Login

लेखिका सुप्रिया शिंदे - महादेवकर : बिनधास्त जीवनाच्या पुरस्कर्त्या

ईरा : शब्दांचा वेल गेला गगनावरी
लेखिका सुप्रिया शिंदे - महादेवकर : बिनधास्त जीवनाच्या पुरस्कर्त्या

स्रीचे संस्कारक्षम असणे हे अतिमहत्वाचे असते.तिच्या संस्काराने अखंंड मानवी जीवन समृद्ध झाले आहे.लहाणपणापासून स्रीयांच्या अंगभूत गुणांची छाप सर्वांच्यावर पडते.स्रीयांची कोणतीही गोष्ट ग्रहण करण्याची शक्ती अफाट आहे हे दर्शवते.त्यांची प्रगल्भ बुद्धिमत्ता अनेक जटील प्रश्न हातावेगळे करते.त्यांची कुशाग्र बुद्धी शिक्षणात तर अग्रेसर आहे.वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी आपला प्रभाव टिकवून ठेवला आहे.बौध्दिक क्षमता भरपूर असली कि यश हमखास मिळते हे त्यांच्या वैचारिक भरारीने वेळोवेळी सिद्ध केले आहे.स्रियांचा हा संस्काररुपी वारसा आपल्या संस्कृतीला नवसंजीवनी देणारा आहे.त्याचे प्रतिबिंब समाजातील प्रत्येक घटकावर पडल्यामुळे समाज दिवसेंदिवस सदृढ होऊ लागला आहे.अशाच संस्काराची व बौध्दिकतेची चमक दाखवणा-या निष्णात लेखिका म्हणजे सुप्रिया शिंदे - महादेवकर या आहेत.

लहाणणीच शालेय जीवनात सुप्रियाजी यांनी आपला ठसा उमटवला आहे.तिच सातत्यतता पुढील शैक्षणिक जीवनात त्यांनी कायम ठेवली.आपल्या कुशाग्र बुद्धीने त्यांनी इंजिनियरचे क्षेत्र गाजवले.इंजिनियरची मुले , मुली मुळात हुशार असलेमुळे कोणत्याही क्षेत्रांशी ती लगेच समरस होतात सध्या अशा अनेक लेखिका लेखनकशी जोडल्या गेल्या आहेत हे सुप्रियाजींच्या लेखनसंपदेवरुन सहज लक्षात येते.ईरा या व्यासपीठावर स्वतः अनेक क्षेत्रांशी निगडीत असूनसुद्धा लेखन करत आहेत यातच त्यांची दष्टी प्रतिभा स्पष्ट होते. ईरावरील त्यांचे भारदस्त लेखन त्यांच्या प्रतिभाशक्तीची ताकद दाखवते.विविध विषयावरील त्यांच्या कथा दर्जेदार आहेत.ईराच्या जलद कथा , चॕम्पियन ट्राॕफी , अष्टपैलू स्पर्धा , राज्यस्तरीय स्पर्धा अशा सर्व स्पर्धेत त्यांनी आपल्या लेखनाची विशेष चमक दाखवली आहे.कविता , चारोळी , अभंग यामध्येही त्यांना मनापासून आवड आहे.त्यांचे व्हिडीओ फार कल्पकतेने बनवलेले असतात त्याच्यातून त्यांच्या विविध कला समजतात .त्यांना सुत्रसंचालनही फार छान जमते.तसेच त्या कॉम्प्यूटरच्या मुलांना शिक्षण देण्याचे काम उत्साहाने करत आहेत.

सतत बडबडणारा स्वभाव , वेगळ्या गोष्टी करण्याचा ध्यास , व्यक्त होण्याची सवय , कौटुंबिक जीवनात रमणा-या , सहजीवनाचा आनंद लुटणा-या , उच्च शिक्षित असूनसुद्धा नम्रतेने भारलेल्या , मैत्रिचा धागा जपणा-या , लहान मुलात रमणा-या जीवनातील प्रत्येक गोष्टींचा आस्वाद घेऊन बिनधास्त जीवन जगणाऱ्या सुप्रियाजी म्हणजे आनंदाचा ठेवा आहेत.ईरा या व्यासपीठामुळे त्यांच्या विचारांना चालना मिळाली.विविध विषयात व्यक्त होताना त्यांच्या लेखनात सातत्यता आली.कौटुंबिक जबाबदारीचे भान आणि नोकरीतिल प्रामाणिकपणा याचा सुरेख संगम साधत त्यांनी लिखाणात यश मिळवले आहे.शिक्षणातील त्यांची वाटचाल अजून चालू आहे त्यातून त्यांची जिद्द दिसून येते.अशा या लेखिकेचे पुढील आयुष्य आनंददायक जावे.त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण यावेत.त्यांचे कौटुंबिक जीवन फुलावे , त्यांचे लेखन आणखी बहारदार व्हावे , त्यांना आरोग्यसंपन्न आयुष्य लाभावे हीच मनापासून प्रार्थना …!!

आनंदाचे क्षण वेचावे
जीवन समृद्ध व्हावे
लिखाणात मन रमावे
नित्य समाधान लाभावे

©नामदेवपाटील