Login

लेकाचा संसार भाग १

दोघात तिसरा नको
"तुझं काय डोकं फिरलं आहे का मल्हार?" काय बोलतो आहेस?" शांता रागातच म्हणाली.

"मी बरोबर बोलतोय आई. माझ्या बहिणीला इतका त्रास आहे तर तिने राहू नये तिथे. आताच्या आता जातो आणि तिला घेऊन येतो."

"थोडं शांत डोक्याने विचार कर. लग्न झालं आहे, एक मूल आहे. नवरा बायकोमध्ये वाद होत नाही का?" सरळ घटस्फोट घ्यायची काय वार्ता करतो."

"आई, खरंच शांतपणे विचार करायची गरज आहे?"

"हो तुझ्या बाबांमध्ये आणि माझ्यात वाद झाले नाही का कधी? आम्ही केला ना संसार? संसार म्हणजे भांड्याला भांडं लागणार."


तितक्यात शांताला तिच्या लेकीचा प्रियाचा फोन आला.

"आई, कशी आहेस?" प्रिया.

"कशी असणार मी? माझ्या लेकीचा संसार तुटतोय."

प्रियाला काही कळेना.

"आई, अगं काय बोलतेय. लेकीचा संसार तुटतोय? माझं तर सगळं ठीक चाललं आहे."

"काय? मग मल्हार मला म्हणाला की तुझ्यामध्ये आणि जावई बापूंमध्ये खूप मोठी भांडण झाली."

"काहीही काय? असं काहीच झालं नाही. तू फोन दे त्याला?"


शांताने मल्हारला फोन दिला.

"मल्हार, हे मी काय ऐकते आहे? तू आईला खोटं का सांगितले? माझी आणि माझ्या नवऱ्याची काहीच भांडण झाली नाहीयेत."

"हो मला माहितीये ताई, तुझं सगळं व्यवस्थित चाललं आहे, पण मला आईची प्रतिक्रिया बघायची होती."

"का पण?"

तू संध्याकाळी घरी ये मग सांगतो.

तो दिवसभर काहीच बोलला नाही. शांतच बसला. त्याला माहीत होतं प्रिया आणि शांता दोघींना जाणून घ्यायचे होते की तो खोटं का बोलला होता.

प्रिया आली. रागातच होती.

तडक मल्हारच्या रूममध्ये गेली. शांता तिच्यासाठी पाणी घेऊन आली.

"मल्हार, काय बालिशपणा लावला आहेस?"

"हो ताई बालिशपणा केला आहे. करावा लागला."
त्याच्या बोलण्याला वेगळीच धार होती.

शांता आणि प्रिया एकमेकींना पाहू लागल्या. का कोड्यात बोलत होता देव जाणे? इतकं मात्र होतं की नक्कीच काहीतरी घडलं होतं.

"ताई, तुझ्यात आणि भाऊजीमध्ये कधी वाद होतात का?"

"हो होतात. कधी कधी काही गोष्टी पटत नाही, तेव्हा आम्ही भांडतो, रुसतो,पण पुन्हा व्यवस्थित बोलतो."

"इतकं करण्यापेक्षा घटस्फोट घ्यावा असा विचार येत नाही का?"

"मूर्खां काहीही काय बोलतोय. बंद कर तुझं कोड्यात बोलणं. नीट काय ते सांग."

"सांगतो."

आता दोघीही लक्ष देऊन ऐकू लागल्या.

क्रमशः
अश्विनी ओगले.
२६/११/२०२५
0

🎭 Series Post

View all