लेकीचं माहेरपण : भाग ३ (अंतिम भाग)

लेकीचं माहेरपण म्हणजे आईसाठी सोहळा असतो
विषय : मुलीची आई

"हो जेवं असेही तुझ्या आवडीचे आहे सगळे आम्हाला कोणं विचारणार आता तु आल्यावर?", अर्थव तोंड वाकडे करतं बोलतो.

"ह्म्म आई माझ्यावर जास्त प्रेम करते म्हणून कायमचं जळतोस तु", अनघा ही त्याला चिडवते.

"प्लीज मी का जळू तुझ्यावर?", अर्थव ही तिला स्पष्ट उत्तर देतो.

"ए भांडू नका रे तुम्ही? अनघा  तु येणारं तर तुझ्या आईने सगळ्या घराचा पार नक्षा बदलला आहे. दोन दिवस तुला आवडते म्हणून शंकरपाळे, चकल्या, चिवडा, खाकरा कायं कायं बनवले आहे तिलाच माहित. आज सकाळी ही लवकर उठून सगळे केले. ", मनोहरपंत आपल्या लेकीला सांगतात.

"हो ना बाबा ते दिसतयं. आई तु कमाल आहेस गंss ", अनघा आईला चिटकते तशा मीनाताई तिच्या डोक्यावरून हात फिरवतं तिला घास भरवतात.

" केवढं ते प्रेम? मी गावावरून आलो तर आई असं करतं नाही पण हीचं सासरं गावातचं आहे आणि सासरहून आली आहे तर केवढे लाड?", अर्थव मुद्दाम खोचकपणे बोलतो.

" अरे अर्थव तसं काही नाही पण अनघा माहेरपणासाठी आली आहे ना म्हणून.", मीनाताई अर्थवला समजावून सांगतात.

"माहेरपणाचं एवढं काय कौतुक आई? हे जरा अती नाही का झाले बाबा? ", अर्थव विचारतो.

" ह्म्म खरंय ", मनोहरपंत मुलाच्या बोलण्याला सहमती दर्शवतात.

"तुम्हाला नाही कळणारं. सासरं जरी आयुष्यभराचं हक्काचं घर असलं तरीदेखील मुलींना मोकळेपणा फक्त माहेरी आल्यावर मिळतो. सासरी प्रत्येक व्यक्तीची आवड जपता जपता मुलगी स्वतःला कायं आवडतं हे विसरते कालांतराने. तिला स्वतःचा विसर पडतो.

मुलगी सासरी नांदत असते पण माहेरी आलं की ती खरी जगतं असते. तुम्ही दोघेही पुरुष आहातं त्यामुळे एका स्त्रीसाठी माहेरपण म्हणजे कायं? त्याचं सुख कायं नाही कळणारं तुम्हाला?

लहानपणी मुलीचा प्रत्येक हट्ट पुरवणाऱ्या आईला लेक जेव्हा सासरी जाते तेव्हा एक रिकामपणं येतं. एखादा पदार्थ केला की तिला त्या पदार्थाकडे पाहून मुलीची आठवण येते. कधीतरी सासरं आणि माहेर एका गावात असले तर किमान काही गोष्टी मुलीपर्यंत पोहचवता तरी येतात आईला पण मुलगी दूर असेल तर तेही शक्य होतं नाही.

मुलीचे सगळे लाड करण्यासाठी आईजवळ फक्त मुलीच्या माहेरपणातले हे चार चं दिवस तर असतात. तुम्ही सकाळपासून माझी थट्टा करतं होता, मी कोणी खास पाहुणा येतं आहे असे वागतेयं असे म्हणतं होता पण मुलगी माहेरपणाला येणं हा प्रत्येक आईसाठी एक सोहळा असतो.

मुलीचं माहेरपण जपताना आईला किती सुख मिळतं ते नाही कळणार तुम्हाला. ", मीनाताई बोलतातं तशी अनघा अजूनचं घट्ट बिलगते आईला, मनोहरपंत आणि अर्थव मात्र माहेरपणचा एक अनोखा सोहळा याची देही याची डोळ्यांनी टिपून घेत होते.


            **समाप्त **

लेक म्हणजे माहेरचा आनंद असतो आणि लेकीचं माहेरपण म्हणजे आईचं सर्वात मोठं सुख.


🎭 Series Post

View all