Login

आयुष्य हे असेच असते..

आयुष्य
आयुष्य हे असेच असते
कधी कोणा ना ठाऊक असते.
कोण जन्मेल अन् कोण मरेल
याचे काही गणित नसते....

आहे तसे जपायचे
अन् आहे तसेच जगायचे
त्याहून काय हे माहित नसते
आयुष्य हे असेच असते...

कोण येईल साथी होऊन
कोण जाईल परके करून
कधी कोणास ना अवगत असते
आयुष्य हे असेच असते...

कधी कोणी ना सोबत असती
आपणच आपले व्हायचे असते
शेवटी तर एकटेच जायचे असते
आयुष्य हे असेच असते

नियतीने दिले दान जरि
नशीबात काय लिहिले असते
भेटले ते आपले मानून
आयुष्य असेच जगायचे असते....

कोण आपले अन् कोण परके
आपणच सर्व ठरवायचे असते
न होता कमजोर कधी
आयुष्य असेच जगायचे असते.......