आयुष्याची वाटचाल!

आयुष्यावर बोलू काही!

'आत्मचरित्र' हा विषय विचार करूनच टेन्शन आलं. आज पर्यंत थोरामोठ्यांचे आत्मचरित्र वाचले होते पण स्वतःच आत्मचरित्र लिहिणं लाईफ मध्ये महान काम केलं नाही असं वाटलं. पण नंतर असं वाटलं की आयुष्य कोणाचं कसंही असू दे ,संघर्ष सगळ्यांच्या आयुष्यात असतात सगळ्यांच्या परीने ते त्यांच्या आयुष्यासाठी संघर्ष करतच असतात. विषय आवडला पण लिहायचं काय आहे प्रश्न पडला. आयुष्यात सगळ्यांच्यात किती उतार चढाव असतात सगळं कसं आणि काय लिहायचं हा एक प्रश्न डोक्यात घुमायला लागला. तुझं लाईफ तू कशी घालवत आहे त्याच्याबद्दल सुद्धा जाणीव होईल असा विचार करून स्वतःशीच हसले!

माझे नाव 'वैशाली' आमचं गाव सोलापूर पण वडिलांच्या नोकरीसाठी पुण्यालाच आलो. माझा जन्म ,शिक्षण पूर्ण बालपण सगळं तिथेच गेले. पुण्याला आई वडील बहीण भाऊ अशी आमची छोटी फॅमिली, पाहुणे ही कधी तरी येत होते. त्यांच्या आमच्या शी जास्त संपर्क येत नव्हता. तेवढ्या पुरते तेव्हढे! मी शाळा ,कॉलेज,क्लास मध्ये बिझी असायचे.कधी घरातलं काम ही जास्त केलं नव्हते. वरवरचे काम करून मोकळे? आजोळी ही वर्षातून एकदा जात होतो.लाईफ एकदम शांत कोणाची तकत्तक नाही.आपल्या स्वप्नांच्या दुनियेत निवांत चालू होती.

लग्न झाले आणि लाईफ माझी पूर्ण उलटी फिरली. जबाबदारी म्हणजे लग्नाच्या आधी माहीतच नव्हते पण लग्नानंतर जबाबदारी पडल्यावर घाबरून गेले होते.मी मोठ्या जॉईंट फॅमिलीमध्ये आले.सगळं काही नवीन होतं. कोणाशी काय बोलावं कसं बोलावं काही कळेना. सगळ्या गोष्टीत कन्फ्युज होत होते. कोणी काय बोलले की लगेच घाबरल्यासारखं व्हायचं. पाहुण्यांचा पाहुणचार वैगरे काहीच कळत नव्हते.नेमका संसार कसा करायचा हाच मोठा प्रश्न चिन्ह!,सगळ्यांचे स्वभाव भिन्नभिन्न, माझा स्वभाव तर खूप शांत ,कन्फ्युज लगेच घाबरून जाणे, त्यामुळे कधी कधी राग अनावर व्हायचा आणि तोंडून वेगळी शब्द बाहेर निघायचे. मग त्या शब्दांचा अर्थ वेगळा निघायचा. मनात जरी ते नसलं तरी ओठावर आलं होतं ना, त्यामुळे नात्यांमध्ये गुंता होऊ लागला. हळूहळू आपल्याला मिक्स होता येणार नाही असं वाटू लागले मग फक्त आपल्या कामापुरताच बोलायचं, इतकं धोरण स्वीकारले. मग एकटी पडल्याचं जाणवायला लागलं, कारण कोणाशी लवकर मी अटॅच होऊ शकत नव्हती. भीती वाटायची आपण काय बोललो आणि त्या शब्दांचा दुसरा अर्थ निघाला तर एकतर नात्यांमध्ये कुठला धागा तुटू नये अशी एक मनात भीती होती. आपल्यामुळे तर मुळीच नाही कारण मोठी फॅमिली होती कोणाला दुखवू वाटत नव्हते. लग्नाची नवीन दिवस खूपच अवघड जात होते पण माझ्या सोबतीला माझे मिस्टर सावलीसारखे बनवून माझ्यासोबत आहेत. सगळ्या गोष्टीत मला समजून सांगायचे समजून घ्यायचे अजूनही सगळ्या बाबतीत मला समजून घेतात. त्यांचा सपोर्ट नसला असता तर मी जॉईंट फॅमिली मध्ये एकत्र राहू शकले नसते.

लग्नानंतर दोन वर्षांनी माझे सासरे गेले. तेव्हा आमची पूर्ण फॅमिली कोलमडून गेली होती. आमचे सासरे गेल्या नंतर तीन महिन्याने माझ्या मिस्टरांना मेडिकल इशू चालू झाला. आधीच सगळेजण एका धक्क्यातून सावरले नव्हते की माझ्या मिस्टरांचा वेदनादायक प्रवास चालू होता.लग्नाच्या आधी दवाखाना कधी माहितीच नव्हता. पूर्णपणे आयुष्य तिथेच थांबल्यासारखं वाटत होते. तेव्हा डॉक्टरांनी लवकरात लवकर ऑपरेशन करायला सांगितले.खूप घाबरून गेले होते. रडण्या शिवाय दुसरं काहीच करता येत नव्हते. त्यावेळी डोक्याने काम करणं सोडून दिले होते. दुसऱ्या दिवशीच लगेच ऑपरेशन केलं.पाच सहा दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर तीन चार महिने खूप काळजी घेतली.हळूहळू तो काळ सुद्धा निघून गेला. पण मनाला एक भीती सारखी वाटत होती खूप सारे प्रश्न पडायचे. तेव्हा खरंच मला कोणाच्यातरी आधारची गरज होती.पण तेव्हा मला खंबीर राहायचं होतं!


दोन वर्षानंतर आमच्या आयुष्यात छोटी परी आली. पहिल्यांदाच आई बनले होते त्यामुळे पुन्हा नवीन जबाबदारी अंगावर आली होती.
जॉइंट फॅमिलीचा तेव्हा एक खूप चांगला फायदा झाला कारण घरातली बाकीची मुलं त्यांचा अनुभव आणि आपल्या मुलांनाही त्यांचे प्रेम सगळं काही मिळत असल्याचा आनंद भेटत होता. सगळं काही सुरळीत चालू होते. मुलगी दोन वर्षाची झाली तेव्हा दुसरी प्रेग्नेंसी डिटेक्ट झाली. आता वाटले आपली लाईफ व्यवस्थित चालू होत आहे. पण पुढे काय होणार कोणालाच माहीतच नसते. माझ्या मुलीचे मेडिकल इशू चालू झाले.
पुन्हा दवाखाना म्हणून आम्ही दोघी नवरा बायको खचू लागलो. मिस्टरांचा तर दवाखाना चालूच होता त्याबरोबर आता मुलीचा पण दवाखाना म्हणून डोकं फुटायची वेळ आली होती. त्यात मी प्रेग्नेंट! मग सतत सारखी चिडचिड व्हायची. कधी कधी वाटायचं सगळं सोडून निघून जावे. कुठल्या गोष्टीची कमी नव्हती .पण अन्न गोड लागत नव्हते. सुखाची झोप लागत नव्हती .नऊ महिने कसे गेले कळलेच नाही आणि माझ्या जीवनात कान्हा आला. सगळ्यांना आनंद झाला.पण नंतर नंतर माझ्या मुलीचा त्रास वाढत चालला तिचा दवाखाना माझा दवाखाना जुळूनच आले होते.ज्यावेळी तिला माझी गरज होती त्यावेळी मी तिच्या सोबत नव्हते. पण फॅमिली असल्यामुळे तो एक फायदा झाला.तिच्याकडे लक्ष देणारे भरपुर होते. नवरा बायको पासून आम्ही फक्त आई वडील बनलो हे आमच आम्हालाच कळले नाही. आमच्यासाठी आम्ही वेळच काढला नाही. फक्त सतत मुलांचाच विचार करत होतो. हळूहळू तेही दिवस जाऊ लागले. दोन्ही मुले शाळेत जाऊ लागले .तसा हळूहळू डोक्यातले विचार कमी होऊ लागले .थोडसं रिलॅक्स वाटू लागले. मुलांमुळे आम्ही दोघांनी कधी आमच्याकडे लक्ष दिलं नव्हतं. मग आम्ही दोघे जण आमच्याकडे लक्ष देऊ लागलो. माझ्या मिस्टरांनी स्वतःच्या तब्येतीकडे मनापासून लक्ष दिलं आणि आताही स्वतःच्या तब्येतीला खूप जपतात कारण त्यांना जीवनाची किंमत शिकवली होती. आपल्या फॅमिली च्या खंबीर उभे राहायचे तर आपण पाहिले आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची.आपण व्यवस्थित तर आपली फॅमिली व्यवस्थित!

हळूहळू नात्यांचीही परीक्षाही पास होऊ लागलो. जीवनात कठीण - आनंदाचा काळ सगळं काही बघून पुढे येऊ लागलो. शाळेतले पेपर देताना त्याचे उत्तर कुठल्यातरी पुस्तकात सापडतात पण आयुष्याचे पेपर देताना त्याचे उत्तर कुठे सापडत नाही ते आपल्याला पेन हातात धरल्यावरच लिहिता येतात. असंच असतं ना आयुष्य! जोपर्यंत जबाबदारी पडत नाही तोपर्यंत त्या जबाबदारीचे ओझं आपल्याला कळत नाही. आता दोन्ही मुले मोठी झालेली आहेत.

आयुष्याची परीक्षा देताना आपल्याला काय आवडते तेच विसरून गेले होते. मुलांचा अभ्यास घेता घेता लक्षात आले.आपण वाचन पूर्ण बंद केले आहे.मग हळू हळू मुलांच्या पुस्तकांसोबत माझ्या साठी ही पुस्तकं आणू लागली.वेळ मिळेल तसं पुस्तकं वाचू लागली. नंतर मोबाईल मधेच सर्च केले की वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल माहिती मिळू लागली ऑनलाइनच पीडीएफ डाउनलोड करून वाचू लागली. त्यातच प्रतिलिपी ॲप ची ओळख झाली.अन् माझ्या जीवनाची कायापालटच झाली. वाचन करता करता कधी माझ्यातला लेखक जागा झाला मला माझं कळलं नाही. कुठलीही माहिती नसताना लिहायला घेतलं काय होईल ते होईल पण मनातून इच्छा झाली की मी लिहू शकते आणि मोबाईलवर बोटे फिरवायला चालू केली हळूहळू तोडकी मोडके शब्द माझ्या जीवनाचा एक वेगळाच महत्वाचा भाग होऊन गेली. शब्दांशिवाय जगू शकत नाही असे वाटू लागले. माझ्या शब्दांची जादू वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागले.तसे अजूनच उत्साह वाढला आणि जीवन जगण्यासाठी एक वेगळीच दिशा मिळाली गृहिणी म्हणून तर आयुष्याने ओळख दिलीच होती. पण आज ॲप द्वारे लेखिका म्हणून ओळख निर्माण झाली.

अस माझ्या जिवनाचा रोलर कोस्टर सारखा प्रवास! सुखाचे क्षण आपल्याला हसणं शिकवून जाते …पण दुःखाचे सोबती जीवनाचा सार समजून जातो. घाटाचा रस्ता खूप अवघड असतो…पण घाट पार करून जेव्हा आपण वरच्या टोकाला येतो तिथून खालचा नजारा डोळ्यांना मनमोहक वाटू लागतो. तसचं आयुष्याचं असतं.दुःखाचे डोंगर पार केल्यावर सुखाचे सोनेरी किरण आपल्या जीवनात येतेच!