Login

*जीवनसाथी * भाग -7

अंश अनिका ची कथा
मागील भागात आपण पाहिलं कि अनिका वेदांत च्या आठवणीत रमली आहे..... आता पाहूया पुढे.....
,

अनिका फक्त हसली....तर वेदांत म्हणाला.....,

" अनिका छान नाव आहे ........guys, मी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही तुम्ही स्टडी करा पण थोड्या वेळात मी नाश्ता घेऊन येतो तो मात्र खायला नक्की या ..नाहीतर मीच येतो इथे घेऊन...


असं म्हणून हसून तो निघून गेला पण जाताना एक नजर आनिका वर टाकून गेला....


थोड्या वेळाने जाऊन वेदांत ने मस्त कांदा भाजी आणली ...साक्षी च्या आई ला म्हणजे त्याच्या मामी ला चहा बनवायला सांगितलं ...साक्षी च्या घरी नोकर असले तरी स्वयंपाक मात्र तिची आई च करत असे तिच्या वडिलांनी त्यांच्याच हातच आवडत असे आणि तिला देखील स्वयंपाकाची आवड होती ...तिने बनवलेला चहा आणि भज्जी घेऊन तो साक्षी च्या रूम मध्ये गेला ..तेव्हा त्या दोघींचं जवळपास आवरलं च होत आणि आनिका निघण्याच्या तयारीत होती .......तिला निघताना पाहून तो म्हणाला....,


"  ...बंदा हाजीर है आपकी सेवा में .....चला पटकन खाऊन घेऊया "


"साक्षी मी निघते वेळ झाला आहे परत मॅडम ओरडतील "


ती बॅग उचलून साक्षी कडे पाहत म्हणाली...


"अरे तुम्ही कुठे निघालात? एवढंच तर खायचं आहे...........आणि मी एवढं आणलं आहे तर प्लीज खाऊन जा......."


तो एवढेसे तोंड करत म्हणाला....त्यावर साक्षी सुद्धा म्हणाली ....,

"त्या वैशालीला काही कामे नाही आहेत तुला त्रास देण्याशिवाय तू आता खाऊन च जा तसे हि तिकडे जाऊन तुला फक्त कामेच तर करायची आहेत...... "


असं म्हणून तिने जबरदस्तीने तिला बसवलच ....
ते खात असताना वेदांत आणि साक्षी ची बडबड चालू होती तर आनिका शांत पणे खात होती ....वेदांत मध्ये मध्ये चोरून तिच्या कडे पाहत होता ...त्याला ती पहिल्याच  नजरेत आवडली होती ह्यात वादच नव्हता..... तिने पटकन भज्जी संपवली आणि साक्षी ला बाय करून  ती बाहेर पडली ......ती गेल्यावर  वेदांत ने साक्षी ला विचारलं ......

"अशी काय तुझी मैत्रीण एवढी काय घाई ..."

त्यावर साक्षी ने त्याला तिच्या परिस्थिती बद्दल कल्पना दिली ...ते ऐकून त्याला खूप वाईट वाटलं .....


आता तर तो मुद्दाम ती यायचं वेळेला घरी थांबू लागला होता ...तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा पण ह्या मॅडम काही त्याला भाव देत नव्हत्या ..


एके दिवशी अचानक साक्षी च्या घरी असताना खूपच पाऊस पडत होता ...आनिका ने खूप वेळ वाट पाहून देखील हा पाऊस काही थांबायचा नाव घेत नव्हता ...साक्षी ने आनिका ला समजावण्याचा व्यर्थ प्रयत्न केला कि आज इकडेच थांब ...पण ऐकेल ती आनिका कसली...... त्यात तिचा ही दोष नव्हताच......तिच्या मनात खूप भीती दाटली होती ....एकदा असच लेट झालं असताना तळपत्या उन्हात तिला उभं ठेवलं होत चांगलं तासभर वैशाली ने ...तेव्हा तिची काय अवस्था झाली होती ...ह्याची तिला कल्पना देखील करवत नव्हती.....त्यामुळे आता इथे थांबू शकणे पॉसिबल नाही ह्याची तिला पूर्ण पणे कल्पना होती म्हणून च तिने किती हि पाऊस पडला तरी मला जावं च लागेल असं साक्षी ला सांगितलं ...


इकडे साक्षी तिला एकटीला सोडायला अजिबात तयार नव्हती ..आणि अनिका ही ऐकायला तयार नव्हती...... शेवटी तिने वेदांत ला तिला सोडायला सांगितलं .....काहीच पर्याय नसल्यामुळे आनिका ने लगेच होकार दिला ...एव्हाना त्याच्या बद्दल तिला सुद्धा बऱ्या पैकी माहिती झाली होती ....त्याचा स्वभाव आणि तो सुद्धा आवडू लागला होता ..


.एवढ्या भर पावसात त्याने गाडी काढली ...रस्ता पूर्ण पावसामुळे जाम झाला होता ...पण तिला घाई झाली होती ती कधी तिकडे पोहचते ...लेट झाली आणि पावसात उभं केलं तर ...विचार करूनच तिच्या अंगावर काटा मारला .....तीच अंग पूर्ण थरथरत होत ...वेदांत ने तिच्या हातावर हात ठेऊन तिला शांत राहा आपण पोहचू असं सांगितलं ......काही वेळातच ते बऱ्या पैकी पोहचले पण थोडा पुढे पूर्ण रस्ता जाम झाला होता.

गाड्या देखील रस्त्यावर थांबल्या होत्या....न ह्यात सुद्धा ह्या मॅडम ला जायचं च होत ....आजूबाजूचा अंदाज घेऊन वेदांत म्हणाला.....,


" अनिका, मला वाटत आपण मागे फिरावं ...तू एक दिवस आमच्या कडे म्हणजे साक्षी कडे थांब ...बघ पुढे रास्ता जाम झाला आहे ...मी सकाळीच सोडेन तुला "


" नको वेदांत ..आणि थँक्स तू एवढा आलास........इथून जवळच आहे घर ....मी चालत जाते ..."

असं म्हणून ती गाडीतून उतरली देखील ......वेदांत तिला आवाज देत होता ...पण गाड्यांच्या हॉर्न मध्ये आणि पावसाच्या आवाजात तिला त्याची हाक जाणे शक्य नव्हतं .......तस त्याने आजूबाजूला पाहून गाडी एका साईड ला लावली आणि तिच्या दिशेने धाव घेतली ....

इकडे अनिका गुढघ्याभर पाण्यातून रास्ता शोधत शोधत झपाझप पाऊले टाकत  चालली होती ....आणि अचानक तिचा पाय एका खड्यात पडला आणि मुरगळला ....

आई ग.......

ती विव्हळली......

नशीब तिच्या मागून वेदांत धावत आला आणि त्याने तिला पकडलं ...पण पाय मुरगळला असल्यामुळे तिला आपले पाऊल ही पुढे टाकता येत नव्हतं. त्याने तिचा हात खांद्यावर टाकला आणि चालायचा ते दोघे प्रयत्न करू लागले पण तिला सहन होत नव्हतं ...तिच्या चेहऱ्यावर ती वेदना अगदी स्पष्टपणे उमटत होती, त्याला दिसत आणि जाणवत देखील होती........तस काहीही विचार न करता त्याने तिला उचललं ...

" वेदांत काय करतोस "

ती घाबरून म्हणाली....

" तू शांत बस ...खूप हट्टी आहेस ..नको तिथे बोलते आणि जिथे बोलायला पाहिजे तिथे नाही बोलत ....."


तो पण रागात म्हणाला....

नको.....उतरव मला प्लीज.....

ती request करत म्हणाली....


अग......तुला चालायला नाही होत...


तो तिला समजावत होता.....

"अरे आजूबाजूला बघ...सगळे कसे बघत आहेत उतरव तू मला "

असं म्हणून ती जबरदस्ती ने उतरली...

अग कोण नाही पाहत.... जो तो घरी जायच्या गडबडीत आहे.....

पण तिने त्याच न ऐकता चालायला सुरुवात केली..... तिच्या पायावर जोर येऊन तिला पुढे पाऊल टाकता येत नव्हतं.....


..वेदांत मागे थांबून तिची गंमत पाहत होता.  तिने मागे वळून त्याच्या कडे छोटस तोंड करून पाहिलं ...तस तो  हसला ..आणि तिला हेल्प करायला पुढे गेला.... एव्हाना पावसाचा जोर कमी झाला होता ...

" हे बघ मला पण काही हाऊस नाही आहे, तुला उचलून घायची कि माझे इंटेन्स सुद्धा वाईट नाही आहेत ...पण आता तुला चालायला जमत नसतं सुद्धा तू चाललीस तर दाब येऊन आणखीन पाय सुजेल ...म्हणून समजतंय"


तो असं म्हणाला ते ऐकून तिला सुद्धा वाईट वाटल कारण त्याला आपल्या वागण्या मुळे हर्ट झालंय हे समजलं....


सॉरी......माझा तसा उद्देश नव्हता.... पण लोक नाव ठेवतील म्हणून

तिने शांत पणे त्याला म्हंटल.....


"हम्म... ओके.  लोक काहीही केल तरी नाव ठेवणारच....... जाऊदे..... आपण ... जाऊया...... "

त्यावर तिने आपली मान हलवली आणि त्याने तिला उचलून घेतल...ह्या दरम्यान त्याने मध्ये मध्ये खूप लोकाची मदत केली .दरम्यान ..तिला त्याच्या बद्दल ची आपुलकी अजूनच वाढली.........ती मध्ये त्याला बघत होती..... तर तो अलगदपणे तिला जपत पुढचा रस्ता काढत होता......