Login

लेडीज स्पेशल... भाग -1

ही कथा आहे 4 मुलींची.. तुमची आमच्यातली... एक वेगळ्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न.

भाग -1


ही कथा वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलाय... कदाचित मोठी झाली तर राग माणु नये...)


"रमा उठ गं... वाजले बघ किती... रमा..." आई ची हाक आली तशी रमा खाडकन झोपेतून जागी झाली. 

आई " किती गं हाका मारायच्या... निदान अलार्म लावुन तर झोपत जा... "

रमा " हो गं आई.. तु असताना काय करायचा तोह अलार्म... "

रमा एक मिडल क्लास मधली....घरात आई वडील, एक भाऊ आणि चार बहिणी, त्या मधली ही सगळ्यात लहान घरात लाडवलेलं पिल्लु... घरात नि बाहेर मुलांसारखी टपोरे गिरी करायची... मुलांसारखे कपडे नेहमी तिला आवडतात घालायला...

आई " आज तरी डब्बा न्हेणार आहेस कि नाही ?... "

रमा " हो गं आई... जे काही देशील थोडंच दे.. "

आई " आज कोणाला कापणार आहेस.. नाही म्हटलं रोज रोज तुला वेगवेगळे खावं लागत ना.... "

रमा " आपली वटचं आहे इतकी....!" आणि रमा मस्करी करून हसायला लागते...

आई " चल आवर लवकर उशीर होईल तुला... एक तर लेट करतेस आणि मग घाई घाई मध्ये ट्रेन पकडतेस... "

रमा " अगं आई लेडीज स्पेशल असते ति.. टेन्शन नसत... "

आई " तुझ्या पुढ्यात काय बोलणार... " आणि आई तिच्या पुढ्यात हात टेकते..

रमा नाश्ता करून ऑफिस जायला निघते.

रमा " चल गं आई निघते मी... "

आई " किती वेळा म्हटलं तुला निघते नाही येते म्हणावं... "

रमा " हो चल आता बाय... "

अस बोलुन रमा निघते... रमा स्टेशन प्लॅटफॉर्म ला पोहचते... तितक्यात तिचा कॉल वाजतो...

रमा " गुड मॉर्निंग,,, नयना... आलीस का प्लॅटफॉर्म ला तु..? "

नयना " ही बघ जिने उतरते... पोहचते आहे...तु ट्रेन आली तर जागा पकड लगेच...!"

रमा " ट्रेन यायला फक्त 1 मिनिट आहे.. तु ये लगेच मी पकडते जागा... "

तितक्यात नयना तिच्या पुढ्यात येऊन उभी...

नयना आणि रमा ह्यांची ओळख ट्रेन मधलीच आणि एकाच ठिकाणी राहतात तर.. अजुन चांगली ओळख आणि मैत्री... नयना ही एका कारखान्यात कामाला, शिक्षण फारसे नाही.. पण बोलणं आणि स्वभाव दोन्ही शिक्षणाच्या पुढ्यात कमी पडेल अस... राहणीमान साध..सिम्पल सलवार कुर्ती घालायची...घरी ति आणि तिची आई.. ति एकुलती एक होती.. वडील अल्पशा आजारपणात गेले...

रमा " अगं हो हो किती धावत आलीस.. मी पकडली असती ना सीट..! "

नयना " अगं काय करणार बस नेहमी प्रमाणे उशिरा आली... म्हणुन अस धावत यावं लागलं.. "

रमा " बरं ति ओढणी नीट बांध.. ति...चल आली ट्रेन.. "

नयना आणि रमा 7:14 ची लेडीज स्पेशल ट्रेन पकडतात.. दोघींचं ऑफिस एक दोन स्टेशन मागे पुढे असत... ट्रेन आली तशा दोघी गर्दीतून वाट काढत सीट पकडतात.. नयना.. रमा... अगं इथे या इथे सीट ठेवली आहे...पलीकडून आवाजात आला..

रमा " सोना थांब.. आलो आम्ही.. "

रमा आणि नयना धावत जाऊन सीट वर बसतात..

नयना " बरं झालं.. यार सीट होती म्हणुन भेटली.. "

सोनाली " हो तेच.. आज गर्दी नव्हती म्हणुन पकडली आम्ही.. नाही तर नेहमी प्रमाणे एकाला उभ रहावं लागलं असत... "

सोनाली लग्न होऊन खुप चांगली हुद्यावर कामाला होती. शिक्षणाने हुशार आणि एका लहान मुलीची आई होती. घरात ति तिचा नवरा आणि मुलगी इतके राहायचे. सासु सासरे गावी शेती वाडी पाहायचे... पैशाची कमी नव्हती पण शिक्षण वाया का घालवायचं म्हणुन काम करत होती...

रमा " बरं प्रीती ला जागा पकडलीये ना.. नाही तर रडायची बिचारी... " रमा मस्करीत बोलते...

ट्रेन सुरु होते... प्रीती तिच्या स्टेशन वरून चढते..

प्रीती " मॅडम जागा क्लेम केली ना माझ्यासाठी..? "

नयना " हो तर. आताच आम्ही म्हणालो कि मॅडम जागे साठी रडतील... " अस म्हणुन नयना हसू लागते...

प्रीती "अगं मग काय एक तर सकाळी ही उभा राहुन जा आणि संध्याकाळी पण... तिथे ऑफिस मध्ये बॉस जीव खातो..."

सोनाली " सगळ्या ऑफिस मध्ये हीच दशा आहे...!"

रमा " बरोबर,... "

प्रीती लग्न होऊन तीन वर्षात डिवोर्स घेऊन आता स्वतःला नीट सेटल केलाय.. तस तर तिचा प्रेम विवाह असतो.. पण वयाच्या आधी माती खाल्ली होती. आई वडिलांन सोबत न राहता.. एक वेगळं आयुष्य बिनधास्त पणे जगत होती.... बॉस च्या हाताखाली असिस्टंट म्हणुन काम करत होती... त्या मुळे वेळेच बंधन नव्हतं...

रमा " सो उद्या शनिवार काही प्लॅन वगरे आहे कि नाही करायचा...? "

सोनाली " यार उद्या नको काही प्लॅन वगरे.. नाही तर तुम्ही तिघी जाऊन या...!"

प्रीती " का उद्या का नको..? अच्छा सेकंड हनिमून वगरे तर नाही ना...!" आणि प्रीती हसू लागते..

सोनाली " कसला हनिमून नि काय ... " ति नाराज होऊन बोलते...

.......

क्रमश...






0

🎭 Series Post

View all