सारंग चव्हाण : विविध पैलूनी नटलेले दमदार व्यक्तीमत्व
हिरगवागार निसर्ग , ओसंडून वाहणाऱ्या नद्या , ऊस , भुईमूग , भात , मक्का अशा पिकांची रेलचेल , फणस , आंबा , काजू फळझाडांनी डवरलेली सृष्टी , प्रेमळ माणसांची मांदियाळी , अनेक ऐतिहासिक वारसा लाभलेली पवित्र भूमी , तांबडा - पांढ-या रस्याचा लज्जतदार तडका , कलाकारांची खाण अशा वैविध्याने नटलेली कोल्हापूरवासियांची भूमी म्हणजे जीवनातील अद्भूत नजारा आहे .या मातीने अनेक रत्ने निर्माण केली त्यांनी या मातीची महती सातासमुद्रापार नेली अशा चैतन्यमय मातीतील एक रत्न आम्हाला लाभले ते म्हणजे लेखक सारंग चव्हाण ...!!
ऐतिहासिक पन्हाळगडाच्या पायथ्याशी पुनाळ गावातील अनेक कलाकारापैकी एक असलेले सारंगसर म्हणजे कलागुणांची खाण आहे.शालेय जीवनापासून खोडकर असलेले हे गुणी व्यक्तीमत्व शाळेच्या विविध कार्यक्रमात हिरिरीने भाग घेत.ऐतिहासिक नाटकातील भूमिकाही वठवल्या.कॉलेज जीवनात भरपूर आनंद लुटला .वैवाहिक जीवनात अनेक जबाबदा-या पेलत वाटचाल चालूच आहे.मोटारसायकल चालवण्याचा भारी छंद यातूनच छोटासा अपघात ..आणि मग बेडवर विचारांचे काहूर त्यातून मनातील भावनेला लेखणीची जोड देत एका उमद्या लेखकाची निर्मिती ....!! खरतर शेताशी नाळ जोडून असणा-या या व्यक्तीला शब्दांचे नाते जोडावे वाटले.फेसबुकवर प्रेमाच्या चारोळ्यांचा पाऊस त्याला मिळालेला अभूतपूर्व प्रतीसाद यामुळे लेखणीला जोम चढला.यातूनच ईरा व्यासपीठाची कुणकुण लागली आणि एका कसलेल्या साहित्यिकाची ईरामध्ये दमदार इंट्री झाली मग सुरु झाला नवा प्रेरणादायक प्रवास ..!!
ईरा आणि सारंगसरांचे नाते रुळायला लागले.लेखक , लेखिकांंचा सकारात्मक संवाद होऊ लागला त्यातूनच अनेक कथांची निर्मिती होऊ लागली .त्यांनी चकवा कथेतून प्रगल्भ साहित्याची निर्मिती केली येथून त्यांच्या शब्दांना धार येऊ लागली.माऊली कथेने कौटुंबिक मन जोडली.अनेक लघूकथांनी मनाचा ठाव घेतला.वाचकांना त्यांच्या कथा इतक्या आवडू लागल्या की त्यांचे फोनवरुन कौतुक व्हायला लागले.अनेक कथा ईरावर विजयी झाल्या.लेखनाचे कार्य त्यांचे चालूच आहे.साहित्यक्षेत्रातील सर्व अनुभवामुळे त्यांनी ईराच्या प्रशासकीय टीममध्ये मानाचे स्थान आहे. सगळ्यांना समवेत घेऊन जाण्याची वृत्ती आणि कठीण प्रसंगात साथ देण्याची साधना सर्वांचा उत्साह वाढवते.चॕम्पियन ट्राॕफीमध्ये संघ भावना वाढीस लागण्यास सहकार्य , व उत्कृष्ट कर्णधाराबरोबर स्पर्धेत लेखकांची उणिव भासत असताना स्वतः दुसरे लेखकांना आवाहन करुन स्पर्धा यशस्वी पार पाडली अशा गोष्टी मनाच्या दिलदारपणाणेच घडतात.
ईरामधील त्यांचे भक्कम स्थान व अनुभवशिल लेखक म्हणून ख्याती सर्वत्र आहे.ईरामध्ये दररोज नवे लेखन सातत्याने येत असते.नवे लेखक तन्मयतेने ईरामध्ये लेखन करत आहेत.अनेकवेळेला अनेक जबाबदा-या सांभाळून लेखन लेखकमंडळी लिहीत असतात अशावेळी व्याकरणाच्या चुका होत असतात.आपण लिहीत असलेले लेखन हे व्याकरणाच्या दृष्टिकोनीतून शुद्ध असले पाहिजे यासाठी ईराच्या सर्वेसर्वा आदरणीय संजना मॕडम यांनी ईरावर शुद्ध लेखन यावे यासाठी सारंगसरांची नेमणूक केली.अतिशय परखडपणे हि भूमिका निभावताना प्रत्येक लेखकांच्या कथांचे योग्य परिक्षण ते करतात त्यामुळे लेखकांचा लेखणात ब-याच प्रमाणात सुधारणा झाल्या आहेत.ईराच्या भावी वाटचालीसाठी हे अभिमानास्पद आहे.
ईराच्या विविध उपक्रमात सहभाग , स्पर्धांचे आयोजन , लेखकांना प्रोत्साहन , शेतीशी नाळ , पिकांच्या सानिध्यात वास्तव्य , मदतीची भावना , स्पष्ट आणि रोखठोक स्वभाव , सामाजिक जाण , ऐतिहासिक गोष्टींची ओढ , जोत्याजी स्मारकारची डागडुजी करण्यास मोलाचा वाटा , तरुणांचे आदर्श , पिळदार व तगडी शरीरयष्ठी यामुळे कुस्तीमध्येही चांगले मल्ल म्हणून नावलौकिक या सोबत लेखणीला प्रतिभेची जोड अशा विविध गुणांच्या परिसस्पर्शाने भारलेले हे व्यक्तिमत्व तुम्हा आम्हा सर्वाना मिळालेली देणगी आहे.त्यांचा हा सुवर्णस्पर्श सर्वाना चैतन्यमय ठरावा .त्यांचे लेखन असेच बहरत जावे , त्यांचे जीवन असेच आनंदाने व सुखाने सजावे यासाठी त्यांना खूप - खूप शुभेच्छा ...!!
©®नामदेवपाटील
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा