मागील भागात आपण पाहिलं की, साक्षी ने अनिका ला वेदांत च्या वाढदिवसाची आठवण करून दिली... तस तिला आठवलं तिच्याकडे तर ड्रेस च नाही आहे...., आता पाहूया पुढे........,
"अग, मी इकडे येत असताना तुझी शोधा शोध पाहिली आणि बडबड सुद्धा ऐकली......काय शोधत होतीस......."
त्याने तिला विचारलं.....
"अरे काही नाही असच....."
त्याला सांगणे तिला योग्य वाटल नाही म्हणून ती तस म्हणाली......
'खरं बोलतेस......?"
हम्म्म्म.....
खोटं तुला बोलता येत नाही माहित आहे ना......? मग कश्याला बोलतेस....... आणि
थोडं थांबून आपल्या हातातला ड्रेस तिला देत तो म्हणाला.....,
"हा घे ड्रेस......"
'अरे पण......तुला कस समजलं??"
तिने परत त्याला विचारलंच
"अग..., म्हंटल ना मगाशी मी बडबड ऐकली तुझी म्हणून....."
तस तिने डोक्याला हात लावला आणि म्हणाली...,
"अरे पण खरंच गरज नव्हती..... होते माझ्या कडे आहेत त्यापैकी घातला असता ना......"
"अग असं काय करतेस? भाऊ आहे ना मी तुझा
..... भावाकडून घ्यायला काय प्रॉब्लेम.........."
..... भावाकडून घ्यायला काय प्रॉब्लेम.........."
"अरे पण लगेच कुठून आणलास...."
तो ड्रेस open करत ती म्हणाली.....
"आ......सॉरी हा....म्हणजे मी जादूगार तर नाही आहे... जादू करून नवीन ड्रेस आणायला.........."
तो आपली दोन बोटे कपाळावर घासत म्हणाला
मग.....?
तिने डोळे मोठे करत म्हंटल....,
"म्हणजे हा ड्रेस न्यू नाही आहे..........एवढ्या रात्री नवीन कुठून आणणार, आपल्या स्नेहा चा आहे ...होप सो चालेल तुला......."
विनीत म्हणाला....
"अरे पण ह्याची खरच गरज नव्हती, स्नेहा काय म्हणेल......."
अनिका जरा टेन्शन मध्ये म्हणाली...
"अग तिचा कपाट भरलाय..... आणि तिनेच दिला....... आणि गरज कशी नव्हती होती गरज आणि उद्या तिकडून आलीस कि आपण शॉपिंग ला जातोय तुझ्यासाठी नवीन ड्रेस घेऊया.... "
तो तिला म्हणाला.....
"अरे पण नको मला काही..... खरंच "
"मी तुला विचारत नाही आहे सांगतोय झोप आता ....gn "
असं म्हणून तो पळाला देखील
तिच्या चेहऱ्यावर हसू आलं हा मुलगा पण ना नाही ऐकणार ...खरंच सख्या भावासारखा माझ्या पाठीशी उभा राहतो.......आणि त्याच सगळ्या विचारात च ती झोपेच्या अधीन झाली...
****************-*****************
सकाळी लवकर उठून अनिका ने आपल आवरलं, सगळ्यांसाठी नाश्ता बनवला आणि आपल्या रूम मध्ये जाऊन तयार झाली.....

त्या सिम्पल पंजाबी ड्रेस मध्ये सुद्धा ती खुप सुंदर आणि गोड दिसत होती ..तिला थोडा लूज झाला होता ड्रेस पण ते एवढं काही वाटत नव्हतं .मेकअप तर तस हि तिला माहित नव्हताच आणि गरज हि नव्हतीच ...देवाने तिला बाकी काही नाही पण सौंदर्य मात्र भरभरून दिल होत.......नशिबाने तिला शोधाशोध करून त्यास ड्रेस वर मॅच होणारे इअररिंग्स मिळाले..... ते घालून तिने केस मोकळे सोडले आणि ती निघाली ..
.......तिच्या अंगावरचा ड्रेस पाहून बाजूची सखू तिच्या सोबत काम करायची तिची कुजबुज तिच्या कानावर पडलीच ....
" स्वतःला कधी तरी एवढी स्वाभिमानी म्हणते...दुसऱ्याच्या वस्तू वापरणार नाही आणि आता बर ...चालत......"
ते ऐकून तिच्या टचकण डोळ्यात पाणी आलं पण नाईलाज होता..... गरिबी माणसाला अपमान गिळायला शिकवते.......ती पुढे गेली तर तिला प्रिया दिसली, तिला पाहून ती म्हणाली........
"ओह्ह ,मॅडम एवढं नटून थटून कुठे चालली आहेस, मला पास्ता बनवून द्या...... खूप भूक लागली आहे..."
"अग प्रिया ऐक ना आजचा दिवस सखू मावशी देतील बनवून......मला थोडी घाई आहे बाकी मी पोहे बनवले आहेत प्लीज अड्जस्ट कर...."
अनिका प्रियाला विनंती करत म्हणाली....
"हे, जास्त शहाणी बणू नकोस ....माझ्या ममा ला आवाज दिला तर तुझं हे नटून जाणे पण इथेच राहील तेव्हा गपचूप जाऊन मला पास्ता बनवून दे आणि मग जा "
तिने अनिका ला धमकीच दिली
ते ऐकून आनिका ला टेन्शन च आलं पण तिला माहित होत वैशाली मॅडम ला समजलं तर त्या मला जाऊन देणारच नाही एकतर कालच मर खाल्ला आहे त्यामुळे ती गप्प पणे मागे फिरली आणि किचन मध्ये जाऊन गपचूप पास्ता बनवला नि तिला नेऊन दिला .....आता ती स्वामींकडे फक्त प्रार्थना करत होती.....
"स्वामी प्लीज आता दुसऱ्या कुणाचं काही काम निघू नये.. "
आणि तिच्या नशिबाने दुसरं कुणी आलं नाही आणि ती बाहेर पडली
.... आणि नेहमीप्रमाणे आपल्या स्वामींना भेटण्यासाठी ती मठामध्ये गेली.......सकाळचं वातावरण किती प्रसन्न असत ना मंदिरामध्ये........तिने आपल्या सुरेख गोड आवाजात तारक मंत्र म्हंटले.....
गुरु ब्रम्हा गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा.
गुरु साक्षात परब्रम्हा, तस्मै श्री गुरवे नमः
निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना ।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना ।
अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।१।।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना ।
अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।१।।
जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला,
परलोकी ही ना भीती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।२।।
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला,
परलोकी ही ना भीती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।२।।
उगाची भितोसी भय हे पळु दे,
वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे ।
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।३।।
वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे ।
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।३।।
खरा होई जागा श्रद्धेसहित,
कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त ।
आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ,
नको डगमगु स्वामी देतील हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।४।।
कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त ।
आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ,
नको डगमगु स्वामी देतील हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।४।।
विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ,
स्वामीच या पंचामृतात।
हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती,
ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।।
स्वामीच या पंचामृतात।
हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती,
ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।।
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।।
श्री दत्तगुरु महाराज की जय ।।
अशक्य ही शक्य करतील स्वामी !
ती एकदम भान हरपून म्हणायची अन हरवून जायची
. ती रोजच म्हणायची आणि ते ऐकताना आजूबाजूचे सगळे भान हरपून जायचे ...... काही जण तर मुद्दाम तिचे तारक मंत्र ऐकायला लवकर दर्शनासाठी यायचे.....
. ती रोजच म्हणायची आणि ते ऐकताना आजूबाजूचे सगळे भान हरपून जायचे ...... काही जण तर मुद्दाम तिचे तारक मंत्र ऐकायला लवकर दर्शनासाठी यायचे.....
तिचं दर्शन घेऊन झाल्यावर ती बाहेर आली तरी साक्षी आपली स्कूटी घेऊन बाहेरच तिची वाट बघत उभी होती.......
" किती वेळ.... कधीपासून वाट बघत होती...... "
"अगं तू पण बाहेर काय करतेस.... यायचं ना आत बाप्पा च दर्शन तरी झालं असत...."
अनिका तिला म्हणाली
सॉरी ना स्वामी देवा आज बाहेरून च पुढे दर्शन घेते..... नेक्स्ट टाइम नक्की येईन....... ह्यावेळेस समजून घ्या "
असं म्हणत साक्षीने बाहेरूनच हात जोडले आणि
अनिका ला मागे बसायला सांगितल.....
हीच काही होणार नाही अश्याच विचारात अनिका ने आपली मान हलवली आणि ती गाडीवर बसली....
त्यानंतर त्या दोघी एका गिफ्ट शॉप मध्ये गेल्या..., तिथे साक्षीने त्याच्यासाठी गिफ्ट आणि अनिका च्या वरच सुद्धा गिफ्ट घेतलं तिला ठाऊक होत कि, अनिका कडे पैसे नसतात.... तिने तिच्याही नकळत घेतलं आणि अनिका च्या पर्स मध्ये टाकल.... कारण तिने घेतलं नसत हे देखील तिला माहित होत.....
त्यानंतर त्या दोघी केक शॉप मध्ये गेल्या.... तिथे मस्त त्याला आवडणारा मिक्स फ्रुट केक घेतला आणि त्यानंतर त्या बाजारात गेल्या.... थोड्या फार भाज्या घेऊन त्या नंतर दोघी तश्याच साक्षी च्या घरी गेल्या ..साक्षीने बाजारातून अजून काही साहित्य आणून ठेवलं होत ते तिने बाहेर काढलं आणि जेवण बनवला त्याच्या आवडीचं ...एक क्षण अनिका ला प्रश्नच पडला होता कि ती एवढं का करते पण ती सगळ्यांसाठी करते म्हणून तिने विषय सोडून दिला आणि तिला मदत करू लागली......

क्रमश :
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा