Login

*जीवनसाथी * भाग -8

अंश अनिका
मागील भागात आपण पाहिलं कि, अनिका खूप पाऊस पडत असताना सुद्धा घरी जायचा हट्ट धरते. म्हणून तिच्या काळजीने वेदांत तिला सोडायला जातो.....पण मध्येच तिचा पाय मुरगळतो.... आता पाहूया पुढे......,



तिला त्याच्या बद्दल ची आपुलकी अजूनच वाढली.........ती मध्ये त्याला बघत होती..... तर तो अलगदपणे तिला जपत पुढचा रस्ता काढत होता......


अहिल्यादेवी सदन आलं तस तिने त्याला थांबवलं आणि ती म्हणाली.......,


"वेदांत, थांब मीजाइन...इथून आता .. थँक्स तू एवढ्या पावसात आलास......"


"अग पण तुला जमेल का चालत जायला....? "

त्याने काळजीने विचारलं....


"हो मी तेवढं मॅनेज करेन आणि तू गैरसमज नको करुस मी आत सुद्धा बोलवत नाही म्हणून मॅडम ला समजलं तर काय माहित त्या काय करतील...... पण तू पण नीट जा प्लीज......."


ठीक आहे ....जपून जा....आणि प्लीज काळजी घे आणि  डॉक्टर कडे जा उद्या आठवणीत.....

त्याला ओके म्हणून ती कसातरी पाय उचलून चालू लागली.....

दोघांच्या चेहऱ्यावर एकमेकांबद्दल असणारी काळजी चांगलीच दिसत होती.

ती सुद्धा लंगडत लंगडत आत गेली ..ती जाई पर्यंत तो थांबला होता शेवटी तिने हात करून त्याला जायला सांगितलं ..तस तो तिथून गेला ...ती थेट तिच्या रूम मध्ये गेली आणि फ्रेश झाली ...पाय थोडा सुजला होता ...तिने कस तरी जेवण बनवलं आणि एक पैनकिलर घेऊन ती झोपली.... पण झोपण्या आधी एकदा साक्षी ला कॉल करून तिने वेदांत व्यवस्थित पोहचला कि नाही ह्याची खात्री करून घेतली....


दुसऱ्या दिवशी पाय पूर्ण सुजला होता ...तिला उठता अजिबात येत नव्हतं...... तस तिने साक्षी ला कॉल केला ...कॉल उचल्याबरोबर ती म्हणाली....,

" हे नोबिता,  उठली का ग? आणि पाय कसा आहे......वेदांत म्हणाला मला तुझा पाय मुरगलला ते...... नशीब तो होता.......आणि ऐक ना...... सॉरी हा मला अर्जंटली मम्मी सोबत मामा कडे जावं लागतंय..... आजी ची तब्येत जास्त झाले...... पण वेदांत येतोय तिकडे..... तू तयार राहा तो तुला डॉक्टर कडे घेऊन जाईल....."


"अग त्याला कश्याला त्रास देतेस..... मी जाईन..आधीच काल माझ्या मुळे त्याला त्रास झालाच..... आज परत कश्याला?"

अनिका ला त्याला सतत त्रास द्यायला कसतरी वाटत होत......


"अग तोच म्हणाला... मी त्याचा नंबर तुला पाठवते, त्याला कॉल करून सांग.... कधी निघणार ते.... ओके बाय tc....."

"बाय...... Mu......"


असं म्हणून तिने कॉल कट केला..आणि आवरायला गेली.....तिच्या नशिबाने सकाळीच वैशाली बाहेर गेली होती... त्यामुळे काहीही न करता ती बाहेर पडली.... निघण्याआधी तिने वेदांत ला कॉल केला... तो आधीच तिची वाट पाहत होता...


हळू हळू पाऊले टाकत ती कशी तरी बाहेर आली ....नेमका विनीत सुद्धा त्या वेळेस बाहेर गेला होता ..त्यामुळे तिला वेदांत शिवाय पर्याय हि नव्हता .....तिला बघून तो तिच्या जवळ गेला आणि डायरेक्ट तिच्या पाय जवळ बसला ...ती थोडी अवघडली ..पण त्याने फक्त किती सूज अली आहे ह्याच निरीक्षण केलं ....आणि काळजीने तो म्हणाला  ...,

" पाय बऱ्यापैकी सुजलाय   ..खूप त्रास होतोय का .."

" हा थोडाफार ...."

ती म्हणाली पण खर तर तिला खूप त्रास होत होता ..आणि तो त्रास नसता झाला तर ती डॉक्टर कडे गेलीच नसती ...गोळी घेऊन सहन केलं असत नेहमी प्रमाणे.


"ठीक आहे.... चल.....मी opoinment घेऊनच इकडे आलोय ...सो आपण निघूया .."


त्यावर तिने मान हलवली ....


तस त्याने तिचा हात पकडला आणि हळू हळू चालवत तिला आपल्या गाडी जवळ नेलं ...त्यानंतर तिला थांबवून त्याने तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला आणि आणि ती बसल्यावर अलगद तिचा पाय आत मध्ये ठेवला ...आजपर्यँत तिला एवढी special ट्रीटमेंट कुणी हि दिली नव्हती ..त्यामुळे ती भारावून गेली ..आणि त्याच्या कडे थोडीफार का होईना पण आकर्षित झाली ..तो तिची घेत असलेली काळजी पाहून तो तिच्या मनाशी जोडला जात होता ...त्यानंतर लगेच ते दोघे हॉस्पिटल मध्ये गेले . तेव्हा हॉस्पिटल त्याची धावपळ ती पाहत होती ..तो जरा जास्तच तिची काळजी घेत होता ...चेकअप झाल्यानंतर डॉक्टरांनी तिला काही सूचना दिल्या आणि काही मेडिसिन  लिहून दिले जे मेडिकल मधून वेदांत ने आणले आणि तिने पैशांबद्दल विचारलं असता तो तिला ओरडला ...'

"तुला पैसे जास्त झालेत का ? काय प्रॉब्लेम आहे मी खर्च केला तर?"


"असं नाही वेदांत......पण मला असं फुकट कुणा कडून घेणे नाही पटत "


आनिका त्याला आपली बाजू पटवून देत म्हणाली ...ती किती स्वाभिमानी आहे ते म्हणून तो म्हणाला.....

" ठीक आहे लवकर बरी हो आणि मला पार्टी दे मग तर झालं ..."

तस हसून तिने होकार दिला.

मग त्याने तिला घरी सोडलं ..ह्यानंतर त्या दोघांचं फोन वर बोलण व्हायला लागलं आणि जोपर्यंत साक्षी परत आली नाही तोपर्यंत वेदांत तिला कॉलेज मध्ये सोडायला आणि घ्यायला देखील जात होता ...हळू हळू तिचा पाय रिकव्हर होत होता आणि वेदांत सुद्धा तिची काळजी घेत होता.....


.एक दिवशी असच घरी परत येत असताना वेदांत ने मधेच गाडी थांबवली ....
आणि तिला म्हणाला......

"आनिका मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे ..म्हणजे तुला अंदाज आला असेलच.....तरी बोलू ना...?"

तिला कल्पना होती होतीच थोडीफार..... पण एवढ्या लवकर तो विचारेल हे वाटल नव्हतं तिला...... त्यामुळे ती म्हणाली ....,

" बापरे..! परमिशन काय घेतोस? बोल ना... "



त्याने गुलाबाच्या फुलांचा मस्त गुछ आणला होता आणि सोबत तिला आवडणारी सिल्क ची कॅडबरी त्याने गाडी मध्येच मागच्या सीट मागे ठेवली होती, तिला तो बुके आणि कॅडबरी दिली आणि म्हणाला ....,


" आनिका, कस सांगू तुला हे मला समजत नाही पण पहिल्यांदा जेव्हा पाहिलं तुला तेव्हाच तू मला आवडलीस ..अगदी फिल्मी dialogue मला मारता येत नाही ...पण तुला सुखात ठेवेन ज्याची तू हकदार आहेस....

बघताच क्षणी तुझ्या डोळ्यात एकच क्षण मी हरवलो,
गोड तुझे ते हसणे पाहून बहर आला माझ्या मनात
मनमोहक तुझे हे रूप सखे घर करते माझ्या हृदयात
एकदा तुला पाहतच राहतो येशील का तू माझ्या जीवनात?"


आजपर्यँत तिच्या आयुष्यात आलेला वेदांत हा पहिलाच मुलगा होता ज्याने तिला special ट्रीटमेंट दिली होती त्यामुळे स्वभाविक होत तिला तो आवडणे आणि त्याचा helping नेचर ...आणि तस हि त्याच्यात न  आवडण्यासारखं काहीच नव्हतं ....त्याच बोलणे ऐकून ती खूपच खुश झाली.... पण चेहऱ्यावरचा आनंद लपवत ती म्हणाली....,


"पण वेदांत ..तुला माझ्याबद्दल काहीच माहित नाही आहे  मी कुणाकडे राहते?काय काम करते "


मला सगळं माहित आहे म्हणजे साक्षी ने कल्पना दिली होती आणि तस हि मला तुझ्या पास्ट मध्ये इंटरेस्ट नाही तर तुझ्यात आहे ...तू आहेस ना तयार ...? "

वेदांत तिला म्हणाला तशी ती लाजली आणि मानेनेच होकार भरला.....

आज तिच्या आयुष्यातला खूप छान दिवस होता.. वेदांत सारखा खूप चांगला मुलगा तिच्या बंजार आयुष्यात आला होता.....

तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला...,


" thanks माझ्यावर trust केल्याबद्दल आणि माझ्या आयुष्यात आल्या बद्दल ❤️❤️❤️❤️"


तशी ती लाजली... तिचे गाल गुलाबी झाले होते तस हसत तो परत म्हणाला.....,

"ठीक आहे लाजाळू च झाड......कॅडबरी खाऊन घे.... आपण निघूया..."

"वेदांत..... "


ती लटक्या रागात म्हणाली....


तस तो हसला......

"बर ऐक मला एक प्रॉमिस करशील??? "


काय वचन मागत असेल वेदांत?

आणि त्याच तिच्या आयुष्यात येणे शुभ असेल कि अशुभ?


क्रमश

🎭 Series Post

View all