनाली त्याला ताटात वाढते आणि स्वतःला घेते.. विहान आनंदाने खातो... पण सोनाली च अजिबात मन नसत..ति अमित ला कॉल ट्राय करते...पण अमित चा फोन लागत नसतो.. सोनाली पुन्हा पुन्हा ट्राय करते.. पण त्याचा कॉल काही लागत नाही...
विहान " काय झालं मम्मा ...? " विहान ला समजतं कि मम्मा चा काही तरी बिनसलंय...
सोनाली " काही नाही बेटा... तु जेव हा पोटभर...!" सोनाली विहान साठी थोडं फार खाते...
आणि सगळं आवरायला लागते... विहान दमलेला असतो...सोनाली त्याला झोपवते.. त्याच्या डोक्यावरून हात फिरवते.. बेडरूम चा दरवाजा अलगद लावते... रात्रीचे 12 वाजलेले असतात... सोनाली अमितच्या फोन ची वाट पाहते... पण अमित चा कॉल रिंगिंग असतो...अमित तिच्या कॉल चा रिप्लाय देत नाही... ति अमित ला मॅसेज करते...
सोनालीचा मॅसेज " निदान कॉल पाहिलास तर रिटर्न करत तर जा... पोहचलास कि नाही काही तरी सांगायचं... घरात बायको वाट पाहत असेल हा तरी विचार करायचा..!" आणि ति फोन बाजुला ठेवते...रात्र खुप झालेली असते.. आणि ऑफिस च्या कामा मुळे सोनाली फार थकलेली असते... तिला झोप लागते... काही वेळा नंतर तिला जाग येते ति फोन पाहते... त्यात अमित चा मॅसेज आलेला असतो...
अमित चा मॅसेज " काही गरज नाही काळजी करायची.. आणि सारखं सारखं मी कुठे आहे ह्याचे अपडेट देण मला गरजेचं वाटत नाही... मी ऑफिस च्या कामासाठी आलो आहे " अमित चा मॅसेज रात्री 3 वाजता येतो...सोनाली अमित चा मॅसेज वाचून खुप नर्वस होते.. तिला अमित च वागणं खुप खटकत.. तिच्या मनात अमित बद्दल सौंशय निर्माण होतो... तिला दुपारचं प्रीती च बोलणं कुठे तरी मनाला खरं वाटुन जात... पण ति विहान साठी सगळं विसरायचा प्रयत्न करते.. सकाळ होते.. प्रीती चा ग्रुप वर मॅसेज येतो.. प्रीती चा मॅसेज " गुडमॉर्निंग ऑल..."
त्यावर सोनाली, नयना, रमा तिला रिप्लाय देतात..
रमा " तु तर ट्रेन ला नाही ना आज...? " प्रीतीला विचारते..
प्रीती " संध्याकाळी असेन मी ट्रेन ला..."
नयना " आलीस का गं,,, तु ऑफिस मीटिंग वरून..? "
प्रीती " नाही गं डायरेक्ट दुपारी बॉस सोबत ऑफिस जाईन..!"
रमा " ओके...!"
प्रीती " चला बाय... भेटू आपण संध्याकाळी...!"
असं बोलुन प्रीती ऑफलाईन जाते... नेहमी प्रमाणे सगळ्या ट्रेन मध्ये भेटतात...
सोनाली खुप नर्वस असते..हे तिच्या चेऱ्यावरून पुर्ण पणे दिसत असत... ति खुप थकलेली असते हे जाणवत असत...
रमा " सोना... काय गं काय झालं...? इतकी नर्वस का दिसतेय...?
नयना " बरी आहे ना तब्येत तुझी...? "
सोनाली " हो गं आहे बरी... फक्त थकल्या मुळे झोप ही लागत नव्हती... सो त्या मुळे.. "
रमा " नक्की ना....? " रमा पुन्हा तिला विचारते...
रमा, नयना ला शंका आलेली असते..तितक्यात रमा च स्टेशन येत, रमा उतरते... पुर्ण ट्रेन मध्ये सोनाली खुप शांत असते.. नयना ला तिची शांतता खुप काही सांगुन जाते... नयना च साध राहणीमान असल तरी तिला माणसाच्या मनात काय चालेल असत ते बरोबर ओळखता येत असत...
तितक्यात नयना आणि सोनालीच स्टेशन येत... त्या दोघी उतरतात, सोनाली तिला बाय करते आणि ऑफिस च्या रस्त्याने चालु लागते...नयना ही ऑफिस ला पोहचते... तितक्यात नयना च्या मोबाईल वर एक अनोळखी व्यक्तीचा मॅसेज येतो
......
क्रमश..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा