आयुष्याचा जोडीदार भाग ११ अंतिम
“मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय किरण". त्याच्या मिठीतून बाहेर येतं राधा म्हणाली. तू मला सोडून कुठेही जाणार नाही आहेस. मी एकदा भोगले आहे आणि ती जखम भरायला तू मदत केली आहेस, आता माझ्यात पुन्हा नव्याने लढण्याची ताकद नाही रे किरण. मला तुझा आधार हवा आहे." राधा आगतिकपणे बोलत होती आणि किरण शांतपणे तिच सगळ ऐकत होता.
खंबीरपणाचा हा खोटा मुखवटा घालून मी आता खूप कंटाळले आहे. मला मनूला एक परिवार द्यायचा आहे. तिला वडिलांचे प्रेम द्यायचे आहे, तू प्लिज आमच्या आयुष्यातून लांब निघून जाऊ नको. मी नाही जगू शकणार, मरून जाईन तू नसल्यावर. राधा पुढचं बोलणार तेवढ्यात, त्याने तिच्या तोंडावर झटकन हात ठेवला आणि तिला जवळ ओढून आपल्या मिठीत घेतले आणि तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवत म्हणाला, "वेडी आहेस का तू?" मी कुठे जाणार नाही आहे तुला आणि मनूला सोडून, इथेच असणार आहे तुमच्याजवळ, कायमचा!!" असे म्हणून त्याने तिच्या गालवर आपले ओठ टेकवले, रडता रडता ती लाजली.
"अजून एक गोष्ट सांगायची आहे तुला." किरणने असं म्हणताच राधा त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. तसा तो तिच्या चेहऱ्याजवळ झुकला आणि हळूच तिच्या कानात "आय लव यू" म्हंटला. त्यासरशी तिने आपला चेहरा हातात लपवला आणि ती त्याला बिलगली. त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरले.
त्याच्या मिठीतल्या स्पर्शात तिला विसावा मिळाला. त्या दोघींच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली होती. आयुष्याचे निर्णय सोप्पे करण्यासाठी राम सारखा तिला जोडीदार मिळाला होता. तिचा आणि मनूचा परिवार रामच्या असण्याने पूर्ण झाला होता.
शलाका मॅम आणि राधाच्या आईच्या नजरेतून किरण आणि राधाचं प्रेम सुटले नव्हते. त्यांच्यातील बदल सगळ्यांना जाणवत होता. घरीसुद्धा सगळ्यांना हे नाते मान्य होते. फक्त किरण आणि राधा एकमेकांच्या भावना कधी व्यक्त करतील ह्याची सगळे वाट पाहत होते.
राधाच्या आईला प्रश्न पडला होता परदेशी कुटूंब माझ्या मुलीला आणि नातीला स्वीकारतील की नाही, पण शलाका मॅमनी त्यांचे टेंशन हलके केले. त्या राधाच्या आईला भेटायला आल्या आणि म्हणाल्या “ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्हांला हे नाते मान्य आहे.” एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजून घ्यायचे असते. राम हा राधाचा भूतकाळ होता आणि किरण वर्तमानकाळ आहे. त्यामुळे तुम्ही समाज काय म्हणेल हा विचार करू नका, समाज सगळ्यांना नावे ठेवतो. चांगले वागले तरीही आणि वाईट वागले तरीही. आपल्याला आपल्या राधाचं सुख महत्त्वाचे. राधाला सुद्धा आनंदी राहण्याचा अधिकार आहे ना ताई?" हे ऐकून राधाच्या आईच्या डोळ्यात पाणी आले.
"तुमच्या सारखी सासू जर जगातील प्रत्येक मुलीला मिळाली, तर सगळ्या मुली खूप भाग्यशाली असतील".
खरचं माझी राधा खूप भाग्यशाली आहे की, तिला तुमच्यासारखी सासू मिळाली. आता मला राधाचे आणि मनूचे कसलेच टेंशन राहणार नाही. तुमच्या सोबत बोलल्याने सगळे प्रॉब्लेम सुटले." शलाका मॅमचा हात हातात घेऊन राधाच्या आई बोलल्या.
खरचं माझी राधा खूप भाग्यशाली आहे की, तिला तुमच्यासारखी सासू मिळाली. आता मला राधाचे आणि मनूचे कसलेच टेंशन राहणार नाही. तुमच्या सोबत बोलल्याने सगळे प्रॉब्लेम सुटले." शलाका मॅमचा हात हातात घेऊन राधाच्या आई बोलल्या.
"ताई, राधा आता माझी मुलगी आहे सून नाही". ती मला तुमच्यासारखे मानते. मी आजारी असताना तिने माझी खूप काळजी घेतली. एका मुलीचे कर्तव्य पार पाडले. एक मुलगी स्वतःच्या आईची जेवढी काळजी घेईल ना तशी काळजी तिने घेतली रादर घेते आणि ती आमच्या घरात आली तर आम्हांला आनंदच आहे, आणि सगळ्यात महत्वाचे किरणला ती खूप आवडते. आमच्यासाठी किरणचे सुख महत्त्वाचे! असे बोलून दोघींच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, दोघीही एकमेकींच्या गळ्यात पडल्या.
माणूस एकटा राहू शकतो यात शंका नाही पण जगणे प्रगल्भ करण्यासाठी आणि आयुष्य सोप्पे करण्यासाठी हवा असतो तो जोडीदार. असा जोडीदार ज्याच्या बरोबरीने तुम्ही सगळ्या कठीण गोष्टी सोप्प्या करून जगू शकता. असा जोडीदार जो तुम्हाला सुखात आणि दुःखात साथ तर देतोच पण वेळ पडली तर तुमचे कान पण पिळतो. असा जोडीदार ज्याच्याशी काय बोलावे, कसे बोलावे, किती बोलावे याचा विचार करावा लागत नाही. राधा आणि किरण असेच एकमेकांच्या आयुष्याचे जोडीदार बनले होते. एकमेकांना समजून घेत ते कधी एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांनाच कळले नाही.
राधाच्या आई वडीलांनी आणि मि. शंशाक परदेशी आणि शलाका मॅमनी ह्या दोघांचे नाते स्वीकारले. परदेशी कुटूंब आधुनिक विचारांचे असल्याने राधाचं आणि मनूचा त्यांनी आनंदाने स्वीकार केला. मनूला पण किरण म्हणून वडील पसंद होते. दोनदा तीनदा भेटल्यावर किरणमध्ये तिला खूप आपलेपणा वाटत होता. दोघांच्याही घरून लग्नाला विरोध नव्हता. लवकरच त्या दोघांचे लग्न लावून दिले. आयुष्यभरासाठी ते एकमेकांचे जोडीदार बनले. जणू काही मेड फॉर इच ऑदर होते.
माझ्या हृदयाची धडधड आहेस तू
माझ्या जीवनाचा श्वास आहेस तू
माझ्या जीवनाचा श्वास आहेस तू
माझ्या आयुष्याची नवीन दिशा आहेस तू
माझ्या आयुष्याचा जोडीदार आहेस तू
माझ्या आयुष्याचा जोडीदार आहेस तू
माझ्या कवितेतील शब्द आहेस तू
आणि या प्रेम वेड्याची प्रेम वेडी आहेस तू
आणि या प्रेम वेड्याची प्रेम वेडी आहेस तू
पुन्हा नको विचारू माझी कोण आहेस तू
माझ्या आयुष्याचा जोडीदार आहेस तू
माझ्या आयुष्याचा जोडीदार आहेस तू
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा