लिली आणि छोटी सोनपरी

एक नवीन सुरवात बालकथे पासून बघा कशी वाटते ही छोटी सोनपरी

लिलीला नुकत्याच उन्हाळ्याच्या सुट्टया लागल्या होत्या तीच एक होत तीला उन्हाळ्याच्या सुट्टया लागल्या की फक्त आज्जीकडे जायला आवडायच आणि का नाही आवडणार लिलीची आज्जी सुद्धा तशीच होती न सगळ्यांना आवडणारी.


लिलीने सुद्धा पक्कच केल होत यावेळी उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण आज्जीकडे चांगले दोन महिने राहायचं आणि चांगली धूम मज्जा करायची.


मस्त पैकी गोष्टी ऐकायच्या गावात फिरायचं नुसता धुमाकूळ घालायचा अगदी जे जे शहरात करता येत नव्हत ते सगळ गावी आल्यावर करायचं.


लिली आपल्या आज्जीची लाडकी नातं होती आणि तितकीच मस्तीखोर देखील होती. पण तीची मस्ती खोडकरपणा आपल्या आई बाबांकडे चालत नसे कधी ही तीने घरी मस्ती किंवा खोड्या केल्या की दोघांकडून मार बसत.


पण आज्जीच तस नव्हतं सुट्टीत आज्जीकडे गेल्यावर लिलीच आणि आज्जीच चांगलच जमत असे लिली एकदा गावी पोहोचली की बस लिली ते गाव आणि आज्जी बस तीला मग काहीच लागत नसे.


लिलीला उन्हाळ्याच्या सुट्टया लागल्या तस ती गावी जाण्यासाठी तयार झाली.


"बेटा आवरलं का तुझ चल टॅक्सी आली आहे दारात." आपल्या बॅगा बाहेर आणत जुलीने विचारलं


"यस, मॉम आय एम रेडी डॅड कुठे आहे तो येणार आहे न आपल्याला सोडायला आणि प्लिज मी आधीच सांगून ठेवते हं यावेळेस मी आज्जीकडे चांगले दोन महिने राहणार आहे हं मला बोलायचं नाही तुम्ही नेहमी आठ दिवस राहतात मग मला मी आज्जीकडे राहिले अस वाटतच नाही यावेळी तुम्ही घरी जायच मग मी येणार." आपली बॅग बाहेर आणत लिली म्हणाली.


"झालात का दोघ तयार आधी गावी पोहोचू मग ठरवू काय करायचं ते चला आता आधीच खूप उशीर झालाय गावी पोहोचायला रात्र झाली तर चांगल होणार नाही वेळेवर पोहोचलेलच बर." जोसेफ सगळ्यांच्या बॅगा गाडीत ठेवत बोलला.


काही क्षणा नंतर...


जोसेफने बॅगा गाडीत ठेवल्या आणि गाडी लगेच भरदाव वेगाने जोसेफच्या गावी निघाली.


जोसेफ इंजिनियर होता आणि जुली एक हौसवाईफ होती लिली दोघांची एकुलती एक लाडाकोडात वाढलेली मुलगी होती.


जोसेफ गावाकडेच वाढलेला होता त्याच माध्यमिक शिक्षण गावाकडेच झाल होत नंतर त्याने इंजिनियर साठी शहरातल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि शहरातलाच होऊन गेला शिक्षण कॉलेज मग लग्न.


कधी कधी तो गावात चक्कर मारत असे पण नोकरी मुळे त्याला शहर सोडवत नव्हत पण लिलीच तस नव्हत आज्जीची माया तीला उन्हाळ्याच्या सुट्टीत खेचून आणतच असे आणि मग त्या निमित्ताने जोसेफची सुद्धा आपल्या आईची भेट होत असे.


जोसेफच गाव जितकं सुंदर होत तितकच रहस्यमय सुद्धा होत दररोज तीथे काही ना काही रहस्यमय घटना घडतच असे म्हणूनच जोसेफला लिलीची काळजी वाटत होती.


"हे बघ लिली आज्जीकडे गेल्यावर शहाण्यासारखं रहायचं हट्ट करायचा नाही मला हेच हव ते नको अस करायच नाही समजलं." जोसेफ लिलीला समजावत बोलला.


"डॅड आपण अजून आज्जीकडे पोहोचलो पण नाही आहोत झाल का तुझ सुरु मला सुट्टया लागल्या आहेत न त्या तर मला एंजॉय करू द्या." हिरमुसलेल्या स्वरात लिली बोलली


"लिली खूप होतय बर का तुझ आता हे बर नाहीये तुझ अस काय बोलला डॅड तुला? तुला फक्त समजावून सांगत होता न त्याच्या बोलण्या मागे काही तरी कारण असल्याशिवाय बोलेल का तो सॉरी म्हण लवकर." रागाने जुली म्हणाली


"सॉरी परत नाही बोलणार पण मी दोन महिने राहणार आहे तीथे ओके चालेल न डॅडु प्लिज प्लिज." वडिलांना लाडीगोडी लावत लिली म्हणाली


"ठिक आहे बाई तु थोडी ऐकणार आहेस रहा मनसोक्त." परवानगी देत जोसेफ म्हणाला


आणि सगळे आनंदून हसू लागले.


लिलीचा आनंद तर गगनात मावत नव्हता तीला आपण कधी एकदा आज्जीकडे पोहोचतो आणि आज्जीला भेटतो अस झाल होत.


तिघांचा प्रवास छान सुरु होता गप्पा मारत, गाण्याच्या भेंड्या खेळत, गाव फुल पक्षी अगदी सगळ काही त्यांनी भेंडयामध्ये घेतल होत आणि तीने आपल्या आई बाबांना त्यामध्ये हरवलं सुद्धा होत.


लहानमुलांच्या खेळा मध्ये मोठ्यांनी आपल्या मुलांकडून हरण यात वेगळीच मजा असते तीच मजा जोसेफ आणि जुली अनुभवत होते. होता होता दुपार झाली तस तिघांना भूक लागायला लागली.


"आता बस हं लिली आज आपण खूप खेळलोय आता खूप भूक लागली आता आधी पेटपूजा करून घेऊत मग तुला हरवतो बघ." एखाद हॉटेल शोधत जोसेफ म्हणाला.


आणि चांगल हॉटेल शोधू लागला.


क्रमशः


यातल्या पात्रांची नावे जरी विदेशी असली तरी बाल कथा पूर्णतः भारतीय आहे.


लिली आणि सोनपरी दोघांच्या गोड मैत्रीची कथा आता या कथेत पुढे काय काय होत बघुत पुढील भागात

🎭 Series Post

View all