गुढघ्याभोवती हाताची मिठी घालून शून्यात नजर लावून बसलेली ती. घरात स्मशानशांतता होती. डोक्यात मात्र विचारांचं वादळ उठलेलं आणि त्या आवर्तात तिचं मन गिरगीरत होतं. क्षुल्लक गोष्टीवरून त्यानं बरंच सुनावलेलं तिला. “ऐक माझं बाळा, हा खूप तापट आणि बालिश आहे. तुला नाही निभणार. “बाबांची आठवण आली आणि तिचे डोळे वाहू लागले. हट्टानं लग्न केलं, त्यापायी घरच्यांकडे पाठ फिरवली. मित्रमैत्रिणी नव्हतेच फारसे. गोड बोलून नोकरी सोडायला लावली. त्यामुळं जो काही लोकांशी संपर्क होता तोही संपला. आता तो नं ती इतकंच तिचं जग संकुचित झालं. हा अगदी क्षुल्लक गोष्टींवरून वाद घालायचा, म्हणजे अगदी हा पेला असा इथं का ठेवलाय पासून ते भाजी जास्त का दिली डब्यात इथंपर्यंत. ती खूप कंटाळून गेलेली. एकदा असंच त्याची शॉर्ट कपाटात कपड्यांच्या खाली ठेवली तर वर का नाही ठेवली म्हणून अड्वातद्वा बोलला तो. “काम काय असतं गं दिवसभर?? हां?? xxx उताणी करुन झोपाच काढायाच्या असतात. चारच कामं करतेस ती पण नीट नाही का करता येत??”“पैसे काय झाडाला लागतात का, मी दिवसभर xx घासतो म्हणून हे वैभव बघायला मिळतंय. स्वतः एक पैसा मिळवण्याची अक्कल नाही. नुसते उडवायला हवेत पैसे. ““गप पडायचं तिथं, आजकाल खूप तोंड फुटलंय तुला. माझ्या तुकड्यांवर जगतेस हे विसरू नको. “हे आणि असेच, फक्त त्याचेच शब्द घुमायचे त्या घरात. अंधार पडायला लागला होता. डोळे पुसून ती उठली. तोंडावर पाणी मारलं. केस सारखे करुन देवाजवळ गेली. तिचा राम सौम्य स्मित करत त्याच्या प्रेमळ डोळ्यांनी तिच्याकडं बघत होता. तिनं दिवा लावला. धूप घातला. रामदादाला एक मिठी घालून घरभर फिरुन सगळे दिवे लावले. स्वैपाकघरात जाऊन फ्रिज उघडला भाजीसाठी, कोथिंबीरीच्या डब्यावर पहुडलेला दुधी हसला तिच्याकडं बघून. ती पण हसली आणि दुधी बाहेर काढला. वरण-भाताचा कूकर लावून तिनं थोडी मुगाची डाळ गरम पाण्यात भिजत घातली. दुधी, मिरच्या, कोथिंबीर चिरुन घेतली. चित्र काढावं तशी तन्मय होऊन ती स्वैपाक करत होती. छोट्या कुकरमधे तूप-जिरे-हिंगाची खमंग फोडणी करुन त्यात मिरची, डाळ आणि दुधी घालून परतून मीठसाखर घातली आणि झाकण लावलं. परातीत जोंधळ्याचं पांढरंशुभ्र पिठ काढून खसाखसा मळून छान गोल पातळ भाकरी थापली. तव्यावर टाकून भाजून तिच्यावर घरचं लोणी फासलं. अशीच आवडायची त्याला भाकरी. बेल वाजली म्हणून लगबगीनं जाऊन दार उघडलं तर तोच होता. बॅग-हेल्मेट घडवंचीवर ठेवत त्यानं बूट काढून जागेवर ठेवले तोवर ही डब्याची पिशवी घेऊन आत वळली. “थांब, हे राहिलं.” तो अजुन एक पिशवी तिच्या हातात देत म्हणाला. तिनं न बोलता पिशवी घेतली आणि आत निघून गेली. “उघडून बघणार नाहीस?? अजुन रागावलीयेस??” शर्टाची बटणं काढत आत येत तो म्हणाला. तिनं पिशवी उघडली. तिच्या आवडीच्या मिठाया होत्या. एक बॉक्स उघडून त्यातली एक मोहनथाळची वडी भरवत त्यानं तिला घट्ट मिठीत घेतलं. तीचे ओठ विलग झाले. “फ्रेश होऊन ये, पानं घेते” म्हणत ती वळली. तो येईतो तिनं पानं वाढलेली. भाकरी आणि दुधीची भाजी बघून त्याची कळी खुलली. पोटभर जेवला तो. मागची आवराआवर, झाकपाक करुन ती झोपायला गेली. “सॉरी, काय करू गं, राग अनावरच होतो हल्ली माझा. “हलकंसं हसून त्याच्या गालावर थोपटून तीनं चादर ओढून घेतली. नेहमीप्रमाणं सकाळ झाली. रोजच्यासारखं आवरून डबा घेऊन तिला हलकीशी मिठी मारुन तो ऑफिसला गेला. तिनं हातातलं आवरलं आणि चहाचा मग घेऊन झोपाळयावर येऊन बसली. मेसेज टोन वाजली म्हणून बघितलं तर त्याचा मेसेज होता,सॉरी ना शोनू, मी राग आवरायचा प्रयत्न करतोय. प्लीज राग सोड. मला हवी आहेस गं तू. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. प्रेम!! ती खिन्न हसली. तिला आठवलं, दारू पिऊन आलेला तो. त्याच्या अर्वाच्य शिव्या, आणि तिच्यावर उगारलेला हात. ढकललं होतं त्यानं तिला आणि भिंतींवर आपटून दुखावलेलं कोपर. तिला कंटाळा आला होता सगळ्याचा. सगळ्याचाच!!!! तिरमिरीत उठून कपाटाचा खण उघडून तिनं झोपेच्या गोळ्यांची बाटली बाहेर काढली आणि डोळे मिटून चहात ओतली. शांतपणे झोपाळयावर बसून चवीचवीनं चहा संपवला. काहीतरी विसरलेलं न्यायला परत आलेल्या त्याला झोपाळ्यापाशी वाकडीतिकडी पडलेली ती दिसली आणि तो सटपटलाच. तसंच उचलून दवाखान्यात नेलं. दोन दिवसांनी शुद्धीवर आली, समोर असलेल्या डॉक्टरना विचारलं, का वाचवलंत मला?? आणि तिच्या उशाशी उभा असलेला तोपण खाडकन् थोबाडीत मारल्यासारखा शुद्धीवर आला. तिच्या गालावर थोपटून मायेनं हसत डॉक्टर म्हणाले, “पुन्हा असला काही गाढवपणा करू नयेस म्हणून.” आणि निघून गेले. तो ही गेला तिच्यासाठी शहाळ्याचं पाणी आणि ज्यूस आणायला. डोळे मिटून पडलेल्या तिला शेजारी असणाऱ्या नर्सेस मधला संवाद ऐकू येत होता. “का केलं असेल गं हीनं असं?”“एवढा चांगला श्रीमंत, देखणा नवरा आहे. किती काळजी घेतोय. ““बघ नं, दोन दिवस उशाशी बसून आहे. हलला नाहीये जागेवरून. डोळ्यातलं पाणी खळलं नव्हतं बिचाऱ्याच्या. आज हसताना बघितलं त्याला.”ती मिटल्या पापण्यांआडून खिन्न हसली. ‘वरुन उडी मारुन सगळं संपवून टाकावं अशी परिस्थिती निर्माण करायची. पार कड्याच्या टोकापर्यंत हात धरून पोचवायला यायचं आणि ‘नको ना उडी मारु….’ अशी आर्जवं करायची…..
काय करावं??
मारावी उडी की परत जावं गळ्यात गळे घालून???
आणि लोक म्हणतात किती बई छान चाललंय हीचं, पण हिलाच अवदसा आठवली…..
हौस किंवा असंच मज्जा म्हणून कुणी टोकाला जात नसतं.
ज्याचं जळतं त्यालाच कळतं…..’
त्याची चाहुल लागली तसे तिनं डोळे घट्ट मिटून घेतले. तो तिच्या केसागालांवरून मायेनं हात फिरवत म्हणत होता “उठ शोना, नारळाचं पाणी पी थोडंसं.”त्यानं तिला उठवून बसवलं. तिनं त्याच्याकडं बघितलं आणि तो ढसाढसा रडायला लागला. “मला सोडून निघालेलीस, कसा जगलो असतो मी तुझ्याशिवाय?? इतका वाईट आहे मी, की तू स्वतःला शिक्षा करुन घ्यावीस?? हां?? मला माझ्या चुका कळल्यात, त्यासाठी मी शिक्षा भोगायला पण तयार आहे, पण एवढी मोठी नाही. प्लीज मला क्षमा कर. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय….”तिनं त्याचे डोळे पुसले आणि त्याच्या डोक्यावर प्रेमानं थोपटलं. तो तिचा हात धरून तसाच बसून राहिला थोडावेळ. मग उठून तिला नारळाचं पाणी पाजलं. “तू खाल्लंस काही??”त्यानं मुंडकं नाही म्हणून हलवलं. तिनं हसत तोच ग्लास त्याच्या तोंडाला लावला. “खाऊन ये काहीतरी. मी झोपतेय तोवर.”शहाण्या बाळासारखा मान हलवत तो गेला. तिनं डोळे मिटले तेंव्हा तिचा निर्णय झाला होता. आठवड्याभरानं तिला घरी सोडलं. किल्लीनं दार उघडल्यावर चकितच झाली ती. सगळं घर सजवलेलं छान. तिची आवडती निशिगंध आणि मोगऱ्याची फुलं. उंबऱ्यावर माप होतं. माप ओलांडून ती आत आली. पुढचा आठवडा फुलपाखरी होता. तिला वाटत होतं की आपण निर्णय घ्यायची घाई केली. मनोमन तिनं ठरवलं की आता हा सुधरलाय, आपण एक चान्स देऊया त्याला. आठदहा दिवस बरे गेले. ती सकाळी पीठ मळत अस्ताना तो तावातावात तिच्यापाशी आला आणि हात खसकन् ओढला तिचा. तिच्या बांगड्या फुटून काचा हातात रुतल्या आणि रक्त वाहायला लागलं. अवाक होऊन त्याच्याकडे बघत राहीली ती. “ऐकू येतंय का, का कान फुटलेत?? माझ्या खिशातले पैसे चोरण्यापर्यंत मजल गेली तुझी?? वाऽऽऽऽऽ आता रडायला काय झालं? आईबाप मेले का तुझे?? ओह तुला काही बोलायचं नाही नाही का. परत काहीतरी कराल मला नमवायला………………”दार जोरात आपटून तरातरा निघून गेला तो. बधिर होऊन ती उभी होती. मनगटातून वाहणारं रक्त पीठात मिसळून पीठ लाललाल होऊन गेलेलं. भानावर येऊन डोळे पुसत तिनं सिंकपाशी जाऊन हात धुतले आणि खोलीत गेली. पट्टी काढायला खण उघडला तर त्यात पाचशेच्या नोटांची चवड होती. तिनं मलम लावून पट्टी बांधली. कपाटावरची बॅग काढून त्यात तीचं सामान भरलं. मैत्रिणीला फोन लावून सगळं सांगितलं, ती म्हणाली आधी तिथून निघ आणि माझ्याकडे ये थेट. तिनं त्या नोटांचा फोटो काढून घेतला. त्याला फोटो आणि मेसेज पाठवला ‘हेच तुमचे पैसे तुम्ही शोधत होतात ना??’ आणि फोन बंद करुन सिम काढून मोडून केराच्या डब्यात टाकून दिलं. देवाला नमस्कार करुन तिनं उंबरठा ओलांडला, कधीच न परतण्यासाठी.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा