मागील भागात आपण पाहिलं कि वेदांत चा बर्थडे सेलेब्रेशन होत... तिथे खूप वेळ होतो म्हणून म्हणून वेदांत अनिका ला सोडायला जातो... आता पाहूया पुढे......,
त्याने थोडं पुढे जाऊन गाडी थांबवली आणि तिला पुढे येऊन बसायला सांगितलं ...तशी ती पुढे येऊन बसली आणि त्याने तिचे हात हातात घेऊन म्हंटल ....
"कसली गोड दिसतेस अनु तू ह्या ड्रेस मध्ये.... बघतच राहायची इच्छा होते......आणि हा थँक्स हा गिफ्ट साठी
.. एकदम परफेक्ट गिफ्ट दिलंस तू...... "
.. एकदम परफेक्ट गिफ्ट दिलंस तू...... "
आपली केलेली तारीफ ऐकून तिला थोडं लाजायला झालं आणि आवडल देखील...... आपल्या आवडत्या माणसाने केलेली स्तुती कुणाला नको असते........... पण त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तिला खरं सांगायची हिम्मत होत नव्हती.....पण तरीही तिने त्याच्यासाठी आणलेली कॅडबरी त्याला दिली आणि म्हटल.....
.."हैप्पी बर्थडे actually ते गिफ्ट साक्षी ने घेतलं आणि हे मी.......सॉरीमाझ्या कडे पैसे नाहीत....
हे म्हणताना तिच्या डोळ्यात पाणी आलं.....
ते पाहून वेदांत ला सुद्धा कस तरी वाटल आणि तो म्हणाला.....,
"अग इट्स ओके.....तू आलीस तेच खूप झालं माझ्यासाठी आणि थँक्स....... अँड लव्ह you alot "
. असं म्हणून त्याने तिला जवळ घायचयचा प्रयत्न केला पण तिला एकदम awkward फील झालं.......तिने थोडं स्वतःला सोडवून त्याला विचारलं...
,
,
" वेदांत, मला सांग......आपण साक्षी ला कधी सांगायचं मला खूप टेन्शन येत आहे, आपण एवढी मोठी गोष्ट तिच्या पासून लपवत आहोत.... "
"अनु, तुला आधीच सांगितल आहे ना मी....मला नीट नोकरी लागू दे... मग सांगू सगळ्यांना.... तिलाच काय घरात सुद्धा सांगेन आणि मामा मामी ला सुद्धा...."
वेदांत तिला समजावत म्हणाला
"अरे पण का लपवतोय आपण हेच मला समजत नाही आहे "
ती थोडं वैतागून म्हणाली....
"हे बघ एकदा कि मी माझ्या पायावर उभा राहिलो कि कसलंच टेन्शन आणि हा तू कुणालाच सांगायचं नाही खास करून साक्षी ला सुद्धा.....माझी शपथ दिले तुला लक्षात आहे ना......."
वेदांत तिला आठवण करून देत म्हणाली......
"अरे पण ती माझी बेस्ट फ्रेंड्स आहे......... किती करते ती माझ्यासाठी.........
ती त्याला समजावणीच्या स्वरात म्हणाली
"मग मी कुठे म्हणतो सांगू च नकोस, फक्त काही दिवस थांब असं म्हणतोय..... कारण मला जॉब शोधायला सांगितलं आहे आधी आणि मी तुझयासोबत आहे म्हंटल्यावर मामा चिडेल कि आधी करिअर न मग लग्न..... तुला माहित आहे ना मी त्यांच्या कडे राहतो तर हे सगळं मला ऐकायलाच लागेल....काहीही झालं तरी.... आणि मला त्यांना अजिबातच दुखवायचं नाही आहे.... सो प्लीज, आता तूच मला समजून घे आणि आता जाऊया.... हा विषय पुन्हा नको...."
तिला जास्त काही बोलू न देता त्याने गाडी चालू केली....ती सुद्धा कुठेतरी त्याच बरोबर आहे हा विचार करून शांत राहिली.....
काही वेळातच त्याने तिला अहिल्यादेवी भवन मध्ये सोडलं .......
ती घरी पोहचली तेव्हा बऱ्यापैकी अंधारल होते.... ती दरवाज्यातून आत मध्ये समोरच वैशाली बसली होती.... त्यामुळे ती जरा घाबरूनच दबकत आपली पाऊले टाकत आत मध्ये गेली पण वैशाली ने तिला पाहिलंच तिने तिला आवाज दिला आणि तिरकस .स्वरात तिला म्हणाली.......,
" काय महाराणी साहेब कुठून आलात भटकून.....जेव्हा बघावं तेव्हा भटकत असता.....,कॉलेज तर कधीच सुटत असणार ना...... बघतेस काय जा जेवणाचं काय ते बघ............"
तस तिला घाबरून अनिका म्हणाली.....,.
"आता तयारीला लागते मॅडम..."
"हा जा आत मध्ये तस पण तुझं थोबाड पाहायची इच्छा नसते च......"
वैशाली म्हणाली पण तेवढ्यात अहिल्याबाई आल्या... त्यांनी तिचं बोलणे ऐकलं तश्या त्या म्हणाल्या....,
" वैशाली तू तिला का डोळ्यात पाहत नाहीस ह्याच कारण मला ठाऊक नाही पण तिचं तोंड बघायचं नाही तिच्या हातच जेवण मात्र तुला चालते हा कुठला न्याय........ "
" आई, हे बघा त्या मुलीने तुमच्या वर काय जादू केली आहे मला ठाऊक नाही आणि तुम्ही मलाच बोलणार त्यापेक्षा मी इथून जाते.... "
असं म्हणून ती तडक तिकडून निघून गेली ...अनिका ला जरी सवय झाली असली तरी तिला वाईट वाटलंच...,
"अनु बाळा, तुला ठाऊक आहे ना... ती कशी आहे.... तू लक्ष देऊ नकोस..... "
तिने फक्त मान हलवली आणि किचन मध्ये जाऊन जेवण बनवायला सुरुवात केली.....तेवढ्यात माधुरी तिथे आली आणि अनिका ला म्हणाली....,
"अनिका... आज स्नेहा च्या आवडीची शेवयाची खीर बनव...तिचा result first क्लास लागला आहे...... टॉप केलंय तिने....."
"हो ..... काकी बनवते आणि अभिनंदन तिचे...."
माधुरी ने हसून मान डोळावली आणि ती निघून गेली.... इकडे अनिका सुद्धा फ्रेश होऊन आपल्या कामाला लागली......माधुरीच बोलणे प्रिया ऐकते आणि तिच्या डोक्यात प्लॅन शिजतो.....
प्रिया च आणि स्नेहा च अजिबात पटत नाही....स्नेहा खूप हुशार असल्या मुळे व तिच्या पेक्षा प्रत्येक गोष्टीत सरस तीच उदाहरण नेहमी प्रिया ला दिल जायचं ..जे तिला अजिबात आवडत नसायचं आणि ती तीचा नेहमीच राग राग करायची......आता हि तिच्या आवडीची शेवयाची खीर केलेली पाहून तिला खूपच राग आला आणि तिने किचन मध्ये जाऊन आनिका ला धमकावलं ...,
" काय ग माज आलाय का .तुला......त्या स्नेहा च्या आवडीची शेवयांची खीर केलीस..,.किती वेळा सांगितलं आहे तुला तिच्या आवडीचं काहीच बनता कामा नये "
" अग पण प्रिया, माधुरी काकू ने सांगितलं होत मग मी काय करणार? "
बिचारी अनिका स्वतःला सावरत म्हणाली....
"ठीक आहे.....चल निघ आता.... झालं ना तुझं काम? "
प्रिया तिला परत दटावत म्हणाली......
तशी अनिका किचन मधून निघून गेली आणि इकडे प्रिया पुढे झाली.... अनिका ने बनवलेल्या त्या खिरीमध्ये तिने मीठ टाकलं आणि टेस्ट करून सुद्धा पाहिली किती खारट झाली आहे...
खूपच खारट लागली तशी ती हसून म्हणाली
"बघतेच स्नेहा......तू कशी खीर खातेस ते? "
आणि ती निघून गेली
***********************************
थोड्या वेळाने इकडे डायनिंग टेबल वर सगळेच बसले होते ...स्नेहा आली तस वैशाली तिला म्हणाली ...,
" आलीस बाळा ..., ये बघ तुझ्या आवडीची खीर केली आहे बघ....."
'ओह्ह थँक्स अलोट मोठी मॉम ...."
स्नेहा वैशाली ला म्हणाली......
"ताई तुम्ही किती स्नेहा चा विचार करता ...स्नेहा खूप लकी आहे ..."
माधुरी वैशालीला हसत म्हणाली...
"अग ती आहेस तेवढी छान..... आता पण बघ ना टॉप केल..... नाहीतर काही जण सगळं मिळून पण........"
ती प्रिया कडे पाहत म्हणाली.... तस प्रिया ने मान फिरवली.....
ते पाहून वैशाली ला राग आला पण तिला न बोलता ती समोर असलेल्या अनिका वर खेकसली....,
"अग ये तू काय बघतेस वाढ आता, कि आमंत्रण देऊ ...."
तशी पटकन अनिका पुढे झाली आणि तिने सगळ्यांना जेवण वाढलं.... जेवण सुरेख झालं होत... पण आजी सोडून कुणीच काही बोललं नाही.... नंतर तिने सगळ्यांना खीर दिली......तस माधुरी स्नेहा ला म्हणाली....
"स्नेहा खा बाळा....तुझ्या आवडीची आहे.... "
स्नेहा ने पहिला घास तोंडात टाकला आणि ती थू थू करून तिने तो थुंकला ...... तिचं पूर्ण तोंड खारट झालं होत....तिचं हे वागणे सगळयांना अनपेक्षित होत...
प्रिया ने केलेले समजेल का कि पून्हा अनिका वरच येईल......???
क्रमश
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा