लेकीचं माहेरपण : भाग २

लेकीचं माहेरपण म्हणजे आईसाठी सोहळा असतो
विषय : मुलीची आई

   "थांब गंss", अनघा घरात येऊ लागते तसे मीनाताई तिला अडवतात आणि तिच्या नवर्‍याचे व तिचे औक्षण करून दोघांवरून तुकडा ओवाळून टाकतात.

अनघा तिच्या नवर्‍यासोबत घरात येते.
"अजित तुम्ही कायं घेणार चहा की कॉफी ?", मीनाताई आपल्या जावयाला विचारतात.

"आई आत्ता काहीच नको मी फक्त अनघाला सोडायला आलो आहे. "

"अहो असं कसं लग्नानंतर अनघा पहिल्यांदा माहेरी रहायला आली आहे तर तुम्ही असं काहीचं न घेता गेला तर बरं नाही वाटणारं", मनोहरपंत जावयाला आग्रह धरतात.

" आई मी अनघाला न्यायला येईन तेव्हा जेवायलाचं येईन पण आज ऑफिसमध्ये मिटींग आहे अर्जंट मला जावे लागेल. ", अजित त्याची बाजू मांडतो.

" हो आई यांना जावू दे अगं सासूबाईंनी हट्ट धरला म्हणून हे सोडायला आले यांना खूप काम आहे. ", अनघाचे बोलणे ऐकून मीनाताई आणि मनोहरपंत पुढे काही बोलतं नाहीत. मीनाताई स्वयंपाकघरात जातात आणि पट्कन एक डबा घेऊन येतं जावयाला देतात.

" अजित अनघाला आवडतं म्हणून घरी श्रीखंड केलं आहे तेवढं खा नक्की . ", श्रीखंडाचे नाव ऐकून अनघा भलती खूश होती. अजित मीनाताईंच्या हातातून डबा घेऊन सर्वांचा निरोप घेतो आणि ऑफिससाठी रवाना होतो.

अजितला निरोप देऊन सगळे घरात येतात तशी अनघा मीनाताईंना बिलगतचं सोफ्यावर बसते.

" अनूss हळू गं ", मीनाताई आपल्या मुलीला जवळ घेतं बोलतात.

"कायं गं ताई पंधरा दिवसांपूर्वीचं नवर्‍याला घेऊन आली होती ना तु मगं तरीही चौदा वर्षांचा वनवास संपवून भेटल्यासारखी कायं गळाभेट घेतं आहेस?", अर्थव अनघाचे केस ओढतं विचारतो.

"ए आई सांग गं यालाss"

"अर्थव अरे आत्ताच आली आहे तिला नको त्रास देऊ जा तिची बॅग आत नेऊन ठेवं.", मीनाताई अर्थवला ओरडतात.

"अहो बाबा तुमची मुलगी चार दिवसांसाठी आली आहे की महिन्याभरासाठी किती जड बॅग आहे", अर्थव बॅग रूममध्ये घेऊन जात बोलतो तसे मनोहरपंत हसतात.

"आई खूप भूक लागली आहेss.. मी आज नाष्टा पण नाही केला ", अनघा मीनाताईंना लाडात येऊन बोलते.

" हो गं अनूss चलं सगळे तयार आहे तु हातपाय धुवून घे. अर्थव मला जरा मदत कर ", मीनाताई उठून स्वयंपाकघरात जातात आणि जेवण बाहेर घेऊन येतं पाने मांडायला घेतात.

अनघा फ्रेश होऊन येते आणि समोर पान बघून एकदम खूश होते.
" बापरे! आई अगं किती केले आहेस तु? पुरी, बटाट्याची भाजी, श्रीखंड, कोशिंबीर, चटणी, पापड, मुग भजी.. अहाहाआ बघूनचं पाणी सुटलं.. आज भरपूर जेवणारं मी", असे म्हणतं खुर्ची ओढतं अनघा बसते आणि जेवण करायला सुरुवात करते.

क्रमशः


🎭 Series Post

View all