मागील भागात आपण पाहिलं कि आनिका स्नेहा ने टॉप केलं म्हणून खीर बनवते पण त्यात प्रिया मीठ टाकते आणि त्याचा आळ आनिका वर येतो..... त्यामुळे वैशाली खूप भडकते ....आता पाहूया पुढे.....,
अनिका पुढे झाली आणि तिने सगळ्यांना जेवण वाढलं.... जेवण सुरेख झालं होत... पण आजी सोडून कुणीच काही बोललं नाही.... नंतर तिने सगळ्यांना खीर दिली......तस माधुरी स्नेहा ला म्हणाली....
"स्नेहा खा बाळा....तुझ्या आवडीची आहे.... "
स्नेहा ने पहिला घास तोंडात टाकला आणि ती थू थू करून तिने तो थुंकला ...... तिचं पूर्ण तोंड खारट झालं होत....तिचं हे वागणे सगळयांना अनपेक्षित होत...
"अग किती खारट ? चुकून साखरे ऐवजी मीठ टाकलस का? "
स्नेहा असं म्हणाली तस वैशाली ने एक घास तोंडात टाकला खरंच खीर खूपच खारट झालेली ती खीर पाहून तिने परत अनिका ला धारेवर धरली.
"अग मूर्ख मुली ....मुद्दाम केलास ना तू असं "
असं म्हणून तिला मारायला उठली...
तिने तिच्या कानाखाली मारून ढकलून दिल आणि पुन्हा तीचे गाल चिमटीत पकडून म्हणाली ...,
"स्नेहा चा आजचा चांगला दिवस खराब केला ह्या आवदशीने .... दुसऱ्याच चांगलं झालेलं का पाहवत नाही तुला ....आई बाप गेले निघून न हि पडले आपल्या गळ्यात...."
"अग वैशाली काय करतेस तू हे? झालं असेल चुकून आधीच पूर्ण जेवण किती चविष्ट केलय हे नाही पाहिलस का तू ....."
अहिल्या देवी कळकळीने म्हणाली.
"नाही आजी, नाही मॅडम मी चांगलीच बनवली होती..,
स्नेहा मी नाही काही केलं मी तर चांगलीच बनवली होती ....माधुरी काकी तुम्ही सांगा ना तुम्हाला तर टेस्ट करायला पण दिली होती ..."
अनिका माधुरी आणि वैशाली समोर हात जोडत म्हणाली ....
तस विचारात पडलेली माधुरी म्हणाली ...
" हा ताई मी टेस्ट केली होती तेव्हा तर अप्रतिम झाली होती ...मग आता अचानक कशी काय खारट झाली "
वैशाली च सहज च लक्ष प्रिया कडे गेलं ती गालातच हसत होती तिला समजलं प्रियानेच काहीतरी केलं आहे पण तस न दाखवता ती म्हणाली ....,
" अग तू टेस्ट करून गेलीस आणि मग हिनेच त्यात मीठ टाकलं आजचा दिवस स्नेहा चा होता ना तो तिला पाहवला नसेल "
वैशाली दात ओठ खात म्हणाली आणि परत तिच्या वर धावून गेली ....
तस पटकन विनीत पुढे झाला आणि म्हणाला....,
" मोठी आई अग जाऊदे ....तिने नसेल केलेल काही ...एवढं जेवण तर एवढं छान झालं होत आणि मी ice क्रीम आणतो ते हि दी आवडीचं.... चालेल ना दी..... "
त्यावर स्नेहा ने मान हलवली....
"मग तर झालं ...."
"वैशाली सोड तिला ..जा रे विनीत ice क्रीम आण ...आणि हा तमाशा बंद करा "
राजेश म्हणाले आणि ते तिथून निघून गेले ...तस सगळेच तिथून पांगले आणि ज्याच्या त्याच्या रूम मध्ये गेले......
सगळे निघून गेल्यावर अहिल्या बाई तिच्या जवळ गेल्या तस ती त्याना बिलगून रडू लागली त्या सुद्धा तिच्या केसावरुन हात फिरवत तिला शांत करत होती ...
" रडू नको पोरी ...वैशाली ला फक्त कारण लागत तुझ्या शी असं वागायला .....विनीत बाळा हिला तिच्या रूम मध्ये घेऊन जा ..."
"हो आजी.... तू काळजी नको करुस......."
असं म्हणून तो पुढे झाला.....
विनीत ने तिला पकडलं ..ती थरथरत होती , खूप घाबरलेली आणि खूप रडत होती ...तिचा चेहरा पूर्ण लाल लाल झाला होता ..तिला पकडून तो तिच्या रूम मध्ये घेऊन गेला आणि तिला आराम करायला सांगितलं......
आणि तिकडे त्याने जाऊन ice क्रीम आणलं........ते त्याने सगळ्यांना नेऊन दिल.......आणि तो आनिका साठी सुद्धा घेऊन गेला, जाताना जेवणाची प्लेट सुद्धा आठवणीने घेऊन गेला कारण त्याला ठाऊक होत ती जेवली नसणार '
अनु ..चल जेवून घे ...."
त्याने light लावून त्याला तिला जेवायला उठवलं ..,
" नको विनीत मला भूक नाही आहे .."
ती त्याला म्हणाली.... तिचे डोळे सुजले होते.....
" मला माहीत आहे तू दुखावली गेली आहेस ..मोठी आई असं का वागते कळत नाही पण तू अन्नावर का राग काढतेस ...माझ्या साठी नाही तर आजी साठी जेव ...नाहीतर ती इथे येईल ...मला तिने सांगितल आहे..... तू ऐकलं नाहीस तर मला सांग आणि तुला चांगलंच माहित आहे ती किती हट्टी आहे........ आणि मला नाही वाटत ह्या वयात तिला त्रास द्यावा.......
विनीत नाटकी पणे म्हणाला.....
" तू ना खूप शहाणा आहेस बरोबर माझी दुखती नस पकतोस "
ती हसत म्हणाली.....
"हो ना मग जेव बर ...तू जो पर्यंत जेवणार नाहीस मी जाणार नाही .इथून ..."
तिने थोडंफार जेवून घेतलं आणि त्यानंतर त्या दोघांनी सोबत ice क्रीट खाल्ला ..खाऊन झाल्यावर तो झोपायला निघून गेला ....इकडे तिने देखील अंग टाकलं..... तेवढ्यात तिचा मोबाईल vibrate झाला..... पाहते तर वेदांत चा call होता......,
" hello..... काय करतेस....." वेदांत म्हणाला
"काही नाही बोल ना......." अनिका म्हणाली
परत रडलीस? कुणी काही बोललं का? " वेदांत म्हणाला
"नाही रे झोपली होती म्हणून कदाचित तुला वाटलं असेल...". अनिका म्हणाली
खरं बोलतेस? वेदांत म्हणाला
ह्म्म्म.......... अनिका म्हणाली
बर ऐक उद्या मी interview साठी जाणार आहे..
वेदांत म्हणाला
छानच.... आपण लग्न कधी करायचं वेदांत..... अनिका ने त्याला विचारलं......
"लवकरच... बर तू झोप आता बोलूया उद्या...."
असं म्हणून त्याने call कट केला आणि इकडे अनिका ने देखील अंग टाकलं.....ती त्याच्याच विचारात गुंग झाली......तिच्या डोक्यात सध्या खूपच विचार होते...
तिच्या डोळ्या समोर त्यांची पाहिली भेट उभी राहिली....
साक्षी आणि अनिका तिच्या रूम मध्ये त्यांना दिलेल्या assignment पूर्ण करत बसल्या होत्या...., तेवढ्यात तिथे एक मुलगा येतो आणि साक्षी ला आवाज देऊन
"…हेय साक्षी काय करते ....."
त्याच्या कडे पाहून ती म्हणते.....
"अरे वेदांत ये ना आम्ही assignment पूर्ण करतोय .."
वेदांत थोडा सावळा असला तरी दिसायला छान होता... Curly हेअर्स आणि चेहऱ्यावर तेज.... जिम मध्ये जाऊन कमावलेली बॉडी.... एकंदरीत छान होता तो.....
त्याला तिथे आलेलं पाहून अनिका ला मात्र थोडं अवघडलं..... तस तिने आपला ड्रेस नीट करून बुक मध्ये आपलं डोकं खूपसलं... तो येऊन बेड वर बसला.तिच्या कडे पाहून साक्षी ला त्याने विचारलं ...,
..मैत्रीण का ?..
आपल्या डोक्याला हात लावून साक्षी दोघांकडे पाहून म्हणाली.....,
"अरे हा ओळख करून द्यायची राहिली ही माझी बेस्ट फ्रेंड् आनिका आणि अनिका हा वेदांत माझ्या आत्तू चा मुलगा ..तो जॉब search करतोय आजपासून इथेच राहणार....."
त्यावर अनिका फक्त हसली....तर वेदांत म्हणाला.....,
" अनिका छान नाव आहे ........guys, मी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही तुम्ही स्टडी करा पण थोड्या वेळात मी नाश्ता घेऊन येतो तो मात्र खायला नक्की या ..नाहीतर मीच येतो इथे घेऊन...
असं म्हणून हसून तो निघून गेला पण जाताना एक नजर आनिका वर टाकून गेला....
क्रमश
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा