Login

लिखाणाच्या काही टिप्स! ज्या तुमचे लेखन अजून दर्जेदार बनवतील.

प्रभावशाली लेखन कसं करायचं?


लेखक हा एक सर्जनशील विचार असलेला प्राणी आहे जो त्याच्या सभोवताली घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे रूपांतर आणि विश्लेषण करून त्याच्या कल्पनेच्या विश्वात राहतो.कधीकधी ते लोक त्यांच्या जगात इतके व्यस्त असतात की ते त्यांच्या आजूबाजूला काय घडत आहे याकडे लक्ष देत नाहीत. ते लोक आत्ममग्न असतात.काही लोकांना असे वाटते की त्यांच्या सभोवतालच्या घडामोडींबद्दल जाणून घेण्याकडे त्यांचे लक्ष किंवा रस नाही. पण ही संकल्पना फक्त त्या लोकांसाठीच खरी आहे. कारण त्यांचे आत्ममग्न असणे हे नावीन्य आणि विलक्षण भावनेचे लक्षण आहे. आणि ही गोष्ट फक्त एक लेखकच समजू शकतो. आपल्याला कधी कधी आपल्या कल्पनेत रंगवलेली चित्रे शब्दात कशी मांडायची? कल्पनेतून नाविन्य कसे आणायचे? हे समजत नाही. एखादा चित्रपट किंवा मालिका बघितली तर यात नक्कीच असं काही तरी दृश्य असायला हवं होतं किंवा त्यात याने / हिने असं वागायला हवं होतं. हे असं नाही तर असं दिसायला हवं होतं असं नक्कीच वाटतं. आणि असा विचार करून तुम्ही स्वतःमध्ये आत्ममग्न होता.

लेखक होणे ही केवळ विचार करण्याची गोष्ट आहे का? तर नाही... त्यासाठी तुम्हाला कल्पना शब्दात मांडावी लागेल.आणि हे कसे करायचे ते आपण या लेखात शिकू. तर लेखक होण्यासाठी येथे काही टिप्स आहेत. जर तुम्ही त्यांचे पालन केले तर नक्कीच तुम्ही यशस्वी लेखक म्हणून ओळखले जाऊ शकता.

१) मनातील कल्पना, घटनांचे शब्दात रूपांतर करा.

काय होतं बघा अनेकदा आपण आपल्या मनात काहीतरी कल्पना करत असतो. पण आपण तीचे शब्दात भाषांतर करत नाही. ती कल्पना आपण फक्त अनुभवतो.पण त्या घटनेचे शब्दात वर्णन करायला सुरुवात केली तर तुम्ही शब्दांचे जादूगार व्हायला वेळ लागणार नाही.

२) कल्पनाशक्तीला वाव मिळावा म्हणून एकांतात रहा.

जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुमच्या विचारशक्तीला चालना मिळते. आजूबाजूच्या गोष्टींचे विश्लेषण करून त्यांना आकार देता येतो. एकांतात लोकांचा आवाज नसतो कोणाला उत्तरे देण्याची गरज नसते. त्यामुळें हळूहळू आपण स्वतःशी काहीतरी बोलू लागतो. हळूहळू आपण चित्रं रंगवू लागतो.

3) वाचन सुरू ठेवा.

जर तुम्हाला उत्तम लेखक व्हायचे असेल तर तुम्हाला उच्च दर्जाचे साहित्य वाचावे लागेल. अतिरिक्त वाचन तुमचा शब्दसंग्रह वाढवते.
एखाद्या कादंबरीतून तुम्हाला हे समजेल की एखादी घटना कशी रंगवून लिहायची किंवा तिचं वर्णन कश्या प्रकारे करायचं? याने आपण घटनांचे योग्य शब्दात वर्णन करू शकता.

4) तुमच्या मनात कल्पना जबरदस्ती करू नका. तिला थोडा वेळ द्या.

कधी कधी असं होतं की आपण एखादी कल्पना लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो पण ती येत नाही. कारण ते आपण जबरदस्तीने आणत आहोत.त्याऐवजी, आपण कल्पना निर्माण करण्यासाठी थोडा वेळ घ्यावा. जसा तुम्ही स्वतःला रिलॅक्स आणि शांत असला तेव्हा हळूहळू कल्पना येईल...


तर या काही टिप्स होत्या ज्यांचा वापर करून तुम्ही लेखक बनू शकता. अजून माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी या पेजला फॉलो करा.