भाग -2
"झोपुन काय होणार, बहीण आली आहे तुमची.. उठा आता."
बाहेरून मिताली जोर जोरात आवाज देते, " पाहिलं उठा आता.. "
बाहेरून मिताली जोर जोरात आवाज देते, " पाहिलं उठा आता.. "
मितालीचा आवाज ऐकुन, तिचा नवरा खाडकन उठतो, " खरंच ही आली आहे.. माला वाटलं भास होतो आहे की काय.. " आणि तो हसायला लागतो.
त्याचं हसन पाहुन मितालीला अजुन राग येतो,' हसायला काय झालं..? आता मागच्याच महिन्यात त्या आलेल्या आता पुन्हा आल्या.. "
" अगं हो हो किती चिडचिड करशील.. "
आणि तो बाहेर हॉल मध्ये येतो, " हे काय अजुन झोपलेलास..? अरे वाजले बघ किती, आज ऑफिस नाही का..? " मितालीची नणंद विचारते.
" अहो फ्रेश होऊन घ्या, चहा देते.. "
" फक्त चहा..? नाश्ता वगरे काही बनवलास की नाही..? " नणंद विचारते.
" नाही ताई बनवला की, उपमा आहे केलेला तुम्हाला पण देते.. " मिताली नाश्ताच्या तीन डिश भरून आणते.
" अगं सकाळी सकाळी कोण हे तेलकट तिखट खातं, मला नको बाई.." असं बोलुन ती डिश मितालीच्या पुढ्यात सरकावते.
" अहो ताई आमच्याकडे असाच नाश्ता बनतो, उलट आई हे आवडीने खातात.. " मिताली बोलते.
" त्याचं राहुदे गं पण आई, तिचं कॉलेस्ट्रॉल आधीच वाढलेल त्यात हा असा नाश्ता देणार. आई उद्या पासुन मि तुला माझ्या हातुन बनलेला नाश्ता देईन.. " आणि ती डिश मितालीला उचलायला सांगते..
दुपार होते, मिताली चपात्या करत असते तेवढ्यात तिची नणंद पाठी येऊन उभी राहते, " चपात्या करतेस, बरं ऐक माझ्या चपातीला तुप लाव. आणि हो आईला सुक्या दे चपात्या तेल तुप काही लावु नकोस.. " नणंद जणु तिच्या डोक्यावरच येऊन बसली होती.
" अहो ताई माहित आहे की माला, त्यांचं डायट मि व्यवस्थित रित्या पाळते तुम्ही नका घेऊ टेन्शन.. " मिताली तिला जशासतसं उत्तर देते...
हे ऐकुन तिच्या नणंदेचा चेहरा पडतो.
" बघ बाई मि आपलं सांगायचं कामं केलं, शेवटी तु ह्या घरची सुन मि काय आपली मुलगी.. " आणि ती रडायला चालु करते.
" अहो ताई रडता कशाला शांत व्हा.. " मिताली तिला पियायला पाणी देते.
मुलीचा रडण्याचा आवाज ऐकुन तिची सासु स्वयंपाक घरात येते, " काय गं मिताली हिला काय झालं.. आणि ही अशी रडते का.. "
मिताली घाबरते, आता नणंद काही बोलेल आणि सासु तिची शाळा घेईल..
मिताली घाबरते, आता नणंद काही बोलेल आणि सासु तिची शाळा घेईल..
क्रमश..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा