Login

लेखिका रोहिणी बांगर : बहारदार लेखनाचे नवे आशास्थान

लेखणी हे प्रतिभेचे वरदान आहे.
लेखिका रोहिणी बांगर : बहारदार लेखनाचे नवे आशास्थान..!!

रोहिणी नक्षत्र आणि शेतकरी यांचं नात खूपच सुंदर आहे. शेतकरी शेतीची सगळी मशागतीची कामं रोहिणी नक्षत्राच्या अगोदर करुन घेतो. मशागत झाल्यानंतर शेतक-यांना वेध लागतात पेरणीचे..! रात्रीच्या आकाशात एक झगमगाट चमकत असतो. शांत चांदण्यात याचे सौंदर्य अधिकच खुलुन दिसते. याच रोमहर्षक वातावरणात गावाकडील शिवारात नवचैतन्य उसळलेले असते. नव्या आशेच्या पालवीने मन उभारी घेते.शेतकरी मोठ्या आनंदाने पेरणीसाठी सज्ज असतो. धरतीमाता नव्या अंकुरासाठी आतुरलेली असते. रोहिणी नक्षत्रात सृष्टीचा साजच बदलतो. तिचं हे मोहक रुप धरतीच्या किमयेने अधिक बहारदार बनते. समृद्धीची बरसात करणारे हे रोहिणी नक्षत्र आशेचा उगम देण्याचा शुभ संकेत देते. अशाच रोहिणी नक्षत्रासारखे ईरावर लेखणीतून पखरण करणाऱ्या आदरणीय रोहिणी बांगर या चतुरस्र लेखिका आहेत.

आपल्या लेखनशैलीतून अद्भुत लेखनाचा नजारा सादर करताना ईरावर त्यांनी वाचकांना आकर्षित केले आहे. लेखकांने समाजाभिमूख लिखाण केले तर समाजातील विविध बदल सकस विचारांची दिशा पकडतात पर्यायाने समाजात सकारात्मक वैचारिक बदल घडून नव्या समृद्धीने समाज अधिक बलवान बनतो अशा वैचारिक प्रतिभेने भारलेले लेखिका रोहिणी बांगर यांचे लेखन वाचकांना अधिक समृद्ध करते.

ईरावरील त्यांनी वर्षभरापूर्वी लेखनाला सुरवात केली. सातत्यपूर्ण लिखाण करताना जाऊबाईचा थाट ,सुख म्हणजे नक्की काय असतं,सुरवात नव्या संसाराची ,आभाळाएवढी तिची माया ,मला हे लग्न मान्य नाही , सुख मातृत्वाचे ,कधीतरी माझंही ऐकशील का ? , विधवा - एक नवा प्रवास , सावल्यांच्या कुशीत ,अशी जुळली गाठ, वाट प्रेमाची ,मातृत्व , स्वप्नांची पाऊलवाट ,नव्या वाटेवरची सुरवात ,गुढ सावली ,बापाची माया ,मोलाची पाटी , सुरवात नव्या संसाराची अशा अनेक कथा व कथामालिकेतून त्यांनी आपली साहित्यिक प्रतिभा ईरावर जपली आहे. लिखाणात अर्थगर्भता, प्रभावी मांडणी , दर्जेदार कथानक, प्रसंगनिर्मितीतील जीवंतपणा , ओघवती भाषाशैली अशा अनेक पैलूनी त्यांचे लेखन नटलेले आहे.

लेखनातील विशेष आवडीमुळे ईरावरील स्पर्धेत त्यांचा सहभाग मोलाचा असतो. जलदलेखन स्पर्धेत त्यांनी यश मिळवले आहे. ईराच्या ऐतिहासिक चॕम्पियन स्पर्धेत त्यांचे लिखाण बहारदार झाले आहे. सांघीक लिखाणात त्यांनी आपली छाप पाडली आहे.नुकत्याच पार पडलेल्या ईरा चॕम्पियन स्पर्धेत ' सर्वात्कृष्ट भावनिक लेखन ' पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे.

प्रेमळ व हसतमुख स्वभाव ,मदतीची निरपेक्ष भावना ,प्रामाणिकपणा व माणुसकीचा प्रत्यक्ष कृतीतून वापर ,परिस्थितीची जाणिव अशा विविध संस्कारक्षम गुणांनी सजलेले व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय रोहिणी बांगर ..! लेखनातील छंदामुळे त्यांनी आपली नवी ओळख साहित्यिक प्रवासातून करुन दिली आहे. त्यांचा लेखनाचा हा बाज असाच बहरत रहावा ,त्यांचे लेखनात सातत्यता अशीच रहावी यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ..!!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!

©नामदेव पाटील
0