Login

जगणे माझे

जगणे नारीचे
आहे ते घेऊन
जगले जरी आनंदाने
का कोणास पडतो फरक
पाहून माझ्या हस्याला...

कधी कोणास न बोलले काही
सगळ्यांना पाहिले आनंदात
कधी न कोणाचा केला अपमान
तरी का माझ्या वाटी
सतत बोलणे अन् अपमानाचा घाट....

जगावे सुखात
अन् जगू द्यावे ही सुखात
हाच आहे माझा नियम
तरी का माझ्या मागे
सतत दुःखाचा आहे पाट...

गेले ते विसरून सारे
करावी नवी सुरुवात
कितीही ठरवले मनात
तरी नियतीच बदलते माझा विचार..

प्रत्येक दिवस नवी उमीद
घेऊन येते नवी जिद्द
तरी ही नियती निर्माण करते
परिक्षेची नवी हद्द...

जगणे हे असले जरी कठिण
परि सोडत नाही माझी नीव
सगळ्यांशी देऊन झुंज
जगते मी स्वाभिमानाने..

नियती लाही होईल गर्व
माझ्या या अस्तित्वाने
नारी होऊन जगण्याचा
अभिमान वाटला जीवाले.....
✍️स्वागंधरा