Login

*जीवनसाथी * भाग -2

तिच्यासाठी काहीही करणे
मागील भागात आपण पाहिलं की, वैशाली अनिका सोबत अजिबातच चांगली वागत नाही.... आता ही तिला फक्त flower pot तुटला म्हणून त्रास देऊन तिने चहा बनवायला सांगितल..... आता पाहूया पुढे.....,



ती लगेच दूध तापत ठेवते आणि एकीकडे चहा टाकते.......,इकडे दूध तापत होत आणि तिकडे अनिका च्या आठवणींना उधाण आले होते......त्या आठवणी तिच्या डोळ्या समोर येताच तिचे डोळे भरून आले.... समोरच दृश्य जरी धूसर झालं असलं तरी तिच्या मनाच्या पटलावर मात्र चांगलंच दिसू लागलं होत.....समोर तिचे आई बाबा आणि छोटी अनिका असते....


" बाबा,  बघा ना आई मला सारखी काम सांगते.... तिला सांगा ना मी तर छोटी आहे ना......"

छोटी आनिका तिच्या वडिलांजवळ आपल्या आई ची तक्रार करत होती....

"स्मिता,  अग किती वेळा तुला सांगितलं माझ्या मुलीला कामाला लावत जाऊ नकोस ...राजकुमारी आहे ती ...तिचा जन्म कामासाठी नाही तर काम करवून घेण्यासाठी झाला आहे...."

तिचे वडील सुहास तिच्या आईला मुद्दाम ओरडले आणि तिचे गालगुचे ओढत म्हणाले....

" अहो मुलीची जात आहे ती सवय असावी कामाची....."

स्मिता त्यांना चहा देत म्हणाली.....

"अग पण एवढे नोकर आहेत तिची काय गरज "

सुहास तिला म्हणाले....

"उद्या सकाळ तिचं लग्न होईल.....मग लग्न झाल्यावर काय करेल तुमची राजकुमारी ?"


स्मिता ने स्वतःला चहा घेतला आणि ती त्यांना म्हणाली

"ती राजकुमारी मग तिचं लग्न सुद्धा एका राजकुमारा सोबतच होईल ना....माझ्या मुलीला ही सगळी कामे कधीच करायला लागणार नाहीत..... तिला जे हवं आहे ते तिला हातात मिळेल...."

सुहास अनिका कडे खूप प्रेमाने पाहत म्हणले.....

"हा हा... करा अजून लाड......तुमच्या लाडात तिला बिघडवून च टाका "


त्यावर स्मिता त्यांना म्हणाली

"हा मग.... बिघडू दे......पापा की परी है वोह..."

सुहास ने असं म्हंटल आणि ते दोघेही हसायला लागले..... त्या हसण्याचा आवाज तिच्या कानात घुमत होता आणि तेवढ्यात बाजूच्या सखू मावशी पुढे झाल्या,  त्यांनी गॅस पटकन बंद  केला आणि तिला म्हणाल्या ...

" अग ये लक्ष कुठे आहे तुझं? दूध उतू गेलं ना.....बाई साहेबाना समजलं तर काय करतील माहित आहे ना "

तिच्या आवाजाने ती भानावर आली....

ते ऐकून ती घाबरली आणि शांत तिला काय करावे लक्षात आलं नाही आणि तिने गरम पातेलाला हात लावला आणि चांगलाच चटका तिला बसला, तिचा हात भाजला गेला...... लाल लाल पडला...पण ते बघत बसायला अजिबातच वेळ नव्हता....... वैशाली ने ते पाहिलं असत तर........... विचार करूनच तिच्या अंगावर काटा आला....... आणि स्वतःला सावरून तिने सांडलेले दूध तिने पुसून घेतलं.....तिच्या डोळ्या समोर आता तो प्रसंग उभा राहिला..... ती घाबरली तिला आठवलं एकदा असच
तिच्या कडून दूध सांडल होत तर वैशालीने तिच्या हाताला चटका दिला..... अनिका चा ती एवढा का राग राग करत होती हा एक प्रश्नच होता.......


अनिका ने सगळं आवरून वैशालीला चहा नेऊन दिला आणि स्वतः तिच्या त्या पडक्या खोलीत गेली.... एवढा मोठा बंगला असून अनिका ला तिथे राहून दिल जात नव्हतं..  तिच्यासाठी बाजूलाच नोकरांसाठी बांधलेल्या रूम मध्ये राहण्यासाठी व्यवस्था केली होती...... तिने आपले केस वर बांधले आणि बुक हातात घेऊन वाचायचा प्रयत्न करू लागली...  पण बाबाची आलेली आठवण तिला स्वस्थ बसून देत नव्हती......


" बाबा..... का गेलात तुम्ही मला सोडून..... आज तुम्ही असतात तर परिस्थिती काही तरी वेगळी असती...... मी खूप मिस करते तुम्हाला....किती छान दिवस होते ते..... तुम्ही माझे किती लाड करत होतात....... "


त्यांची आठवण असह्य होऊन तिने आपल्या desk वर डोकं टेकवलं...... तेवढ्यात तिला साक्षी चा कॉल आला.... साक्षी तिची बेस्ट फ्रेंड्... तिच्या सगळ्या सुख दुःखाची साक्षीदार.....

सुख कसलं म्हणा ...दुःखच तिच्या वाटेला आली आहेत जास्त आजपर्यंत....पण साक्षी मात्र नेहमीच तिच्या पाठीशी उभी राहिली अगदी ढाल बनून ....आनिका नेहमी तिला तू मी माझी डोरेमॉन आहेस हेच म्हणायची आताही तीचा कॉल आला......इकडे हिने उचलला आणि साक्षीचा पलीकडून ही काही बोलण्या आधीच आवाज आला,


"हे....,नोबिता काय करतेस , कधी पासून कॉल करते ..."

आनिका सतत रडतच असायची म्हणून ती मुद्दाम तिला नोबिता म्हणायची

" आ......डोरेमॉन.. सॉरी.......काही नाही करत बोल ना का कॉल केलेलास ?"

अनिका साक्षीला म्हणाली.....

" तुला माहित आहे ना वेदांत चा बर्थडे आहे उद्या ...आणि आपल्याला त्याला मस्त असं सरप्राईझ द्यायचं आहे ...तेव्हा तू उद्या लवकरच ये "

साक्षी अनिका ला आठवण करून देण्यासाठी म्हणाली..


"ठीक आहे...... सकाळीच मी मठात जाऊन लगेच तिकडे येते.... "

अनिका साक्षीला म्हणाली.....


" अनु डार्लिंग, तू एक दिवस मठात जाणे स्किप नाही का करू शकत? "

नकार च येईल हे माहित असताना सुद्धा साक्षी ने तिला विचारलं....


"नाही तुला माहित आहे स्वामींना भेटल्याशिवाय माझा दिवस च सुरु होत नाही."

अनिका तिला म्हणाली.

"बर बाई पण लवकर ये...नाहीतर असं करते मीच तिकडे येते तुला घ्यायला....."


साक्षी हसत म्हणाली....

"ठीक आहे ये.... मी नाही म्हंटल तरी कुठे ऐकणार आहेस....."

असं म्हणून आणिका ने कॉल कट केला ...आणि काहीतरी आठवून ती उठायला गेली तर तिच्या पाठीत चमक भरली .

आ....आई.... ग.....


तिच्या तोंडून वेदनेचे शब्द बाहेर पडले....

ती पाठीला पकडून कळवळली , तिने तसेच बसून घेतलं थोडावेळ आणि मग एक पैन किलर खाल्ली ...थोडा वेळ आराम करून ती बिचारी रात्रीच जेवण बनवायला किचन मध्ये गेली .....सगळं आवरून ती परत आपल्या रूम मध्ये आली...... त्या गोळी मुळे तिला बऱ्यापैकी आराम भेटला होता.....नंतर तिला आठवण झाली ... साक्षी च्या कॉल ची.......


आणि ती उठून आपल्या एका छोट्याश्या पेटी मध्ये उद्यासाठी ड्रेस शोधायला लागली......


"अरे यार... एकही चांगला ड्रेस नाही आहे उद्यासाठी..... आता काय करू...... "

ती स्वतःशीच बोलत होती.....

तिला कळतच नव्हतं काय करावं कारण तिच्या कडे जायला नवीन ड्रेस च नव्हता ....ती विचार करत असतानाच तिथे विनीत येतो .आणि तिच्या बेड वर बसत म्हणाला ...,

" काय बहीणा बाई काय करत आहात ?"

"काही नाही झोपणार आता "

ती आपली पेटी लावत म्हणाली...


"ये इकडे बस...."


असं म्हणून हाताला धरून तिला स्वतः जवळ बसवलं..आणि म्हणाला......

" आजी बोलली मला सकाळी मोठी आई तुझ्याशी कशी वागली त्याबद्दल ...माफी तर नाही मागू शकत तुझी ...पण काळजी घे तुझी सध्या तरी एवढंच बोलू शकतो.... ह्या लोकांना तुझा चांगुलपणा का नाही दिसून येत..... "

" अरे मला सवय झाली आहे ह्या सगळ्याची..... ते sod तू का बर आलास इकडे........"


ती विषय बदलत म्हणाली......

"ठीक आहे मग काय प्लॅन आहे उद्याचा ?"


तिचा स्वभाव माहित असल्यामुळे त्याने जास्त काही विचारलं नाही......


"कसला प्लॅन ?"

तिने न समजून विचारलं......

"अग उद्या बर्थडे आहे ना वेदांत चा मग "


विनीत तिला म्हणाला....

"तुला कस माहित? "


तिने आश्चर्यने विचारलं.....

"अग, मी इकडे येत असताना तुझी शोधा शोध पाहिली आणि बडबड सुद्धा ऐकली......काय शोधत होतीस......."

त्याने तिला विचारलं.....

"अरे काही नाही असच....."


त्याला सांगणे तिला योग्य वाटल नाही म्हणून ती तस म्हणाली......



होईल का तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह?