"कायग चहा देणार का मला", निखिल त्याची बायकॊ कोमलला काहीतरी विचार करत आहे हे पाहून बोलला.
हो अरे आत्ता आणते, कोमल ही नॉर्मल होत बोलली. बोलून ती किचन मध्ये जायला वळली की त्याने पुन्हा तिला थांबवले. एरवी दुसऱ्यांदा चहा मागितल्यावर बोलणारी आज काहीच बोलली नाही.
पण राणी साहेबांचे काय बिनसलंय ते तरी कळेल का मला. निखिल
काही नाही सहजच आपलं रोजचच.. कोमल
अग सांग तुला जरा मोकळे वाटेल. आता तुला पुढच्या आठवड्यात नववा महिना लागेल अन तू मला गेल्या काही दिवसात जास्तच ताण तणावात दिसतियेस...काय झाले बोल लवकर. त्याच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती कोमलला... ते पाहून तर तिला अजूनच भरून आले... अन इतका वेळ रोखलेले अश्रू तिचा गालावर ओघळले.
काहींनाहीरे आपले बाळ येणार, आपला हा पहिलाच अनुभव अन बाहेरची ही परिस्थिती .सर्व नीट होईल ना.एकतर मला घरात खूप कंटाळा येतो रोजची धावपळ, नोकरी ची सवय. पण आता ना घरात बसून काहीही विचार येतात डोक्यात, अगदी नको ते. बँकेत असल्यामुळे तुही दिवसभर बाहेर असतोस. मी सासूबाई सोबत काय अन किती बोलणार ना??
एकतर नोकरी मुळे मला सातव्या महिन्यात नाही जाता आले आईकडे. अन आता ह्या लॉकडाऊन मुळे मला तर माहेरीही जाता येणार नाही. माझ्यामुळे तुम्हालापण त्रास... मला जमेलणारे सर्व... मला तर कोरोनाचा बातम्या ऐकुन खूपच भीती वाटते आहे.. कोमल अगदी केविलवाणा चेहरा करून न थांबता बोलतच होती.
ए वेडाबाई किती विचार करतीयेस तू.बापरे ! तुझ्या डोक्यात विचार शृंखलाच चालू आहे. हे बघ मला अगदी हसरे अन गुटगुटीत बेबी हवंय हा.. पण जर तू अशी तणावात राहिलीस तर कसे होणार... मी तुला इतकेच सांगेल की बाहेरची परिस्थिती खरंच आपल्या हातात नाही ग अन ती कधीही नसतेच... पण आपल्याला ह्याही परिस्थितीमध्ये खुश राहायचे आहे.तुला म्हणून सांगतो, मी जेव्हाही कधी उदास असतो ना तेव्हा माझी आई मला नेहेमी सांगते की, "आपल्या भोवतीचे जग म्हणजे आपल्याच तर विचाराचे प्रतिबिंब असते, तू फक्त तुला जे करुन आनंद मिळेल ते कर अन आपण जर नीट काळजी घेतली तर कोणत्याही आजाराला घाबरायची काय गरज? ".अन राहिला प्रश्न माहेरी जाण्याचा तर अग हेही तुझेच घर आहेकी. तू पण ना उगाच सासर अन माहेर लेबल लावून मोकळी होतेस प्रत्येक वेळेस. माझे आई बाबा खूप साधे आहेत ग.. तू फक्त मोकळेपणाने वाग अन मग बघ तुझा मनात असलेली विचारांची गर्दी कशी कमी होईल .
कोमल अन निखिल चे वर्षभरापूर्वीच लग्न झालेले.निखिल बँकेत मॅनेजर तर कोमल एका खाजगी कंपनीत नोकरी करत होती.जरी लग्नाला वर्ष झाले असले तरी कोमल फारशी सासरी मोकळेपणाने वावरत नव्हती . त्यातल्या त्यात माहेरी अगदी लाडात वाढलेली त्यामुळे तिला नोकरी करुन थोडेफार घरकाम करणे तिला थोडे जड जात होते....त्यासोबतच आधीच काही मैत्रिणी अन बहिणींचे अनुभव ऐकल्यामुळे ती तशी सासूबाई सोबतती जरा अंतर ठेवून च वागायची.तसे तिचे सासरचे लोक सर्वेच खूप प्रेमळ होते, त्यांच्याही लक्षात यायचे तिचे वागणे. पण त्याही हे जाणून होत्या की नवीन ठिकाणी काही मुलींना रुळायला, फुलायला वेळ लागतो. नोकरी करत असल्यामुळे ती पुरेसा वेळ घरीही नव्हती देऊ शकत. त्यामुळे त्यांनीही तिचाच कलाने घ्यायचे असे ठरवले होते. निखिल तिचा नवरा ही तीची मनापासून काळजी घ्यायचा.
काही दिवसातच तिने गोड बातमी दिली. घरी सर्वेच जण खूप खुश होते. तीला काय हवे नको ते पाहायचे... कोमलही खुश होती.पण कुठेतरी तिचा स्वभाव आड यायचा.खरंच कधी कधी एखादे नाते मन मोकळेपणाने स्वीकारले तर नक्कीच त्यात संवाद साधून नात्याची वीण आणखीच घट्ट करता येते.
निखिलचे बोलणे पटले होते कोमलला.तीही त्याच दृष्टीने विचारात पडली. काहीही चुकले तर आईही रागवायची की आपल्याला तिच्यावर मग आपणही किती रुसायचो, पण नंतर विसरूनही जायचो की, मग आपण सासुचेच बोलणे का इतक्या नकारात्मकतेने घेतोय....मग काय तिनेही स्वतःसाठी, येणाऱ्या बाळासाठी जरा बदलायचे ठरवले.उलट हा वेळ मी माझाच घरच्याना समजून घ्यायला वापरेल.....
दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जरा उशिराच जाग आली तशी फ्रेश होऊन ती किचन मध्ये गेली तर...
कायग तुला आज उशीर झाला, तुझी तब्येत बरी आहेना. मला कधीची काळजी वाटत होती, काहीही वाटले, लागले तर मला निसंकोच पणे सांग हो... सासूबाई म्हणाल्या.
नेहमी प्रमाणे च तर बोलत होत्या त्या पण आज तिने ठरवले होते की आपल्या आईला पाहायचे त्यांच्यात, एक सासू म्हणून नाही.
कोमलचे तर डोळेच पाणावले.कारण आज जर तिने असे ठरवले नसते तर नेहेमी प्रमाणे तिला त्यांचे वागणे म्हणजे देखावा च वाटला असता
ती तशीच सासूबाईंना म्हणाली,मी बरी आहे. तुम्ही उगाच काळजी करता ..तिचा मनात लगेच विचार येऊन गेला.. की कोणीतरी किती खरे बोललय ना "जशी दृष्टी तशी सृष्टी ".तिने तर मनोमन निखिलचे आभार मानले, काल किती छान सांगितले समजावून .
ती तशीच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाली,मी तुम्हांला आई म्हणले तर चालेल...
तिचा प्रश्न ऐकुन सासुबाईही हळव्या झाल्या त्यांनी तिला तसेच जवळ घेतले, "मी तर कधीची वाट पाहते आहे ह्या क्षणाची ".
अन हो फक्त आई म्हणून चालणार नाही तर मला तुला कधी काय खायचे वाटले तर सांग.मी सर्व मनापासून करेल हो माझ्या लेकीसाठी.
आता कोमल ही जरा निश्चिन्त झाली होती बाळाचा आगमनासाठी, मनावर कोणत्याही प्रकारचे ओझे न ठेवता, खुश राहत होती.सासूबाई तर अगदी आनंदाने तिला काय हवे नको पाहत होत्या. तिला वेळोवेळी अनेक सकारात्मक अनुभव सांगत होत्या. दोघींचं नाते फुलत असतांना पाहून निखिलही खूप समाधानी होता.
तर ह्या कथे चे तात्पर्य हेच ह्या काळात सामाजिक अंतर ठेवणे तर अपरिहार्य आहे पण मनातले अंतर नक्कीच कमी करण्याचा प्रयत्न करूया. फक्त मनापासून ते ठरवले पाहिजे. आजकाल चा संपर्क साधनामुळे तर कोसो दूर अशी नात्यातले अंतर ही कमी करता येऊ शकते. फक्त मनापासून.. एकदा का मनातलं अंतर कमी झाले तर एकटेपणा अन निराशा तर निघून जातील. घराबाहेर न पडता मनाने एक होण्याची ही संधी वाया घालवून कसे चालेल, नाहीका...?
प्राजक्ता कुलथे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा