मागील भागात आपण पाहिलं कि, अनिका आणि साक्षी वेदांत च्या वाढदिवसाची तयारी करतात आता पाहूया पुढे........,
. त्यानंतर त्या दोघी केक शॉप मध्ये गेल्या.... तिथे मस्त त्याला आवडणारा मिक्स फ्रुट केक घेतला आणि त्यानंतर त्या बाजारात गेल्या.... थोड्या फार भाज्या घेऊन त्या नंतर दोघी तश्याच साक्षी च्या घरी गेल्या ..साक्षीने बाजारातून अजून काही साहित्य आणून ठेवलं होत ते तिने बाहेर काढलं आणि जेवण बनवला त्याच्या आवडीचं ...एक क्षण अनिका ला प्रश्नच पडला होता कि ती एवढं का करते पण ती सगळ्यांसाठी करते म्हणून तिने विषय सोडून दिला आणि तिला मदत करू लागली......
. खरं तर वेदांत हा साक्षी च्या आत्याचा मुलगा होता आणि त्याच्या वडिलांचे निधन झाल्या मुळे त्याची आई आणि तो आपल्या मामाकडे म्हणजेच साक्षी च्या वडिलांच्या सांगण्यावरून त्यांच्याच घरी राहत होते ...साक्षी चे वडील सुद्धा बिजनेस मेन होते ..त्यामुळे ती एका सधन घरातून होती....पैश्यांची कमतरता तर तिला अजिबातच नव्हती ..पण ह्यात साक्षी आणि आनिका ची मैत्री कधीच आडवी आली नाही..... त्यांची मैत्री अगदी शाळेपासून घट्ट होती ...साक्षी ने नेहमीच तिला समजून मदत केली ते हि तिचा इगो न दुखावता ..तिच्या घरच्यांना सुद्धा त्यांची मैत्री माहित होती .....
. त्यामुळे अनिका चे तिच्या कडे नेहमी येणे व्हायचे....... आणि ब्याच मुळे त्याची आनिका सोबत सुद्धा ओळख होतीच ...
. वेदांत आताच आपले ग्रॅज्युएशन पूर्ण करून नोकरी साठी प्रयत्न करता होता ..तस तर तो त्याच्या मामाकडे जॉईन होऊ शकत होता पण त्यांची इच्छा त्याने आधी स्वतःच्या पायावर उभे राहावे मग माझ्या बिजनेस मध्ये घेईन ..त्यामुळे तो जॉब शोधत होता ...आणि त्यात तो सुद्धा साक्षी सारखाच खूप हेल्पफुल होता ..सगळ्यांना मदत करायचा ...कधी तरी उशीर झालाच तर साक्षी च्या सांगण्यावरून तो तिला सोडायला सुद्धा जायचा ....त्यामुळे तिच्या मनात तिच्याही नकळत त्याच्या बद्दल एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला होताच ...
वेदांत च्या आवडीचं सगळं बनवून झाल्यावर तिने आणि साक्षी ने त्याला दिलेली रूमची सजावट केली , तेव्हा अनिका आणि साक्षी चे फ्रेंड सुद्धा आले होते जे वेदांत या ओळखत होते प्रणिता आणि वरूण ..त्यांनी सगळ्यांनी मिळून मस्त डेकोरेशन केल.... त्यानंतर ..त्याच्या आवडीचा केक ठेऊन ते सगळे त्याची वाट बघत बसले ....साक्षीच्या वडिलांनी त्याला बोलावून घेतलं आणि तो घरात आल्याबरोबर सगळ्यांचा जोरात आवाज आला........
.
. "हैप्पी बर्थडे वेदांत "
. "हैप्पी बर्थडे वेदांत "
. सगळे टाळ्या वाजवत होते आणि हैप्पी बर्थडे बोलत होते.......
. ते ऐकून तो एकदमच भारावून गेला होता ....त्याच्या डोळ्यात पाणी आलं तस साक्षी च्या वडिलांनी पंकज ह्यांनी त्याला जवळ घेतलं आणि त्याला पुन्हा विश केले ...सगळ्यांनी त्याला ओढत आणून टेबल समोर उभ केल........नंतर वेदांत ने केक कट करून सगळ्या थँक्स म्हंटल ...
. आनिका ला सुद्धा त्याने केक चा तुकडा भरवला आणि तो बाजूला झाला ...ह्यात त्या सगळ्यांनी कॉलेज बँक केलं होत त्यामुळे साक्षी कडे सगळ्यांचा जेवण करण्याचा बेत होता ...तिच्या आई ने आज खास त्यांच्या साठी जेवण बनवलं होत ........ जेवायला वेळ होता..... म्हणून सगळ्यांनी गेम खेळायचं ठरवलं......पण त्या आधी सगळ्यांनी त्याला गिफ्ट दिले ...फक्त आनिका एकटीच बाकी होती......
. .बिचारीने काहीही घेतलं नव्हतं तर ती एका बाजूला झाली ..तिचा चेहरा पूर्ण पडला आणि तेव्हा तिला आपल्या गरिबीची जास्त जाणीव झाली ....प्रणिता थोडी बालिश असल्यामुळे तिने पटकन अनिका ला विचारलं ...,
" आनिका तू काय गिफ्ट आणलं आहेस ?"
ते ऐकून तिचा चेहराच पडला....
ती काही बोलणार तेवढ्यात साक्षी म्हणाली ...,
" हा मग आनिका गिफ्ट नाही आणणार असं होईल का ?
त्यावर आनिका सुद्धा न कळून तिच्या कडे पाहतच राहिली
'अरे वा...! अनिका......बघू काय आणलं आहेस गिफ्ट? "
वेदांत ने विचारलं त्यावर आणिका ला काहीच माहित नसल्या मुळे ती गप्पच राहिली, तिला काय बोलवे तेच सुधरेना..,..
" मी ...मी...... "
ती अडखळली...
तिच्या खांद्यावर हात ठेवत साक्षी म्हणाली ...
"अग, असं काय करतेस गिफ्ट आणलं आहेस तर दे ना ...पर्स मध्ये ठेवून काय करणार आहेस ..."
ते ऐकून प्रणिता ने तिची पर्स घेतली आणि एक व्रॅप केलेले गिफ्ट बाहेर काढले ....
तिने ते वेदांत च्या हतात दिले.....तसे वेदांत ने तिला थँक्स म्हंटल तर आनिका ने साक्षी ला थँक्स म्हंटल त्यावर साक्षीने तिला डोळ्यांनीच ओके म्हंटल आणि वेदांत कडे वळून ती म्हणाली.......,
"अरे बघत काय बसला आहेस ओपन करून पाहा कि"
होणा कर ओपन आम्हाला ही समजेल काय आहे ते.....
वरुण म्हणाला....
त्याने ओपन केलं तर त्यात सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती होती.....
ती पाहून वेदांत खूप खुश झाला आणि आनिका ला म्हणाला ...
" थँक्स यार आनिका..... खूप आवडल.......तू मला एकदम मस्त असं गिफ्ट दिलस ..पण तुला कस माहित माझी बाप्पा वर श्रद्धा आहे ते...."
तो ती मूर्ती पाहत म्हणाला.....
अरे मी सांगितलं आणि आता काय तू पण ....चला गेम खेळूया...
.. तस सगळ्यांनी होकार दिला..... काही वेळ गेम खेळून झाल्यावर..... साक्षी च्या आईने सगळ्यांना जेवायला बोलवलं.....सगळ्यांची जेवण होई पर्यंत खूपच वेळ झाला होता ..तस घाई करत अनिका साक्षीला म्हणाली ....,
" साक्षी मला निघायला हवं नाहीतर मॅडम ओरडतील आता ..."
साक्षीला अनिका तिच्या वैशाली मॅडम ला किती घाबरते आणि तिने काही केल तर वैशाली काय करू शकते हे ठाऊक होत.... किती तरी वेळा तिने तिला डॉक्टर कडे नेलं होत.... तिच्या जखमेवर औषध लावल होत.... साक्षी तिला नेहमी म्हणायची......
"वरच्या जखमेवर मी औषध लावून ठेवते पण तुझ्या मना वर होणाऱ्या घावा च काय? तू ते सगळं सोडून माझ्या कडे राहायला ये... "
पण अनिका चा जीव आजी मध्ये अडकला होता, त्यात तिला साक्षी वर ओझे व्हायचे नव्हते.... म्हणून ती नकार द्यायची.......
प्रसंगावधान दाखवत साक्षी म्हणाली....,
" ठीक आहे तू हो पुढे ..... मी की घेऊन येते गाडी ची आणि.......सोडते तुला "
असं म्हणून ती गाडी ची की घेऊन आली तस तिला अडवत वेदांत म्हणाला,
" साक्षी राहू दे आज मी सोडतो चालेल ना ..आफ्टर ऑल तुझी बेस्ट फ्रेंड् आहे आणि मला सुद्धा वाटेत काम आहे हिला सोडून मी पुढे जाईन..... Hope u डोन्ट माईंड "
हा ठीक आहे.......
असं म्हणून साक्षी त्याला कार ची चावी दिली... लवकर पोहचायचं असल्यामुळे अनिका ने देखिल नकार दिला नाही आणि ती त्याच्यासोबत साक्षी ला बाय करून निघाली......त्याने गाडी काढली तशी ....ती मागे जाऊन बसली ....
त्याने थोडं पुढे जाऊन गाडी थांबवली आणि तिला पुढे येऊन बसायला सांगितलं ...तशी ती पुढे येऊन बसली आणि त्याने तिचे हात हातात घेऊन म्हंटल ....
"कसली गोड दिसतेस अनु तू ह्या ड्रेस मध्ये.... बघतच राहायची इच्छा होते......आणि हा थँक्स हा गिफ्ट साठी
.. एकदम परफेक्ट गिफ्ट दिलंस तू...... "
.. एकदम परफेक्ट गिफ्ट दिलंस तू...... "
काही प्रश्न पडलेत का चला कॉमेंट्स करून सांगा.....
क्रमश :-
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा