Login

लोकांचे वागणे आणि आपले वागणे

Lokache wagane aani aaple wagane

लोकांच्या वागण्याचा विचार करून आपण आपलं वागणं विसरत चाललोय.. बिव्हेवियर अर्थातच आपलं वागणं…!!आयुष्यात आपण जगतो पण जगताना ज्याप्रकारे वागतो ते खूप महत्त्वाचं ठरतं.सद्यस्थितीला आपण आपल्या वागण्याचा नाही तर इतरांच्या वागण्याचाच जास्त विचार करतोय.आणि यामध्ये आपण आपलं स्वतःच वागण मात्र विसरत चाललोय. मुळात आपलं आयुष्य.. आपल्या आयुष्यात कसं वागायच हे आपणच ठरवतो.हे असं जरी असलं तरी हल्ली आपण आपला विचार कमी आणि लोकांच्या वागण्याचा विचार जास्त करतो.ते कसं वागतात..?त्यांच वागणं थोड जरा वेगळच आहे…नाही का..?आपल्या आणि त्यांच्या वागण्यात किती फरक आहे…?? बापरे….!! काय काय चालू असतं न आपल्या डोक्यात…. खरचं , कधीच कधी तर हसायलाही येतं आपल्याच अशा वागण्याचं…!!आयुष्यात दोन प्रकारची माणसं काही अगदी साधी असतात.छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणारी..तर काही गाडी ,बंगले , चिक्कार पैसे यात आनंद शोधणारी…! दोन्हीही माणसच असतात.पण दोन्ही व्यक्तींच्या वागण्यात प्रचंड भिन्नता जाणवते. आणि अनेकदा इतरांच्या वागण्याचा विचार करून आपण आपलं नेहमीच वागणं विसरतो. सतत असं वाटत राहत की यार त्या माणसाकडे काय रूबाब आहे…काय ताकद असेल न या रूबाबात…..!! पण आपल्याकडचा साधेपणा आपण विसरून जातो.साधेपणाची ताकद आपल्या लक्षातच येत नाही. अरे तो बघ तो…आज त्या सिग्नलवर हवालदाराशी कसा भांडत होता…काही ताळतंत्र नव्हतं त्याच्या वागण्याला.असे किती सहज बोलतो आपण. साधीसरळ जगणारी माणस एकदम असं विक्षिप्त वागणं बघून आपलं जगणं कुठतरी कमी पडतय असा विचार करतात. अगदी सकाळच्या ब्रश करण्यापासून ते झोपण्यापर्यंत आपण इतरांच्या वागण्याचा विचार करतो.पोशाख, चालणं-बोलणं या सगळ्या गोष्टींचा किती विचार करतो आपण.दुसऱ्यांच्या वागण्याचा विचार करणारे आपण आपल्या आयुष्यात काय चाललयं हे विसरलो का…? दुसऱ्याच वागणं असं-दुसऱ्याच वागणं तसं…. अरे पण आपल्या वागण्याच काय…?? लोकांच्या वागण्याचा विचार करता करता आपल्या वागण्याकडे कळत नकळत का होईना आपणच दुर्लक्ष करतोय.आपल्या मतानुसार वागणारे आपण आता लोकांच्या वागण्यानुसार आपली मतं बदलून आपलं खरं वागणं विसरतोय हा मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवा. कदाचित हे आपण विसरलात….की आपलं वागणं हे आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे. आपल वागणच आपल व्यक्तिमत्त्व घडवत असतं.आणि आपण तर लोकांच्या वागण्याचा विचार करण्यातच जास्त रमलोय.आपल्याला आपली काहीच पडलेली नाही. हा कसा करतोय,तो कसा करतोय यातच आपलं आयुष्य चाललय. लोकांच्या वागण्यापुढे आपलं वागणं आपणच कमी लेखतोय का…??? इतक महत्त्व का लोकांच्या वागण्याला…?? तुम्हाला लोकांच वागणं रुचतय का खटकतय…? नक्की काय…?……… लोकांच वागणं रूचत असेल तर त्यातल चांगल नक्की घ्या.पण खटकत असेल तर उगाचच त्यांना दोष देत बसून जास्त विचार करू नका.कारण माणूस चांगला असतो पण वाईट असते ती त्याची वृत्ती…!! टिका करायचीच असेल त्यांच्यावर तर शब्दांच भान ठेवून टीका करा.उगाचच त्यांच्या वागण्याचा विचार करून आपल वागण, आपल जगणं विसरू नका. लोकांच्या वागण्याचा विचार जरूर करा पण इतकाही विचार करू नका की तुम्ही तुमच साधे वागण विसराल…. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग…….!! हे तर काय आपल्याला नवीन नाहीच.लोकं वागताना कशीही वागतात. अगदी एखाद्याला नाव ठेवणसुद्धा त्यांना चांगलच जमतं. पण अशा या बोलण्याचा आपण किती विचार करायचा हे आपणच ठरवायचं असतं हे मात्र विसरू नका.लोक विचित्र वागतीलही तुम्ही मात्र त्याचा विचार करू नका.आपल आयुष्य सुंदर आहे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला.आपलं वागणं कालपेक्षा आज जास्त वाखाणण्याजोग कस असेल याचा विचार करा.आपलं वागणं सुधारा , आपल्या वागण्याला नवे पैलू पाडण्याचा प्रयत्न करा.कुणाच वागणं कसं यातच गढून न जाता इथे प्रत्येकजण वेगळा आहे आणि प्रत्येकाच वागणं वेगळं असु शकतं याचा प्रकर्षाने विचार करा. तुम्ही फक्त लोकांच्या वागण्याचा विचार करत बसलात तर लोकांच्या नजरेत तुम्ही विचीत्र पद्धतीने निदर्शनास याल.आपण इतरांच्या वागण्याचा विचार करणार, हळुहळू त्याचा प्रभाव आपल्यावर पडणार, आपण त्याच किंवा त्याविरुद्ध अनुकरण करणार…यामध्ये आपण आपलं नैसर्गिक वागणं मात्र कायमच विसरणार… आपल्या वागण्याच प्रतिबिंब आपल्याला कधीच बघता येणार नाही… लोकांच्या वागण्याच्या विचारात आपल वागण केव्हा विरून जाईल याची कणभरही चाहूल आपल्याला लागणार नाही. म्हणून आपल्या वागण्याचा जास्तीत जास्त विचार करा,त्याने आपलं “व्यक्तिमत्त्व” घडणार आहे….. आयुष्य सुखकर होणार आहे….!!