आयुष्याचा जोडीदार भाग ८
तिच्याबरोबर तो अगदी मोकळे वागत असे. जसा आहे तसा! पण तो इंटर्नशिप म्हणून जॉईन झाला, यावर मात्र राधा त्याला बरेचदा ऐकवत असे. तरी त्याने काही ऐकले नव्हते. यादरम्यान मनू सुद्धा त्याला एक दोन वेळा भेटली होती. त्याची आणि तिची मस्त गट्टी जमली होती. राधाचे आयुष्य किरणच्या असण्याने थोडे सोप्पे झाले होते.
रामची उणीव होतीच पण परिस्थितीशी लढण्याची उमेद वाढवायला एक छान मित्र म्हणून किरण तिला मदत करत होता. पण मनूला डावलून राधाने कधीच त्यांच्या मैत्रीला महत्व दिले नव्हते. त्यांच्यातले हे मैत्रीचे नाते किरणच्या मॉम डॅडना देखील माहीत होते आणि त्यांना राधासाठी खूप बरे वाटत होते. किरण आणि राधा मनापासून एकत्र यावे यासाठी ते खूप प्रयत्न करत होते.
राधाचे आनंदी असणे राधाच्या आईच्या नजरेतूनही सुटले नव्हते. पण तिला समाजभान त्रास देत असल्याने ती राधाला सतत सावध राहायला सांगत असे. ती दोघेही आपल्या मर्यादेत राहूनच मैत्री टिकवत होते त्यामुळे राधा खुश होती. सगळे ठीक चालले होते.
दरम्यान किरणची राधाबद्दलची ओढ वाढत चालली होती पण राधाला त्याने तसे कधीच जाणवू दिले नाही. मनातल्या या भावनेपेक्षा त्याला तिची मैत्री जास्त महत्वाची होती. तिच्या आनंदात तो खुश होता. त्यांचे काहीवेळा छोट्या मोठ्या गोष्टींवरून वाद होत असत. स्वभावानुसार कधी कधी ओघात, किरण राधाची खूप चेष्टा मस्करी करत असे. ती ही त्या गोष्टीला शक्य तितकी काळजी घेत असे.
दरवेळी त्याला ते शक्य होत नसे आणि मग त्यांचे खटके उडत असत. राधाचे सततचे शिकवणे आणि काटेकोरपणे वागणे. कधी कधी त्याला नको वाटत असे आणि त्याचे सतत गोष्टी लाईटली घेणे राधाला आवडत नसे. तरी असा वाद फार काळ टिकत नसे.
पण त्या दिवशीची गोष्ट वेगळी होती. जवळपास वर्षभर इंटर्नशिप म्हणून काम करून झाल्यावर मि. शशांक परदेशी सरांनी किरणला सीईओ बनवले व सगळे अधिकार त्याच्या हातात दिले. फक्त फायनल डिसिजन घेण्याआधी स्वतः सरांना आणि राधाला विचारणे गरजेचे होते. त्याशिवाय कोणतीही डील करायची नाही असे सांगितले, पण त्या दिवशी सर आणि राधा नसताना किरणने कंपनीसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला होता.
डॅड बाहेरगावी असल्याने एक दोन वेळा त्याने राधाशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तिच्याशी बोलणे होऊ शकले नाही. ती मनुसाठी सुट्टीवर होती म्हणून त्याने तिला त्रास न द्यायचे ठरवले आणि त्याने एकट्यानेच ती गोष्ट पुढे न्यायची ठरवली.
रात्री सगळे आटपून जेव्हा राधाने तिचा इमेल चेक केला तेव्हा तिला धक्का बसला. तिने तसाच किरणला फोन लावला पण त्याचा फोन बिझी आला. स्वभावाप्रमाणे राधा डिस्टर्ब झाली. सतत त्याचा फोन बिझी लागत असल्याने ती अजूनच वैतागली. शेवटी एकदाचा त्याचा फोन लागला.
"हॅलो, किरण.. हे काय केलेस तू? आम्हांला कोणाला न सांगता ही डील कशी काय फायनल केली तू?" राधाने चिडत विचारलं
“हाय! अगं मी तुलाच कॉल करत होतो. माझे ऐकून तर घे आधी." किरण म्हणाला
"मी कधीची फोन करतेय तुला. कॉल वेटिंग कळत की, नाही तुला? आणि असा कसा मेल पाठवून दिलास तू? सरांशी तरी बोलला आहेस का ह्यावर? किमान मला सांगायचे तरी." वैतागून राधा म्हणाली.
किरण तिच्या अशा टोनमुळे खूप चिडला होता. त्याचा सगळा मूडच गेला
"माझे ऐकणार आहेस का तू? की तुला स्वतःलाच बोलायचे आहे?" किरणने शक्य तितक्या शांत स्वरात विचारलं.
"काय ऐकू आता मी? मेल झाला तुझा करून. आपले ठरले होते की, हे अँप्रुव्हल देण्याआधी आमच्याशी बोलणे करायचे आहे, विसरलास का? कमाल करतोस तू खरच." राधा रागाने म्हणाली.
“हे बघ, मी तुला दहा मिनिटात तुमच्या घराजवळच्या मंदिरामध्ये भेटतो मग आपण सविस्तर बोलू तू उगीच माझ्यावर चिडते आहेस.” किरण शांतपणे म्हणाला.
"ओके." राधाने चिडूनच फोन कट केला आणि लगबगीने आपला अवतार नीट करून मंदिरात जाण्यासाठी निघाली.
दहाच मिनिटात किरण आला. मंदिरासमोर एक छोटस ग्राउंड होते. तिकडे राधा त्याची वाट बघत होती. तिने साधा लिंबू कलरचा साधा कुर्ता आणि जीन्स घाली होती. केसांची बट सावरत ती त्रासिक चेहऱ्याने किरणची वाट बघत होती. तिचा तो चेहरा बघूनच त्याला हसू आले. त्याच मूडमध्ये तो तिच्याजवळ गेला.
"हा बोल आता, इतकी का तापली आहेस माझ्यावर?" त्याने मूड लाईट करण्याचा प्रयत्न केला.
"मी तुला नेहमी सांगते ना की, तू ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नकोस. आज तू ज्या गोष्टीचे अँप्रुव्हल दिले आहेस. ते आपल्याला महागात पडू शकते हे माहितेय ना तुला? सर आले की, त्यांच्याशी बोलून करायचे हे ठरले होते ना आपले. मग इतकी कसली घाई होती तुला? इतका कसा बालिश वागतोस तू? राधा मात्र त्याच्यावर बरसली.
"मी तुला नेहमी सांगते ना की, तू ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नकोस. आज तू ज्या गोष्टीचे अँप्रुव्हल दिले आहेस. ते आपल्याला महागात पडू शकते हे माहितेय ना तुला? सर आले की, त्यांच्याशी बोलून करायचे हे ठरले होते ना आपले. मग इतकी कसली घाई होती तुला? इतका कसा बालिश वागतोस तू? राधा मात्र त्याच्यावर बरसली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा